LIC New Children's Money Back Plan :  प्रत्येक पालकाला आपल्या मुलाच्या चांगल्या भविष्याची काळजी असते. अशा परिस्थितीत मुलाच्या जन्मानंतर पालक त्याच्या भविष्यासाठी गुंतवणूकीचे नियोजन करू लागतात. अनेकजण त्यादृष्टीने मुलांच्या नावाने काही पॉलिसीदेखील काढतात. भारतातील सर्वात मोठी विमा कंपनी असलेल्या LIC मध्येदेखील मुलांच्या भवितव्यासाठी काही पॉलिसी आहेत. 


मुले मोठी झाल्यावर त्यांच्या गरजाही वाढतात. अशा परिस्थितीत एलआयसीने मुलांसाठी एक खास योजना आणली आहे.  एलआयसीने 'न्यू चिल्ड्रन मनी बॅक प्लॅन' ही पॉलिसी सुरू केली आहे. मुलांच्या भविष्यातील आर्थिक गरजांनुसार ही योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेत गुंतवणूक करून तुम्हाला चांगला परतावा मिळू शकतो.


न्यू चिल्ड्रन मनी बॅक प्लॅन म्हणजे काय?


एलआयसीच्या 'न्यू चिल्ड्रन मनी बॅक प्लॅन'च्या नावावरून ही पॉलिसी मनी बॅक प्लॅन पॉलिसी आहे हे लक्षात येते. या योजनेत गुंतवणूक करून तुम्ही खूप मोठा परतावा मिळवू शकता. या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी तुम्हाला दररोज फक्त 150 रुपये गुंतवावे लागतील. तुम्ही ही पॉलिसी 25 वर्षांसाठी खरेदी करू शकता. या योजनेत मुलाच्या वयाच्या 18 वर्षांनंतर पहिल्यांदा मनी बॅक रक्कम मिळणार आहे. मुलाच्या वयाच्या 20 व्या वर्षी तुम्हाला दुसऱ्यांदा पैसे परत मिळतील. तर, तिसऱ्यांदा, मुलाच्या वयाच्या 22 व्या वर्षी मनी बँकनुसार पैसे मिळतील. या तिन्ही मनी बॅकमध्ये  तुम्हाला 20-20 टक्के रक्कम मिळते. त्यानंतर तुम्हाला उर्वरित 40 टक्के रक्कम ही पॉलिसी मॅच्यु्अरिटीच्या वेळी म्हणजे मुलाचे वय 25 वर्ष झाल्यानंतर मिळतील. 


किती करावी लागणार गुंतवणूक


या योजनेत तुम्हाला प्रत्येक दिवशी 150 रुपये गुंतवावे लागणार आहेत. या हिशोबाने वर्षाला 55 हजार रुपये गुंतवावे लागणार आहेत. 25 वर्षानंतर ही रक्कम 14 लाख रुपये होईल. मॅच्युअरिटी आणि मनी बॅकसह पॉलिसीधारकाला 19 लाख रुपये मिळणार आहे. जर, पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यास त्याच्या पालकांना गुंतवलेली सर्व रक्कम व्याजासह मॅच्युअरिटीवर मिळणार. 


या पॉलिसीची खास वैशिष्ट्ये


ही पॉलिसी घेण्यासाठी तुमच्या मुलाचे वय 0 ते 12 वर्षांच्या दरम्यान असावे. या योजनेत तुम्हाला 60 टक्के रक्कम ही मनी बॅकमध्ये परत मिळतील. तर उर्वरित 40 टक्के रक्कम मॅच्युरिटीच्या वेळी मिळतील. या पॉलिसीमध्ये आपण किमान एक लाख रुपये गुंतवू शकता. त्यापेक्षाही अधिक रक्कम तुम्ही आपल्या गरजेनुसार गुंतवू शकता.