महाराष्ट्र जगातील 28 व्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था, शिक्षणासह आरोग्य आणि ग्रामविकासात सक्षमीकरण, मॉर्गन स्टॅन्लीच्या अहवालात कौतुक
मॉर्गन स्टॅन्लीच्या अहवालात (Morgan Stanley report) महाराष्ट्राच्या आर्थिक प्रगतीचं (Maharashtra Economic Progress) कौतुक करण्यात आलं आहे.

Maharashtra Economic Progress : मॉर्गन स्टॅन्लीच्या अहवालात (Morgan Stanley report) महाराष्ट्राच्या आर्थिक प्रगतीचं (Maharashtra Economic Progress) कौतुक करण्यात आलं आहे. सिंगापूर देशाच्या तोडीची महाराष्ट्राची अर्थव्यवस्था (Maharashtra Economic) असल्याचं मॉर्गन स्टॅन्लीच्या अहवाल सांगण्यात आलं आहे. महाराष्ट्र जगातील 28 व्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. महाराष्ट्र हा भारतातील सर्वात मोठे आर्थिक राज्य असून त्याने सातत्याने देशाच्या प्रगतीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली असल्याचं मत या अहवालात नोंदवण्यात आलं आहे.
देशाच्या जीडीपीत महाराष्ट्राचे 13.7 टक्के योगदान
मॉर्गन स्टॅन्लीच्या ‘India Economics and Strategy’ या अहवालानुसार, महाराष्ट्रची जीएसडीपी सध्या सुमारे US$ 536 अब्ज इतकी असून, ती 2030 पर्यंत US$ 1 ट्रिलियन पर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. महाराष्ट्राचे देशाच्या जीडीपीत 13.7 टक्के योगदान आहे. राज्य ऑटो आणि ऑटो पार्ट्स, औषधे, वैद्यकीय उपकरणे आणि टेक्सटाईल क्षेत्रात आघाडीवर असल्याची माहिती मॉर्गन स्टॅन्लीच्या अहवालात देण्यात आली आहे. सर्वाधिक निर्यात करणारे राज्य, ज्याचे एकूण निर्यातीतील योगदान 15.4 टक्के आहे. परकीय गुंतवणूक मिळवण्यात महाराष्ट्र अग्रस्थानी आहे.
राज्याचा बजेट-टू-जीडीपी रेषो 18.5 टक्के
राज्याचा बजेट-टू-जीडीपी रेषो 18.5 टक्के आहे. तो भारतातील सर्वात कमी, ज्या माध्यमातून विकास प्रकल्पांसाठी निधी मागील काही वर्षात चांगल्या पद्धतीने उपलब्ध झाला आहे. मुंबई मेट्रो, मुंबई ट्रान्स हार्बर लिंक, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, तसेच विविध महामार्ग प्रकल्प मार्गी लागले. सेवा क्षेत्रावर लक्ष केंद्रीत करत औद्योगिक उत्पादनातून दूर होत, माहिती-तंत्रज्ञान, वित्तीय सेवा, विमा व रिअल इस्टेटमध्ये वाढ झाली आहे. राज्याने ऊर्जा संक्रमण, इलेक्ट्रिक वाहन उद्योग आणि सेमीकंडक्टर क्षेत्रातही धोरणात्मक पावले उचलली आहेत.
सामाजिक कल्याणातही महाराष्ट्राची भर
शिक्षण, आरोग्य, ग्रामीण विकास, महिला सक्षमीकरण या क्षेत्रांत प्रगती झाल्याची माहिती मॉर्गन स्टॅन्लीच्या अहवालात देण्यात आली आहे. कापूस, ऊस, डाळी, कांदे व फळांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्पादन झाले आहे. सर्वसामान्यांचे उत्पन्न वाढवणे, रोजगारनिर्मिती व हवामान बदलाशी जुळवून घेणारी नागरी धोरणे राबवण्यावर भर देण्यात आला आहे. राज्य ऑटो आणि ऑटो पार्ट्स, औषधे, वैद्यकीय उपकरणे आणि टेक्सटाईल क्षेत्रात आघाडीवर असल्याची माहिती मॉर्गन स्टॅन्लीच्या अहवालात देण्यात आली आहे. सर्वाधिक निर्यात करणारे राज्य, ज्याचे एकूण निर्यातीतील योगदान 15.4 टक्के आहे.
महत्वाच्या बातम्या:
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांची एक चूक, संपूर्ण जगावर संकट, अमेरिकेत स्थिती गंभीर, जाणून घ्या काय घडणार?



















