Pune: किया इंडियाने त्यांच्या कॅरेन्स कार मालिकेत नवीन कार लाँच केली आहे . कियाची कॅरेन्स क्लॅव्हिस ही कार खास मोठ्या आणि आधुनिक कुटुंबांसाठी तयार करण्यात आली असून, तिचा लूक आकर्षक आणि डिझाइन प्रगत आहे. ही गाडी 6 आणि 7 आसनी पर्यायांमध्ये उपलब्ध असून, प्रवासासाठी अधिक आरामदायक आणि मोकळ्या जागेची सुविधा देणारी आहे. आरामदायीपणा, एैसपैस जागा व आकर्षक डिझाइनसह प्रगत तंत्रज्ञान, सुरक्षितता अधिक आकर्षक बनवते. 

‘क्लॅव्हिस’ हे नाव लॅटिन भाषेतील असून, त्याचा अर्थ 'सोनेरी चावी' असा आहे. किया कंपनीनुसार ही कार म्हणजे आजच्या काळातल्या फॅमिली ट्रिप्ससाठी एक परिपूर्ण पर्याय आहे. या कारचे बाह्यरूप SUVसारखे असून ती आधुनिक आणि स्पोर्टी दिसते. समोर आणि मागे एलईडी दिवे, आकर्षक अलॉय व्हील्स, नवीन बॉडी कलर आणि दमदार फ्रंट डिझाइनमुळे ही कार रस्त्यावर सहज लक्ष वेधून घेते. ६ आसनी व ७ आसनी गाडीमध्ये असणारे प्रगत तंत्रज्ञान या कारला अधिक प्रीमियम बनवते.

 स्मार्ट लक्झरीने प्रत्येक प्रवास होणार सुखकर

गाडीच्या आतमध्येही अनेक खास गोष्टी आहेत. मोठ्या सनरूफमुळे भरपूर नैसर्गिक प्रकाश येतो आणि आतली जागा मोकळी वाटते. दुसऱ्या आणि तिसऱ्या रांगेतील सीट्स आरामदायक असून, त्या स्लायड, रीक्लाइन आणि फोल्ड करता येतात. यात मोठा टचस्क्रीन डिस्प्ले आहे आणि BOSE कंपनीचा प्रीमियम ८ स्पीकर्सचा साऊंड सिस्टीम दिला आहे, जो म्युझिकप्रेमींसाठी आनंददायक ठरतो.

काय काय फिचर्स?

ही गाडी केवळ सुंदर आणि आरामदायकच नाही, तर ती सुरक्षितही आहे. यात सहा एअरबॅग्स, ३६० डिग्री कॅमेरा, ब्लाइंड व्ह्यू मॉनिटर आणि ADAS लेव्हल २ यांसारखी २० आधुनिक सुरक्षा वैशिष्ट्यं आहेत. यामुळे कार चालवताना अधिक आत्मविश्वास वाटतो आणि प्रवास सुरक्षित होतो.  हाय-टेक वैशिष्‍ट्ये आणि प्रगत रचना आत्‍मविश्‍वासपूर्ण ड्रायव्हिंगसाठी प्रेरित करतात. प्रत्‍येक लाइन व पृष्‍ठभाग आकर्षक, स्‍टायलिश, प्रबळ व अद्वितीय आधुनिक  डिझाइन करण्‍यात आला आहे, ज्‍यामधून साहसी, पण सुरक्षित उत्‍साह दिसून येतो.

पेट्रोल डिझेल दोन्ही पर्याय

कॅरेन्स क्लॅव्हिस ही कार पेट्रोल आणि डिझेल या दोन्ही पर्यायांमध्ये मिळते. यात स्मार्टस्ट्रीम इंजिनसह नवीन मॅन्युअल ट्रान्समिशन सुविधा दिली आहे, जी गाडीवर अधिक चांगलं नियंत्रण देते. ही कार HTE, HTK, HTX आणि HTX+ अशा विविध प्रकारांत बाजारात उपलब्ध होणार आहे.

हेही वाचा:

शेअर बाजारात मोठी उसळी, डिफेन्स कंपन्यांचे शेअर्स सुस्साट सुटले, सेन्सेक्स 2675 अंकांनी वधारला