Commercial LPG Gas price: व्यावसायिक वापराच्या गॅस सिलेंडरच्या दरात मोठी कपात करण्यात आली आहे. 19 किलोच्या एलपीजी सिलेंडरच्या (Gas Cylinder) दरात 183.50 रुपयांची कपात करण्याचा निर्णय पेट्रोलियम कंपन्यांनी घेतला आहे. तर पाच किलोच्या लहान गॅस सिलेंडरच्या दरातही 13 रुपयांची कपात करण्यात आली आहे. त्यामुळे 19 किलो आणि 5 किलोच्या सिलेंडरची राजधानी दिल्लीलीत किंमत अनुक्रमे 2930 रुपये आणि 808.50 रुपयांवर पोहोचली आहे. बुधवारी सकाळपासून नवे दर लागू झाले आहेत. (Commercial cylinder rate)

Continues below advertisement

गेल्या काही महिन्यांमध्ये व्यावसायिक वापराच्या गॅस सिलेंडरच्या दरात सातत्याने वाढ होताना दिसत होती. तसेच इराण-अमेरिका युद्धामुळे व्यावसायिक वापराच्या सिलेंडरचा गॅस पुरवठा मर्यादित करण्यात आल्याने काळ्या बाजारात या सिलेंडरचे भाव प्रचंड वाढले होते. याचा मोठा फटका हॉटेल व्यावसायिकांना बसला होता. जानेवारी महिन्यापासून  व्यावसायिक वापराच्या गॅस सिलेंडरच्या दरात  तब्बल सातवेळा वाढ झाली होती. 1 जानेवारीपूर्वी 19 किलोच्या सिलेंडरचा दर 1580 रुपये होता. 1 जूनला तोच दर आता 3113.50 रुपयांवर पोहोचला होता. 19 किलोच्या एलपीजी सिलेंडरच्या दरात जानेवारी महिन्यात 111 रुपये, फेब्रुवारीत 49 रुपये, मार्चमध्ये 28 रुपये, 7 मार्चला 114.50 रुपये, एप्रिल महिन्यात 195.50 रुपये, मे महिन्यात 993 रुपये आणि जून महिन्यात 42 रुपयांची वाढ झाली आहे. तर छोटे व्यावसायिक आणि नागरिकांद्वारे वापरल्या जाणाऱ्या 5 किलोच्या सिलेंडरचा दर 821.50 रुपयांवर जाऊन पोहोचला होता. या पार्श्वभूमीवर बुधवारी लागू करण्यात आलेली 183 आणि 13 रुपयांची दरकपात व्यावसायिकांसाठी किंचित दिलासा ठरणार आहे.

Petrol Diesel: केंद्र सरकारचा पेट्रोल-डिझेलबाबत महत्त्वाचा निर्णय, 200 लिटरचा नियम हटवला

Continues below advertisement

केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या विक्रीवरील लागू केलेले सर्व निर्बंध हटवण्याचा मोठा निर्णय घेतला होता. 1 जुलैपासून  या निर्णयाची अंमलबजावणी झाल्याने वाहतूक आणि औद्योगिक क्षेत्राला मोठा दिलासा मिळाला होता. व्यावसायिक वापरासाठीचे पेट्रोल आणि डिझेल रिटेल विक्रेत्यांकडून घेण्यावर निर्बंध होते. डिझेल विक्री प्रति ग्राहक 200 लिटरपर्यंतच अशी मर्यादा लागू करण्यात आली होती. 12 जून रोजी हे निर्बंध लावण्यात आले होते. ब्लॅक मार्केटिंग थांबवण्यासाठी तसेच रिटेल वापरासाठीचे इंधन व्यावसायिक वापरासाठी वळवले जाऊ नये, यादृष्टीने हे निर्बंध लादण्यात आले होते. मात्र, आता हे सर्व निर्बंध दूर करण्यात आले आहेत.

आणखी वाचा

तुम्ही तुमचा आयटीआर भरला नाही तर काय होईल? टॅक्स नसेल तरी दंड भरावा लागेल का?