LIC Yojana : लोक काम करताना, व्यवसाय करताना किंवा इतर कोणतेही काम करताना स्वतःसाठी पैसे वाचवतात. जेणेकरुन ते निवृत्त झाल्यावर त्यांच्यासाठी एक चांगला पेन्शन फंड तयार करता येईल. त्यांना त्यांच्या वृद्धापकाळात त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी इतरांवर अवलंबून राहावे लागू नये. बरेच लोक वेगवेगळ्या पेन्शन योजनांमध्ये देखील गुंतवणूक करतात. जेणेकरून निवृत्तीनंतर त्यांना दरमहा काही पेन्शन मिळत राहते. त्यांचे खर्च भागवता येतील. तुम्ही जर गुंतवणुकीसाठी (Invetment) योजना शोधत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्वाची आहे.
जर आपण पेन्शनसाठी एक चांगली योजना शोधत असाल तर एलआयसीची (LIC) एक योजना तुमच्यासाठी खूप चांगली ठरु शकते. या योजनेत तुम्हाला फक्त एकदाच गुंतवणूक करावी लागेल. त्यानंतर तुम्हाला दरमहा पेन्शन मिळत राहील. चला तुम्हाला सांगूया. ही योजना काय आहे आणि त्यात गुंतवणूक कशी करावी.
एलआयसीची सरल पेन्शन योजना
देशभरात अनेक वेगवेगळ्या पेन्शन योजना चालवल्या जातात. त्यामध्ये गुंतवणूक करून, तुम्ही स्वतःसाठी पेन्शनची व्यवस्था करू शकता. जीवन विमा महामंडळ म्हणजेच एलआयसीने एक उत्कृष्ट पेन्शन योजना देखील सुरू केली आहे. या योजनेचे नाव एलआयसी सरल पेन्शन योजना (LIC Saral Pension Yojana) आहे. या योजनेत तुम्हाला फक्त एकदाच गुंतवणूक करावी लागेल आणि त्यानंतर तुम्हाला आयुष्यभर दरमहा पेन्शन मिळत राहील.
एलआयसीच्या सरल पेन्शन योजनेत किती रक्कम भरावी
एलआयसीच्या सरल पेन्शन योजनेत, दरमहा 1000 रुपयांची वार्षिकी घ्यावी लागते. त्याच वेळी, तिमाही खरेदी केल्यास, 3000 रुपयांची वार्षिकी, सहामाही खरेदी केल्यास, 6000 रुपयांची वार्षिकी आणि वार्षिक खरेदी केल्यास, 12000 रुपयांची वार्षिकी घ्यावी लागते. आम्ही तुम्हाला सांगतो की ही किमान रक्कम आहे. यामध्ये जास्तीत जास्त गुंतवणुकीची मर्यादा नाही.
कोण गुंतवणूक करू शकते?
40 वर्षांवरील कोणताही भारतीय नागरिक एलआयसीच्या सरल पेन्शन योजनेत गुंतवणूक सुरू करू शकतो. यामध्ये गुंतवणूक करण्यासाठी कमाल वय 80 वर्षे आहे. या योजनेचे फायदे घेण्यासाठी, www.licindia.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन देखील अर्ज करता येईल. तुम्ही जर पेन्शनसाठी एक चांगली योजना शोधत असाल तर एलआयसीची सरल पेन्शन योजना तुमच्यासाठी खूप चांगली ठरु शकते. ग्राहकांना या योजनेचा चांगला परतावा मिळू शकतो.
महत्वाच्या बातम्या: