नवी दिल्ली : भारतीय रेल्वेनं मेल आणि एक्सप्रेस गाड्यांमधील आरक्षित तिकीट बुकिंग संदर्भातील नियमांमध्ये बदल केले आहेत. 5 जानेवारीपासून या बदलांची अंमलबजावणी करण्यात आली आहे. आता या नियमाचा फायदा आधार पडताळणी पूर्ण असलेल्या यूजर्सला मिळेल. तर, ज्यांचं आयआरसीटीसी खातं आधार सोबत लिंक नसेल त्यांना सकाळी 8 ते  4 वाजेपर्यंत तिकीट आरक्षित म्हणजेत बुकिंग करता येणार नाही. 

Continues below advertisement

रेल्वेच्या नियमामुळं ज्या यूजर्सकडे  वेरिफाईड आधार कार्ड नसेल त्यांना अडचणींचा सामना करावा लागेल. कन्फर्म तिकीट मिळण्यात अडचणी येऊ शकतात. आयआरसीटीसीनं लागू केलेला नवा नियम आरक्षित तिकीट बुकिंग सुरु होण्याच्या पहिल्या दिवसासाठी लागू असेल. रेल्वेतील आरक्षित तिकिटाचं बुकिंग प्रवासाच्या तारखेच्या दोन महिने अगोदर म्हणजे 60  दिवस अगोदर सुरु होते. 

नव्या नियमानुसार ज्या यूजर्सनं आधार पडताळणी पूर्ण केली आहे, ते 60 दिवस अगोदर तिकीट बुक करु शकतात. एखाद्या यूजरनं आधार पडताळणी केली नसेल तर ते तिकीट बुक करता येणार नाही. याशिवाय 12 जानेवारीपासून सकाळी  8 ते रात्री 12 पासून असे यूजर्स तिकीट बुक करु शकणार नाहीत. 

Continues below advertisement

29 डिसेंबरपासून आयआरसीटीसीनं आधार पडताळणी केलेल्या यूजर्ससाठी बुकिंग शेड्यूल अपडेट केलं आहे. आधार पडताळणी केलेल्या यूजर्सला सकाळी 8 ते  4 वाजेपर्यंत तिकीट बुक करता येईल. तर, आधार पडताळणी न केलेल्या यूजर्सला 4 वाजल्यानंतर तिकीट बुक करता येणार आहे. पहिल्यांदा आधार पडताळणी केलेल्या यूजर्सला सकाळी 8 ते  12 पर्यंत बुकिंगची सोय उपलब्ध होती. 

आयआरसीटीसीनं आता 4 तासांचा वेळ वाढवून दिला आहे, ज्यामुळं आधार पडताळणी केलेल्या यूजर्सला फायदा होणार आहेत. भारतीय रेल्वेनं कन्फर्म तिकीट खऱ्या प्रवाशांना मिळावं, यासाठी हा नियम आणला आहे. ब्रोकर किंवा इतर दुसऱ्या संस्था याचा चुकीचा वापर करु नये यासाठी हे बदल करण्यात आला आहे. जे प्रवासी 60 दिवस अगोदर तिकीट बुक करतात, त्यांना कन्फर्म तिकीट मिळावं यासाठी हे बदल करण्यात आले आहेत.

नियम कसे बदलत गेले? 

रेल्वेनं 29 डिसेंबर 2025 ला पहिल्या टप्प्यात आधार पडताळणी केलेल्या यूजर्सना  सकाळी 8 ते 12 पर्यंत तिकीट बुकिंगची सुविधा देण्यात आली आहे. दुसऱ्या टप्प्यात म्हणजे 5 जानेवारी  2026 ला बुकिंगचा वेळ 8 ते 4 वाजेपर्यंत वाढवण्यात आला आहे. तिसरा टप्पा 12 जानेवारी  2026 पासून लागू होणार आहे. ज्यात 60 दिवस अगोदर तिकीट बुकिंग करणाऱ्यांसाठी वळ रात्री 12 पर्यंत वाढवली जाईल. 

आयआरसीटीसी यूजरला आधार लिंक करायचं असल्यास त्यासाठी आयआरसीटीसीच्या मोबाईल किंवा एपवर लॉगीन करावं लागेल. तिथं My Profile मध्ये जाऊन आधार केवायसी पर्याय निवडावा लागेल.  यानंतर आधार क्रमांक नोंदववा लागेल. यानंतर मोबाईलवर एक ओटीपी येईल. यानंतर ओटीपी नोंदवताच आयआरसीटीसी खात आधारशी लिंक होईल. 

ऑफलाईन बुकिंग जैसे थे 

रेल्वे काऊंटरवर तिकीट बुक करण्याचे नियम आहे तसेच ठेवण्यात आले आहेत. त्यात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. पहिल्यांदा आधार वेरिफाय यूजर्स फक्त 15 मिनिटं होती ती वाढवून  4 तास करण्यात आली आहे. आता  8 तासांची विंडो ऑनलाईन विंडो आधार पडताळणी असलेल्या यूजर्ससाठी उपलब्ध असेल. जनरल रिझर्व्हेशनच्या पहिल्यादिवशी पडताळणी केलेल्या यूजर्सला ऑनलाईन बुकिंग विंडो दुपारी 12 पर्यंत वाढवण्यात आली आहे.