LIC New Plan: भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) ने एक नवीन योजना सुरु केली आहे. मुलांच्या भविष्यातील गरजा लक्षात घेऊन गुंतवणूक करण्यासाठी ही योजना सुरु करण्यात आली आहे. 'अमृतबाल' (LIC AmritBaal) असं या नवीन विमा योजनेचं नाव आहे. ही योजना खास मुलांसाठी तयार करण्यात आली आहे. ही पॉलिसी 30 दिवस ते 13 वर्षे वयोगटातील मुलांसाठी घेतली जाऊ शकते.


एलआयसीच्या या योजनेला प्लॅन 874 असे नाव देण्यात आले आहे. एलआयसीच्या अमृतबल योजनेंतर्गत, तुम्ही आता तुमच्या मुलांच्या उच्च शिक्षणासाठी आणि इतर गरजांसाठी गुंतवणूक करु शकता. यामध्ये, मुलाच्या जीवन विम्यासोबत, हमी परतावा देखील उपलब्ध आहे.


30 दिवस ते 13 वर्षे वयोगटातील मुलांसाठी ही योजना 


अमृतबाल पॉलिसी ही 30 दिवस ते 13 वर्षे वयोगटातील मुलांसाठी घेतली जाणार आहे. त्याची परिपक्वता 18 वर्षे ते 25 वर्षांच्या दरम्यान असणार आहे. पॉलिसीसाठी 5, 6 आणि 7 वर्षांच्या प्रीमियम पेमेंट अटी देखील उपलब्ध आहेत. कमाल प्रीमियम पेमेंट टर्म 10 वर्षे आहे. तुम्ही सिंगल प्रीमियम पेमेंट पर्याय देखील निवडू शकता. या अंतर्गत तुम्हाला किमान 2 लाख रुपयांचा विमा घ्यावा लागेल. मॅच्युरिटी सेटलमेंट मनी बॅक प्लॅनप्रमाणे 5व्या, 10व्या किंवा 15व्या वर्षी घेता येते.


अमृतबाल योजनेत किती मिळणार परतावा?


अमृतबाल ही योजना 17 फेब्रुवारी 2024 पासून सुरु झाली आहे. या चाइल्ड इन्शुरन्स पॉलिसीमध्ये, तुम्हाला विम्याच्या प्रत्येक 1000 साठी 80 रुपयांच्या प्रमाणात हमी परतावा मिळणार आहे. 80 रुपयांचा हा परतावा विमा पॉलिसीच्या विम्याच्या रकमेत जोडला जाईल. तुम्ही तुमच्या मुलाच्या नावावर 1 लाख रुपयांचा विमा घेतल्यास, LIC विम्याच्या रकमेत 8000 रुपये जोडेल जातील. हा हमी परतावा प्रत्येक वर्षी पॉलिसी वर्षाच्या शेवटी जोडला जाईल. जोपर्यंत तुमची पॉलिसी वैध आहे तोपर्यंत हा परतावा तुमच्या पॉलिसीमध्ये जोडला जाईल. ही गुंतवणूक मुलांच्या भविष्यासाठी चांगली आहे. एलआयसीच्या अमृतबल योजनेंतर्गत, तुम्ही आता तुमच्या मुलांच्या उच्च शिक्षणासाठी आणि इतर गरजांसाठी गुंतवणूक करु शकता. 


पॉलिसीमध्येही कोणत्या सुविधा उपलब्ध?


या पॉलिसीमध्ये पैसे गुंतवणाऱ्यांना मुदतपूर्तीवर विमा रक्कम आणि हमी लाभ मिळेल. पॉलिसी खरेदीदारांसाठी 'सम ॲश्युअर्ड ऑन डेथ' पर्याय देखील उपलब्ध आहे. तसेच, तुम्ही थोडा जास्तीचा प्रीमियम भरल्यास, तुम्ही खर्चाच्या तुलनेत प्रीमियम रिटर्न रायडरचा लाभ घेऊ शकता.


महत्वाच्या बातम्या:


दिलासादायक! LIC ला 22 हजार कोटींची नफा, आयकर विभागाकडून LIC चा परतावा मंजूर