मुंबई : जारो इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजीजचा आयपीओ सबस्क्राईब करण्याचा शेवटचा दिवस आहे. आयपीओ सबस्क्राईब करण्याची सुरुवात 23 सप्टेंबरला झाली होती. तर, 25 सप्टेंबर म्हणजेच आयपीओ सबस्क्राईब करण्याची मुदत संपणार आहे. जारो कंपनीकडून आयपीओच्या माध्यमातून 450 कोटी रुपयांची उभारणी केली जाणार आहे. या कंपनीचा आयपीओ नॅशनल स्टॉक एक्सचेंज आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर  लीस्ट होणार आहेत. जारोचा आयपीओ 10 पट सबस्क्राईब झाला आहे.

Continues below advertisement

जारो इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी 450 कोटी रुपये आयपीओच्या माध्यमातून उभारणार आहे. आयपीओद्वारे कंपनी नवे शेअर आणि जुन्या शेअरची विक्री केली जाणार आहे. जारो कंपनी 170 कोटी रुपयांचे नवे शेअर जारी करणार आहे. तर ऑफर फॉर सेलद्वारे 280 कोटी रुपयांच्या शेअरची ऑफर फॉर सेलद्वारे विक्री करणार आहे. 

कंपनीनं जारी केलेल्या डीआरएपचीनुसार प्रमोटर संजय नामदेव साळुंखे यांच्याकडे कंपनीचे 78.2 टक्के शेअर आहेत. ते ऑफर फॉर सेलद्वारे 400 कोटींचे शेअर विकून त्यांचा वाटा कमी करणार आहेत.  नव्या शेअरची विक्री करुन कंपनीला जे पैसे मिळतील त्यातून कर्जाची परतफेड, मार्केटिंग, ब्रँड बिल्डींग आणि जाहिरात यासाठी वापरले जातील. 

Continues below advertisement

जारो इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजीच्या आयपीओचा किंमतपट्टा 846 ते 890 रुपये निश्चित करण्यात आला आहे. एका लॉटमध्ये 16 शेअर असतील. एका लॉटसाठी 14240 रुपयांची गुंतवणूक करावी लागेल.   

आयपीओ अलॉटमेंट 26 सप्टेंबर रोजी निश्चित केली जाऊ शकते. त्यानंतर शेअर आयपीओ ज्यांना अलॉट केला आहे, त्यांच्या डीमॅट खात्यात 29 सप्टेंबरला अलॉट केले जातील.  यानंतर 30 सप्टेंबरला आयपीओ बीएसई आणि एनएसईवर लिस्ट होईल. 

jaro institute ipo gmp : जारो आयपीओचा जीएमपी कितीवर?

जारो इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजीच्या आयपीओचा किंमतपट्टा 846 ते 890 रुपयांदरम्यान आहे. इन्वेस्टरग्रेन वेबसाईटनुसार आयपीओचा जीएमपी 23 सप्टेंबरच्या तुलनेत कमी होऊन 961 रुपयांवर पोहोचला आहे.

जारो एज्युकेशनची स्थापना 2009 मध्ये संजय साळुंखे यांनी केली होती. ते कंपनीचे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत. नामांकित शिक्षण संस्थांसोबत मिळून जार कडून तंत्रज्ञान केंद्रीत डिग्री कोर्सेस आणि प्रमाणपत्रक कोर्सेस चालवले जातात 31 मार्च 2024 च्या माहितीनुसार जारो एज्युकेशनची भारतातल्या महत्त्वाच्या शहरात 22 कार्यालयं आहेत. तर आयआयएममध्ये 15 स्टुडिओज आहेत. याशिवाय इतर शैक्षणिक संस्थांसोबत करार केले आहेत.    

(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)