Real Estate Job : अलिकडच्या काळात घरांच्या विक्रीत मोठी वाढ (Huge increase in homes sold) होताना दिसत आहे. जमीन खरेदी विक्रीचे व्यवहारात वाढ झाल्याची माहिती अहवालात देण्यात आली आहे. तसेच या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी देखील उपलब्ध होतायेत. या क्षेत्रात दररोज 8500 हून अधिक लोकांना रोजगार मिळत आहे. रिअल इस्टेट (Real Estate) सल्लागार Anarock आणि उद्योग संस्था NAREDCO यांनी एक संयुक्त अहवाल प्रसिद्ध केलाय. या अहवालात ही माहिती देण्यात आलीय. 


रिअल इस्टेट क्षेत्रात सध्या मोठ्या प्रमाणात तेजी 


रिअल इस्टेट क्षेत्रात सध्या मोठ्या प्रमाणात तेजी असल्याचं पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसापासून घरांच्या विक्रीत वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळं या क्षेत्रात रोजगाराच्या संधी दिवसेंदिवस वाढत आहेत. रेपो दराचा कोणताही परिणाम रिअल इस्टेट या क्षेत्रावर झालेला नाही. मागील 10 वर्षाच्या अहवालानुसार, या क्षेत्रात दररोज  8500 लोकांना नोकऱ्या मिळाल्या आहेत.  मागील 10 वर्षाचा विचार केला तर या क्षेत्रानं तीन कोटीहून अधिक रोजगार निर्माण केले आहेत.


रोजगारात वाढ होण्याचं कारण काय?


गृहनिर्माण क्षेत्रात दिवसेंदिवस मोठी वाढ होत आहे. गेल्या काही काळात घरांच्या मागणीतही वाढ झालीय. याचा परिणाम रोजगात देखील वाढ होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. मोदी सरकारच्या नेतृत्वाखाली झालेल्या अनेक सुधारणांमुळं या क्षेत्रात वाढ होत असल्याची माहिती अहवालात देण्यात आलीय. सरकारच्या धोरणामुळं हे क्षेत्र अधिक मजबुतीकडं वाटचाल करत असल्याची माहिती अहवालत सांगण्यात आलीय. 


देशातील एकूण कर्मचाऱ्यांमध्ये रिअल इस्टेट क्षेत्राचा वाटा हा 18 टक्क्यांहून अधिक


अहवालात दिलेल्या माहितीनुसार देशातील एकूण कर्मचाऱ्यांमध्ये रिअल इस्टेट क्षेत्राचा वाटा हा 18 टक्क्यांहून अधिक आहे. अहवालात दिलेल्या माहितीनुसार,  2014 ते 2023 या काळात 29.32 लाख युनिट्स बांधले गेले. यातील 28.27 लाख युनिट्सची विक्री झाली.  देशातील काही प्रमुख शहरांमध्ये घरांच्या विक्रीत लक्षणीय वाढ झालीय. दिल्ली-एनसीआर, मुंबई, कोलकाता, चेन्नई, बंगळुरु, हैदराबाद आणि पुणे या शहरात घरांच्या विक्रीत मोठी वाढ झालीय.


महत्वाच्या बातम्या:


Suraj Estate Developers IPO : भरघोस नफा कमावण्याची संधी! लवकरच येणार रिअल इस्टेट कंपनीचा आयपीओ, वाचा संपूर्ण माहिती