Public Provident Fund Update News : पोस्टाच्या अल्प बचत योजनांच्या संदर्भात मोठी बातमी समोर आली आहे. नवीन नियमानुसार एकापेक्षा जास्त Public Provident Fund (PPF) खाती असल्यास व्याजाची कपात करण्यात येणार असल्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. 1 ऑक्टोबरपासून केंद्र सरकार हा महत्वाचा बदल करणार आहे.
दरम्यान, पोस्टाच्या अल्प बचत योजनेच्या संदर्भात अर्थमंत्रालयानं दिशानिर्देश जारी केले आहेत. एखाद्या खात्यात अनियमितता आढळल्यास ते बंद करण्याचीही कारवाई करण्यात येऊ शकते. केंद्र सरकारनं राष्ट्रीय बचत योजना खातं, अल्पवयीन असणाऱ्यांच्या नावे उघडलेलं PPF खातं, आजीआजोबांकडून उघडण्यात आलेलं सुकन्या समृद्धी खात या खात्यांच्या नियमांमध्ये बदल करण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे.
अनियमित खाती बंद करण्यात येणार
दरम्यान, सुकन्या समृद्धी योजनेत आजी आजोबांकडून अनेकदा नातवंडांच्या नावाने सुकन्या समृद्धी योजना सुरु करण्यात येते. अशी खात्यांची सुरक्षा मुलांच्या कायदेशीर पालकांकडे हस्तांतरित करण्यात येईल. एकाच कुटंबात दोन खाते उघडण्यात आले असल्यास किमान रक्कम जमा झालेली नाही, अशी अनियमित खाती बंद करण्यात येईल. रक्कम दुसऱ्या खात्यात वळवण्यात येईल.
एकापेक्षा जास्त पीपीएफ खाते असल्यास व्याज केवळ प्राथमिक खात्यावरच मिळणार
तसेच एकापेक्षा जास्त पीपीएफ खाते असल्यास व्याज केवळ प्राथमिक खात्यावरच मिळणार आहे. जमा होणारी रक्कम प्रत्येक वर्षासाठीलागू असलेल्या कमाल मर्यादेच्या आत असेल तरच व्याज मिळेल. दुसऱ्या खात्यातील रक्कम प्राथमिक खात्यात जोडून देण्यात येईल. त्यासाठी प्राथमिक खात्याशी संबंधित अटींची पूर्तता होणं आवश्यक आहे. दोन्ही खाती त्यानंतर विलीन करण्यात येतील. प्राथमिक खातेच कायम राहील . त्यावरच लागू असलेले व्याज मिळत नाही. दुसऱ्या खात्यात रक्कम शिल्लक असल्यास शून्य टक्के व्याजदरासह ती परत करण्यात येईल. विलीनीकरणानंतर गुंतवणुकदार पोस्ट किंवा बँकेत निवडलेले कोणतेही एक खाते प्राथमिक म्हणून मानले जाईल.
दीर्घ मुदतीसाठी पैशांची गुंतवणूक करण्यासाठी PPF खाते सर्वोत्तम
पीपीएफ योजनेत कर भरण्याची गरज नाही. पीपीएफमध्ये सरकारकडून गॅरन्टी दिली जाते. पैसा सुरक्षित ठिकाणी गुंतवायचा आहे आणि निश्चित परतावा मिळवायचा आहे, अशा लोकांसाठी पीपीएफ ही योजना चांगली आहे. दुसरीकडे पीपीएफमध्ये दीर्घ मुदतीसाठी पैशांची गुंतवणूक करता येते. त्यामुळं गुंतवणुकीसाठी ही योजना सर्वोत्तम मानली जाते.
महत्वाच्या बातम्या:
SIP की PPF दोन्हीपैकी कोण सर्वोत्तम? जाणून घ्या गुंतवणुकीचा सर्वांधिक चांगला पर्याय कोणता?