SBI Yojana : पैशांची गुंतवणुक (Investment) करण्यासाठी विविध बँकांनी (Bank) अनेक योजना सुरु केल्या आहेत. या योजनांच्या माध्यमातून गुतंवणुकदारांना चांगला फायदा होत आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाची (SBI) अशीच एक योजना आहे. या योजनेचा नागरिकांना चांगला फायदा होत आहे. अमृत कलश एफडी योजना (SBI Amrut Kalash FD Scheme) असं या योजनेचं नाव आहे. 400 दिवसांच्या गुंतवणुकीवर या योजनेवर 7.6 टक्के व्याज मिळत आहे. जाणून घेऊयात या योजनेबद्दल सविस्तर माहिती.
SBI ची ग्राहकांसाठी अमृत कलश एफडी योजना
SBI ने ग्राहकांसाठी अमृत कलश एफडी योजना सुरू केलीय. या योजनेचा गुंतवणुकदारांना चांगला लाभ मिळत आहे. या योजनेत गुंतवणूक केल्यास कोणताही धोका होत नाही. आपली ठेव सुरक्षीत राहते. तसेच चांगला परतावाही मिळतो. त्यामुळं या योजनेत गुंतवणूक करणं लोकांना फायद्याचं ठरत आहे. तुम्ही अमृत कलश एफडी योजनेत 400 दिवस गुंतवणूक करुन 7.6 टक्के व्याजदर मिळवू शकता. ग्राहकांमध्ये ही योजना खूप लोकप्रिय होत असल्याचं पाहायला मिळत आहे.
गुंतवणूक करण्याची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2024
दरम्यान, तुम्हाला तर अमृत कलश FD योजनेमध्ये गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही करु शकता. या योजनेत गुंतवणूक करण्याची अंतिम तारीख ही 31 मार्च 2024 होती. मात्र, आता बँकेने यामध्ये मुदतवाढ दिली आहे. बँकेने या योजनेला 1 एप्रिलपासून ते 30 सप्टेंबर 2024 पर्यंत या योजनेत आता गुंतवणूक करता येणार आहे. ही योजना एप्रिल 2023 मध्ये सुरु करण्यात आली होती. आत्तापर्यंत या योजनेचा कालावधी चार वेळा वाढवण्यात आला आहे. दरम्यान, ज्यांना गुंतवणूक करायची आहे, त्यांच्यासाठी आणखी सहा महिने शिल्लक आहे.
ज्येष्ठ नागरिकांना 7.60 टक्क्यांचा व्याजदर
तुम्ही जर एसबीआयच्या अमृत कलश योजनेत पैशांची गुंतवणूक केली तर 19 वर्षाच्या वरील सामान्य गुंतवणूकदारांना 400 दिवसांच्या कालावधीसाठी 7.10 टक्के व्याजदर मिळतो. 60 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या ज्येष्ठ नागरिकांना 7.60 टक्क्यांचा व्याजदर मिळत आहे. तुम्ही या योजनेत जास्तीत जास्त 2 कोटी रुपयांची गुंतवणूक करु शकता. दरम्यान, तुम्हाला जर या योजनेत मुदतीच्या आधी पैसे काढायचे असतील तरीदेखील तुम्ही पैसे काढू शकता. अशी तरतूद या योजनेत करण्यात आलीय.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमचे बँकेत खाते असणं गरजेचं आहे. खाते उघडण्यासाठी आधारकार्ड, वयाचा दाखला, उत्पन्नाचा पुरावा, मोबाईल क्रमांक, फोटो आणि ईमेल आयडी गरजेचा आहे. अर्ज करण्यासाठी तुम्ही बँकेत जाऊ शकता किंवा ऑनलाईनही अर्ज करु शकता.
महत्वाच्या बातम्या: