EPFO Members Data: देशात नोकऱ्यांची (Jobs) संख्या वाढत असल्याचं चित्र दिसत आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) याबाबतची आकडेवारी जाहीर केली आहे. या आकडेवारीनुसार, डिसेंबर 2023 मध्ये 15.62 लाख सदस्य EPFO मध्ये सामील झाले आहेत. गेल्या तीन महिन्यांतील हा उच्चांक आहे. त्यामुळं देशात नोकऱ्या वाढत असल्याचे स्पष्ट होत आहे. डिसेंबर 2022 च्या तुलनेत या आकडेवारीत 4.62 टक्क्यांची वाढ झाली आहे.
डिसेंबर 2023 मध्ये 8.41 लाख नवीन सदस्य EPFO मध्ये सामील
कामगार मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, डिसेंबर 2023 मध्ये 8.41 लाख नवीन सदस्य EPFO मध्ये सामील झाले आहेत. नोव्हेंबर 2023 च्या तुलनेत हा आकडा 11.97 टक्क्यांनी वाढला आहे. EPFO पेरोल डेटानुसार, या कालावधीत जोडलेल्या एकूण नवीन सदस्यांमध्ये 18 ते 25 वयोगटाचा वाटा 57.18 टक्के होता. यावरुन असे दिसून येते की देशातील संघटित क्षेत्रातील कार्यशक्तीमध्ये सामील होणारे बहुतांश सदस्य हे तरुण आहेत. तरुणांना नोकऱ्या देण्यात कंपन्या पुढे आहेत. आकडेवारीनुसार, डिसेंबर 2023 मध्ये EPFO योजनांमधून बाहेर गेलेले सुमारे 12.02 लाख सदस्य परत आले.
महिलांच्या संख्येत कमालीची वाढ
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, दर महिन्याला नवीन सदस्यांची संख्या झपाट्यानं वाढत आहे. त्यापैकी बहुतेकांना पहिल्यांदाच नोकरी मिळाली आहे. 8.41 लाख नवीन सदस्य जोडले गेले, त्यापैकी सुमारे 2.09 लाख महिला आहेत. ती पहिल्यांदाच ईपीएफओमध्ये सामील झाली आहे. डिसेंबर 2023 मध्ये एकूण 2.90 लाख महिला EPFO च्या सदस्य झाल्या आहेत. नोव्हेंबर 2023 च्या तुलनेत 3.54 टक्के वाढ झाली आहे.
कोणत्या राज्यात सर्वाधिक सदस्य?
महाराष्ट्र, गुजरात, तामिळनाडू, कर्नाटक आणि हरियाणामधून सर्वाधिक म्हणजे 58.33 टक्के सदस्य सहभागी झाले होते. नोव्हेंबर 2023 च्या तुलनेत EPFO मध्ये पुन्हा सामील झालेल्या लोकांची संख्या देखील 12.61 टक्क्यांनी वाढली आहे. जास्तीत जास्त EPFO सदस्य लोह आणि पोलाद, इमारत आणि बांधकाम, मनुष्यबळ पुरवठा, सुरक्षा सेवा आणि सामान्य विमा क्षेत्राशी संबंधित आहेत. EPFO दर महिन्याला हा डेटा जारी करते. सप्टेंबर 2017 पासून त्याची सुरुवात झाली. EPFO सदस्यांना आधारद्वारे युनिव्हर्सल अकाउंट नंबर (UAN) द्वारे क्रमांकित केले जाते. दरम्यान, यामध्ये मिळालेल्या माहितीनुसार, देशातील संघटित क्षेत्रातील कार्यशक्तीमध्ये सामील होणारे बहुतांश सदस्य हे तरुण आहेत. तरुणांना नोकऱ्या देण्यात कंपन्या पुढे आहेत.
महत्वाच्या बातम्या:
7th Pay Commission: EPFO ने व्याज दर वाढवले, केंद्र सरकार देणार आणखी एक 'गुड न्यूज'