Maharani Radhikaraje Gaekwad : नावात महाराणी हा शब्द समाविष्ट केला तर दर्जा कित्येक पटीने वाढतो. महाराणीबद्दल अनेकदा आपली अशी कल्पना असते की तिच्या अंगावर अनेक सोन्या-चांदीचे दागिने असतील, जड पारंपारिक कपडे असतील, पण ही महाराणी पूर्णपणे वेगळी आहे. ही राणी दागिणे घालत नाही. भरजारी पोशाख घालत नाही. राणी असल्यासारखे दाखवतही नाही. ती 100 वर्षे जुनी असलेली साडी नेसून फंक्शन्सला जाते. तर कधी साधारण कपड्यात वावरते. आज आपण बडोद्याच्या राणी राधिकाराजे गायकवाड (Maharani Radhikaraje Gaekwad) यांच्याबाबतची माहिती पाहणार आहोत. उद्योगपती मुकेश अंबानींपेक्षा मोठं घर आणि 20000 कोटींचा बँक बॅलन्सअसूनही त्यांची साधी राहणी आहे.
24 हजार कोटींहून अधिक रुपयांचा लक्ष्मी विलास पॅलेस
लक्ष्मी विलास पॅलेस हा बडोद्याचा शाही राजवाडा जगातील सर्वात मोठ्या घरांपैकी एक आहे. हा राजवाडा ब्रिटनच्या राजवाड्या बकिंघम पॅलेसपेक्षा 4 पट मोठा आणि मुकेश अंबानींच्या राजवाड्यापेक्षा कितीतरी पट उंच आहे. अंबानींच्या अँटिलियातील घराची किंमत 15,000 कोटी रुपये आहे. तर राणी राधिकाराजे यांचा महाल असलेल्या लक्ष्मी विलासची किंमत 24 हजार कोटींहून अधिक आहे. सुमारे 600 एकरमध्ये पसरलेल्या लक्ष्मी विलास पॅलेसचा काही भाग आता सर्वसामान्यांसाठी खुला करण्यात आला आहे.
देशातील सर्वात महागडे घर
महाराज समरजितसिंह गायकवाड आणि महाराणी राधिकाराजे गायकवाड हे बडोद्याच्या लक्ष्मी विलास पॅलेसचा वारसा सांभाळत आहेत. 19 जुलै 1978 रोजी जन्मलेल्या महाराणी गुजरातच्या वांकानेर संस्थानातील आहेत. त्यांचे शिक्षण दिल्लीत झाले. हा पॅलेस 3,04,92,000 स्क्वेअर फूटमध्ये पसरलेला आहे. तो बनवण्यासाठी 12 वर्षे लागली आहेत. या राजवाड्याची रचना चार्ल्स फेलो चिशोम यांनी केली होती. 170 खोल्यांव्यतिरिक्त, पॅलेसमध्ये विशाल बाग, घोडेस्वारी पॅलेस, स्विमिंग पूल, गोल्फ कोर्ससह अनेक सुविधा आहेत. हा राजवाडा बांधण्यासाठी 18 हजार ग्रेट ब्रिटन पौंड खर्च झाले. आज हे देशातील सर्वात महागडे घर आहे.
2002 मध्ये राधिकाराजे यांचे बडोद्याचे महाराजा समरजित सिंग गायकवाड यांच्याशी विवाह
राधिकाराजे यांचे वडील डॉ. एमके रणजित सिंग झाला यांनी आयएएस होण्यासाठी राजशाही पदवीचा त्याग केला होता. राधिकाराजे यांनीही लहानपणापासूनच साधेपणाचे जीवन जगल्या आहेत. त्यांनी लेडी श्री राम, दिल्ली येथून इतिहासात पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आहे. महाराज समरजितसिंह गायकवाड यांच्याशी लग्न करण्यापूर्वी त्यांनी पत्रकार म्हणून काम केले.अभ्यासासोबतच तिने एका वृत्तपत्रातही काम केले आहे. 2002 मध्ये बडोद्याचे महाराजा समरजित सिंग गायकवाड यांच्याशी त्यांचा विवाह झाला.
समरजीत सिंग यांची संपत्ती किती?
जर आपण समरजीत सिंग यांच्या संपत्तीबद्दल बोललो तर त्यांची एकूण संपत्ती 20000 कोटी रुपये आहे. गायकवाड कुटुंबाची देशभरात अनेक मालमत्ता आहेत. महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी 1886 मध्ये बांधलेली पहिली मर्सिडीज बेंच पेटंट मोटरवॅगन खरेदी केली. राजघराण्याकडे 1934 ची रोल्स-रॉइस, 1948 ची बेंटले मार्क VI आणि 1937 ची रोल्स-रॉइस फँटम III देखील आहे. राधिकाराजे यांचे पती समरजितसिंह गायकवाड हेही माजी क्रिकेटपटू राहिले आहेत. वडिलांच्या निधनानंतर समरजितसिंग गायकवाड महाराज झाले. सर्वात श्रीमंत क्रिकेटपटूंमध्ये त्याची गणना होते. रणजी ट्रॉफीमध्ये त्याने बडोद्याचे प्रतिनिधित्व केले होते. सहा प्रथम श्रेणी सामने खेळले आणि बडोदा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष म्हणूनही काम केले.
महत्वाच्या बातम्या:
