नई दिल्‍ली: भारतीय आयुर्विमा महामंडळ अर्थात LIC ही देशातील सर्वांत मोठी विमा कंपनी आहे. या कंपनीचे देशभरात लाखो ग्राहक आहेत. सध्या याच विमा कंपनीच्या एका म्युच्यूअल फंड योजनेची सगळीकडे चर्चा होत आहे. या योजनेत गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांना दमदार रिटर्न्स मिळाले आहेत. या स्कीमचे नाव एलआयसी एमएफ डिव्हिडेंड यिल्ड फंड असे आहे. विशेष म्हणजे या योजनेत गुंतवणूक करणाऱ्यांना पाच लाखाचे तब्बल बारा लाख रुपये मिळालेले आहेत. हा फंड नेमका काय आहे? हे जाणून घेऊ या... 


भारतीय आयुर्विमा मंहामंडळाच्या एलआयसी एमएफ डिव्हिडेंड यिल्ड फंड या योजनेत अगदी 1000 रुपयांपासून गुंतवणूक करता येते. या योजनेचा बेंचमार्क निफ्टी 500 टीआरआय आहे. शेअर बाजारात गुंतवणूक करायची आहे, पण या क्षेत्रातील योग्य ज्ञान नसलेल्या


गुंतवणूकदारांसाठी हा फंड अगदी योग्य आहे 


म्युच्यूअल फंडात केलेल्या गुंतवणुकीतून चांगले रिटर्न्स मिळतात. विशेष म्हणजे या क्षेत्रात केलेल्या गुंतवणुकीवर तुम्हाला चक्रवाढ व्याजाचा फायदा मिळतो. त्यामुळे तुम्ही गुंतवलेल्या पैशांचे मूल्य लगेच वाढते. म्युच्यूअल फंडात दीर्घकालीन गुंतवणूक केल्यास तुमच्याकडे एक मोठा फंड तयार होऊ शकतो. शेअर बाजारात गुंतवणूक करून थेट धोका पत्करण्याची ज्यांची तयारी नाही, त्यांच्यासाठी म्युच्यूअल फंड हा एक योग्य पर्याय ठरू शकतो. 


एलआयसीच्या या फंडाने दिले दमदार रिटर्न्स


एलआयसी एमएफ डिव्हिडेंड यिल्ड फंड (डायरेक्‍ट प्‍लॅन) 60.25 टक्क्यांच्या सीएजीआरसह गुंतवणूकदारांना चांगले रिटर्न्स देण्यात यशश्वी ठरलेला आहे. या फंडाच्या याआधीच्या रिटर्न्सनुसार समजा या फंडात एखाद्या गुंतवणूकदाराने पाच वर्षांसाठी प्रत्येक महिन्याला 10000 रुपये SIP च्या माध्यमातून गुंतवले असते तर त्याचे आज व्याजासह 12,89,992 रुपये झाले असते.  या गुंतवणुकीवर वर्षाला 31.19 टक्क्यांनी रिटर्न्स मिळाले असते. 


एलआयसी एमएफ डिव्हिडेंड यिल्ड फंडाकडून नेमकी कशात गुंतवणूक? 


एलआयसी एमएफ डिव्हिडेंड यिल्ड फंडाच्या टॉप होल्डिंग्समध्ये एचडीएफसी बँक, टाटा कन्सल्टन्सिंग सर्व्हिसेस, रिलायन्स इंडस्ट्रीज (आरआयएल), आयसीआयसीआय बँक आणि पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन आदी शेअर्सचा समावेश आहे. या फंडातील संपत्तीचा 2 टक्क्यांपेक्षा अधिक हिस्सा हा या टॉप 5 शेअर्समध्ये आहे. एलआयसीचा हा म्युच्यूअल फंड 21 डिसेंबर 2018 रोजी चालू करण्यात आला होता. 


(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)


हेही वाचा :


मुंबईत स्वप्नातलं घर हवंय? म्हाडा लॉटरीसाठी अर्ज करण्यासाठी शेवटचे दोन दिवस; जाणून घ्या अर्ज कुठे करावा