मुंबई : आज तुम्हाला बँकेशी संबंधित काही काम करायचे असेल तर त्याआधी ही बातमी वाचणे गरजेचे आहे. कारण आज देशातील संपूर्ण बँका बंद असणार आहेत. बँकांसोबतच आज शेअर बाजारही बंद असणार आहे. बकरी ईद या सणानिमित्त बँकांना सुट्टी देण्यात आलेली आहे. या उत्सवामुळे शासकीय तसेच खासगी बँका बंद असणार आहेत. त्यामुळे तुम्हाला आज पैशांचे व्यवहार करायच असतील तर नेटबँकिंग आणि मोबाईल अॅप बँकिंगचा पर्याय निवडावा लागणार आहे.

  


शेअर बाजारही असणार बंद (Share Market)


आज बँकांना सुट्टी तर आहेच. पण आज शेअर बाजारदेखील बंद असेल. त्यामुळे शेअर बाजारात ट्रेडिंग करणाऱ्यांना आज पैसे कमवता येणार नाहीत. या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजार बंद असल्यामुळे आठवड्यात फक्त चारच दिवस ट्रेडिंग चालू असेल. आज तुम्हाला कोणताही शेअर खरेदी किंवा विक्री करता येणार नाही. तसा प्रयत्न केला तरी तो शेअर उद्याच (18 जून) विकेल.  


या ठिकाणी बँका राहणार बंद (Bank Holiday)


ग्राहकांना ऐनवेळी अडचण येऊ नये म्हणून भारतीय रिझर्व्ह बँकेने अनेक महिन्यांअगोदरच बँकेच्या सुट्टयांची यादी जाहीर केलेली आहे. या लिस्टच्या मदतीने बँकेच्या सुट्ट्या लक्षात घेऊन ग्राहकांना त्यांच्या बँकिंगसंदर्भातील कामांचे नियोजन लावता येते. सोमवारी 17 जून 2024 रोजी ईद अल अदा म्हणजेच बकरी ईदच्या निमित्ताने अगरतळा, अहमदाबाद, कानपूर, बंगळुरू, भोपाळ, भूवनेश्वर, चंदीगड, चेन्नई, गुवाहाटी, हैदराबाद, इम्फाळ, जयपूर, ईटानागर, जम्मू, कानपूर, कोहिमा, कोलकाता, लखनौ, मुंबई, नागपूर, नवी दिल्ली, पणजी, रायपूर, पटणा, शिलाँग, श्रीनगर, त्रिवेंद्रम या ठिकाणच्या बँका बंद असतील.


18 जून रोजी बँका असतील बंद 


बकरी ईदनंतर 18 जून 2024 रोजी जम्मू आणइ श्रीनगर येथे बँका बंद असतील. या भागात बकरी ईदच्या निमित्ताने सलग दोन दिवस बँका बंद असतात. त्यामुळे 17 आणि 18 जून रोजी येथे बँका बंद असतील. 


जून 2024 मध्ये या दिवशी बँका असतील बंद (June Month Bank Holiday)


22 जून 2024- महिन्याचा चौथा शनिवार असल्यामुळे बँका बंद असतील. 
23 जून 2024- रविवार असल्यामुळे बँका बंद असतील. 
30 जून 2024- रविवार  असल्यामुळे बँका बंद असतील.


दरम्यान, या काळात बँका बंद असल्या तरी ऑनलाईन बँकिंगची सुविधा चालूच राहणार आहे. मोबाईल आणि नेट बँकिंगच्या माध्यमातून ग्रहकांना त्यांची कामे करता येणार आहेत. रोख पैसे काढायचे असतील तर तुम्हाला एटीएमचाही वापर करता येईल. 


हेही वाचा :


18 जूनला शेतकऱ्यांना मिळणार 2000 रुपये, पण त्याआधी करावे लागणार 'हे' महत्त्वाचे काम; अन्यथा लाभ मिळणार नाही!


Credit Card Limit : क्रेडिट कार्डची मर्यादा कमी का होते? 'ही' आहेत पाच महत्त्वाची कारणं!


शेअरचे मूल्य 2 रुपयांपेक्षा कमी, पण एका आठवड्यात तब्बल 20 टक्क्यांनी रिटर्न्स, 'या' कंपनीचा जलवा