Japan Nomad Visa : भारताचा जवळचा मित्र आणि आशियातील एक मोठी अर्थव्यवस्था असलेला जपान देश एक नवीन प्रकारचा डिजिटल व्हिसा लागू करणार आहे. त्याद्वारे डिजिटल मायग्रेटेड म्हणजे दुरस्थपणे काम करणारे नागरिक त्या देशात सहा महिने राहू शकणार आहेत आणि एक कोटीपर्यंत येन (जपानचे चलन) कमावू शकणार आहेत. जपानने याला डिजिटल नोमॅड व्हिसा असे नाव दिले असून त्याचा फायदा जगभरातले 49 देश घेणार आहेत. 


या व्हिसा अंतर्गत 49 देशांतील डिजिटल मायग्रेटेड नागरिक सहा महिने कायदेशीररीत्या जपानमध्ये राहू शकतात किंवा हे लोक जगभरातून कुठूनही दूरस्थपणे काम करून दरवर्षी 10 दशलक्ष जपानी येन (68,300 डॉलर्स) कमवू शकतात. असं असलं तरीही जपानच्या या डिजिटल नोमॅड व्हिसाच्या यादीत भारताचे नाव नाही ही धक्कादायक बाब आहे. त्यामुळे भारतीयांना याचा फायदा होणार नाही हे स्पष्ट आहे. 


या यादीत कोणते 49 देश ठेवण्यात आले आहेत?


पात्र देशांच्या यादीमध्ये सर्व युरोपियन युनियन देश, आर्मेनिया, बेलारूस, जॉर्जिया, आइसलँड, लिकटेंस्टीन, मोल्दोव्हा, मोनाको, उत्तर मॅसेडोनिया, नॉर्वे, सर्बिया, स्वित्झर्लंड, तुर्की आणि युनायटेड किंगडम यांचा समावेश आहे. मात्र बिझनेस टुडेने दिलेल्या वृत्तानुसार भारताचे नाव या यादीत नाही.


डिजिटल नोमॅड व्हिसा सेवा कधी सुरू होईल?


हा वर्क व्हिसा मार्च 2024 च्या अखेरीस उपलब्ध होईल आणि या अंतर्गत 49 देशांचे नागरिक सहा महिने जपानमध्ये कुठेही राहू शकतील आणि रिमोट पद्धतीने काम करून पैसे कमावू शकतील. हा व्हिसा ज्यांचे वार्षिक उत्पन्न 10 दशलक्ष येन (68,300 डॉलर्स) किंवा त्याहून अधिक आहे त्यांच्यासाठी आहे.


जपान टाईम्समधील एका अहवालात असं म्हटलं आहे की, डिजिटल स्थलांतरीत हे असे लोक आहेत जे दूरस्थपणे काम करतात. परंतु केवळ अल्पकालीन किंवा मध्यम मुदतीसाठी एकाच ठिकाणी राहतात. हे लोक 'स्पेशल ॲक्टिव्हिटिज' व्हिसा श्रेणीसाठी पात्र असतील. हे स्वयंरोजगार असलेल्या अर्जदारांना देखील लागू होते.


भारत या यादीतून का बाहेर आहे?


सध्या भारत या यादीतून बाहेर आहे आणि पात्र असलेल्या 49 देशांनी जपानशी कर करारावर स्वाक्षरी केली आहे किंवा त्यांना जपानमध्ये व्हिसा-मुक्त प्रवास मंजूर केला आहे. भारत हा निकष पूर्ण करत नाही आणि कदाचित याच कारणामुळे या यादीत भारताचा समावेश नाही.


ही बातमी वाचा: