मुंबई: जिओब्लॅकरॉकम्युच्युअल फंडला सेबीनं चार नव्या पॅसिव्ह गुंतवणूक योजना सुरु करण्यास मंजुरी दिली आहे. कंपनीनं बुधवारी सेबीच्यावेबसाईटवर जारी केलेल्या रेग्युलटरीफायलिंगसंदर्भात माहिती दिली. जिओब्लॅकरॉक निफ्टी मिडकॅप150इंडेक्स फंडचा समावेश आहे. या योजनेनुसार ओपन-एंडेड फंड निफ्टी मिडकॅप150 इंडेक्सलाट्रॅक करण्यासह मिडकॅप कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली जाईल. मिडकॅपसेगमेंटमध्ये वेगवेगळ्या गुंतवणुकीचा पर्याय मिळेल.

जिओब्लॅकरॉक निफ्टी नेक्स्ट50 इंडेक्स फंडचा फोकस निफ्टी नेक्स्ट50 इंडेक्सवरकेंद्रीत असेल. यामध्ये मार्केटकॅपच्या आधारे 51 ते 100 रँक दरम्यानच्या कंपन्यांचा समावेश असेल. हा गुंतवणूकदारांना भविष्यात लार्जकॅपमध्ये सहभागी होणाऱ्या कंपन्यांमध्ये गुंतवणुकीची संधी मिळू शकते.

जिओब्लॅकरॉक निफ्टी स्मॉल कॅप 250 इंडेक्स फंड देखील आणला जाणार आहे. स्मॉल कॅप कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली जाणार आहे. हा फंड निफ्टी स्मॉल कॅप 250 निर्देशांकाचा भाग असेल. ही योजना लाँग टर्मकॅपिटलग्रोथची इच्छा असणाऱ्या आणि हाय रिस्कघेणाऱ्यागुंतवणूकदारांसाठी आहे.

जिओब्लॅकरॉक निफ्टी 8 ते 13 वर्ष जी-सेक इंडेक्स फंड ही चौथी योजना आहे. ही योजना दीर्घकालीन सरकारी गिल्ट्सलाट्रॅक करेल. याचा मॅच्युरिटीचा कालावधी 8 ते 13 वर्ष आहे. ही योजना निश्चित उत्पन्न असलेल्या गुंतवणूकदारांसाठी असेल.

ब्लॅकरॉकनं या योजनांना इंडेक्स फंडच्या रुपात डिझाइन केलं आहे. हे फंड केवळ डायरेक्टप्लॅन आणि ग्रोथऑप्शन या पर्यायात असेल. या योजनांमध्ये कोणताही एक्झिटलोड नसेल. गुंतवणुकीची किमान रक्कम 500 रुपये आहे. या सर्व योजनांद्वारे सेबीच्यानिर्देशांचं पालन केलं जाणार आहे. प्रत्येक फंडची ऑफरएनएफओद्वारेसुरु होईल. ही ऑफर3 ते 15 दिवस सुरु असेल. अद्याप याच्या तारखा जाहीर करण्यात आलेल्या नाहीत.

रिलायन्स इंडस्ट्रीजच्या मालकीच्या जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस आणि ब्लॅकरॉक या जगातील सर्वात मोठ्या असेट मॅनेजमेंट कंपनीनं50 टक्के समान भागीदारीतजिओब्लॅकरॉक या कंपनीची सुरुवात केली आहे. ही भागीदारी जुलै2023 मध्ये झाली होती. मे2025 पर्यंत म्युच्युअल फंड व्यवसाय सुरु करण्याची परवानगी यांना मिळाली होती. त्यानंतर जिओब्लॅकरॉकला गुंतवणूक सल्लागार आणि ब्रोकरेजफर्म म्हणून काम करण्यास परवानगी मिळाली आहे.

(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)