Investment Plan : भविष्यात येणाऱ्या अडचणींचा सामना करण्यासाठी अनेकजण गुंतवणूक (Investment) करत आहेत. गुंतवणूक करताना नागरिक दोन गोष्टींचा विचार करतात. एकतर आपण केलेली गुंतवणूक सुरक्षीत आहे का? आणि दुसरी गोष्ट आपल्या रकमेवर परतावा किती मिळणार? काही बँका चांगला परतावा देतात तर काही कमी. तसेच अनेकजण म्युच्युअल फंडातही गुंतवणूक करतात. आज आम्ही तुम्हाला एक अशी पद्धत सांगणार आहोत, तिथं तुम्हाला फक्त 3 लाख रुपये गुंतवावे लागणार आहेत. तुम्ही निवृत्त झाल्यानंतर तुम्हाला तुमचा परतावा तुमच्या मासिक पेन्शनच्या बरोबरीनं मिळतो. 


पुढील 20 वर्षांसाठी सुरुवातीलाच 3 लाख रुपये गुंतवावे लागणार


तुम्हाला मासिक पेन्शन मिळण्यासाठी कशा पद्धतीनं गुंतवणूक करावी लागेल? गुंतवणुकीचं गणित काय? याबद्दल सविस्तर माहिती पाहुयात. मासिक पेन्शन सेट करण्यासाठी, तुम्हाला पुढील 20 वर्षांसाठी सुरुवातीलाच 3 लाख रुपये गुंतवावे लागतील. ही गुंतवणूक तुम्हाला कोणत्याही पेन्शन फंडात करायची नाही, तर म्युच्युअल फंडात करायची आहे. तुम्ही कोणताही सर्वोत्तम इंडेक्स फंड निवडून तुमचे पैसे जमा करू शकता. आजच्या काळात, म्युच्युअल फंड हाऊसेस सहजपणे 12 ते 15 टक्के परतावा देतात. असेही काही फंड आहेत जे दरवर्षी 30 ते 40 टक्क्यांपर्यंतचा परतावा देतात.


गुंतवणुकीचं गणित समजून घेऊयात


समजा तुमचे वय 20 ते 25 वर्षे आहे आणि तुम्ही पुढील 20 वर्षे म्हणजे 40 ते 45 वर्षे वयापर्यंत गुंतवणूक करता. जर तुम्हाला म्युच्युअल फंडातून सरासरी 15 टक्के परतावा मिळत असेल, तर पुढील 20 वर्षांत तुम्ही 49,09,961 रुपये (अंदाजे 49 लाख 10 हजार) चा निधी तयार कराल. मग तुम्ही रिटायर व्हायला गेल्यावर ते पैसे काढून एफडीमध्ये टाकू शकता.


दरमहा मिळू शकतात 31,500 रुपये 


FD मधून परतावा 7 ते 8 टक्के आहे. समजा तुम्हाला FD वर 7.5 टक्के परतावा मिळतो, तर तुम्हाला प्रति वर्ष 3,78,737 रुपये व्याज मिळेल, जे प्रति महिना 31,593 रुपये (31.5 हजार) असेल. म्हणजेच तुम्ही दरमहा 31,500 रुपये सहज कमवू शकाल.


महत्त्वाच्या बातम्या:


IIT मधून इंजिनियरिंग, 28 लाखांची नोकरी सोडून देशी कोंबड्यांचा व्यवसाय; 70 जणांना रोजगार