बंगळुरु : कर्नाटक सरकारनं पेट्रोलच्या काही नमुन्यांची तपासणी केली. पेट्रोलमध्ये निश्चित केलेल्या मर्यादेपेक्षा अधिक प्रमाणात इथेनॉल आढळल्याचं समोर आलं. एका नमुन्यात 31.2 टक्के इथेनॉल आढळलं आहे. E20 पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉल मिसळण्यास मंजुरी देण्यात आली आहे.  हे समोर आल्यानंतर राज्य सरकारनं तेल कंपन्यांवर कठोर कारवाई आणि वाहन मालकांना भरपाई देण्याची मागणी केली आहे. 

Continues below advertisement

राज्य सरकारनं आरोप केला की काही पेट्रोल पंपांवरील पेट्रोलमध्ये E20 मध्ये इथेनॉलचं प्रमाण अधिक आढळून आलं आहे. कर्नाटकमध्ये या पेट्रोल पंपावरुन परवानगीपेक्षा अधिक इथेनॉलचं प्रमाण अधिक असल्यानं वाहनांच्या काही पार्टसवर परिणाम होण्याची शंका व्यक्त करण्यात येत आहे.        कर्नाटक सरकारनं राज्यातील सात जिल्ह्यातील पेट्रोलचे 14 नमुन एकत्र केले होते. यामध्ये बंगळुरु, कोलार, चिक्कबल्लापूर, बंगळुरु ग्रामीण, रामनगर, मंगळुरु, तुमकरचा समावेश आहे. अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक मंत्री रिजवान अरशद यांनी यांच्या आदेशानं चौकशी करण्यात आली आहे. पेट्रोलच्या नमुन्यांची तपासणी बंगळुरुच्या NABL मधील मान्यताप्राप्त आणि ISO प्रमाणित श्रीराम रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये झाली. रिपोर्टनुसार 14 पैकी 11 नमुन्यांमध्ये इथेनॉलचं प्रमाण 20 टक्क्यांपेक्षा अधिक आढळून आलं. 

कोणत्या कंपनीच्या पेट्रोलमध्ये किती इथेनॉल?

कर्नाटकमध्ये पेट्रोलमध्ये सर्वाधिक इथेनॉल इंडियन ऑईलच्या नमुन्यात आढळलं, ते 31.2 टक्के होतं. वेगवेगळ्या कंपन्यांच्या पेट्रोलच्या नमुन्यात इथेनॉलचं प्रमाण वेगवेगळं आढळलं. 

Continues below advertisement

तेल कंपनी                    इथेनॉलचं प्रमाण  इंडियन ऑईल                  31.2 टक्केहिंदुस्तान पेट्रोलियम           30.5 टक्केHPCL                             27 टक्केभारत पेट्रोलियम               26.5 टक्केनायरा एनर्जी                    26.1 टक्केशेल                               25.5 टक्केBPCL                            24.2 टक्केBPCL                            22.6 टक्केHPCL                           22.4 टक्के IOCL                            20.8 टक्केनायरा एनर्जी                  20.6 टक्के

दरम्यान, तीन नमुन्यांमध्ये इथेनॉलचंं प्रमाण 20 टक्क्यांपेक्षा कमी आढळून आलं. यामध्ये भारत पेट्रोलियमच्या नमुन्यात 19.9 टक्के, MRPL च्या नमुन्यात 19.2 टक्के आणि शेलच्या नमुन्यात 13.5 टक्के इथेनॉल आढळलं. 

गाड्यांचं नुकसान होतं का?

राज्य सरकारनं E20 पेक्षा इथेनॉलचं प्रमाण अधिक असणाऱ्या पेट्रोलचा वापर केल्यास वाहनांचं मायलेज कमी होऊ शकतं, अशी शंका राज्य सरकारला आहे. याशिवाय फ्यूअल पम्प, इंजेक्टर, फिल्टर, होज आणि सील यासारख्या वाहनांच्या भागांना नुकसान होऊ शकतं.