Investment Plan : अलिकडच्या काळात गुंतवणुकीचं (Investment) महत्व वाढत आहे. भविष्यातील विविध अडचणींचा सामना करण्यासाठी आत्तापासूनच गुंतवणूक करणं महत्वाचं आहे. लोक अनेक ठिकाणी गुंतवणूक करतात. विविध पॉलिसी (policy) असतील, शेअर मार्केट (Share Market) असेल, बँकांच्या काही योजना असतील अशा ठिकाणी लोक गुंतवणूक करत आहेत. अशातच एक गुंतवणूक म्हणजे म्युच्युअल फंड (Mutual fund). SIP म्हणजे सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनमध्ये जर तुम्ही पैशांची गुंतवणूक केली तर तुम्हाला चांगला फायदा मिळू शकतो. तुम्ही जर महिन्याला 3000 रुपयांची गुंतवणूक केली तर निवृत्तीनंतर तुम्हाला दरमहा 1.5 लाख रुपये मिळू शकतात. 


म्युच्युअल फंडामध्ये केलेली गुंतवणूक नागरिकांना फायदेशीर 


म्युच्युअल फंडामध्ये केलेली गुंतवणूक नागरिकांना खूप फायदेशीर ठरत आहे. चांगला परतावा मिळत असल्यानं याचा मोठा लाभ होतो. मोठ्या प्रमाणात पैसा मिळवण्यासाठी तुम्ही यामध्ये पद्धतशीरपणे पैशांची गुंतवणूक करु शकता. शेअर बाजारासारखे यामध्ये चढ उताराचा परिणाम होत नाही. ठरावीक रक्कम गुंतवायची कालावधी पूर्ण झाल्यावर त्याचा मोठा फायदा गुंतवणूकदारांना मिळतो. समजा तुम्ही जर 25 व्या वर्षी 3000 रुपये गुंतवणुकीला सुरुवात केली तर निवृत्तीनंतर तुम्हाला मोठी रक्कम मिळेल. तुमच्या गुंतवणुकीमध्ये चक्रवाढीचा फायदा होईल. तुम्ही महिना 3000 रुपये गुंतवले तर तुमच्या 35 व्या वर्षी 5 टक्के वाढीसह महिन्याताला तुमची 15,760 रुपयांची तुमची गुंतवणूक होईल. गुंतवणुकीच्या पहिल्या वर्षी तुम्ही 36000 रुपयांची गुंतवणूक करता, तर वयाच्या 35 व्या वर्षी तुमची गुंतवणूक ही  1.89 लाख रुपये होते. 


तुमच्या गुंतवणुकीवर सरासरी 12 टक्के परतावा, 35 वर्षात 3 कोटींचे मालक


दरम्यान, तुमच्या गुंतवणुकीवर सरासरी 12 टक्के जरी परतावा मिळाला तरी पुढच्या 35 वर्षात तुम्ही 32.51 लाख रुपये गुंतवाल आणि तुमची गुंतवणूक केलेली रक्कम 2.99 कोटी रुपये होईल. म्हणजे 35 वर्षात तुमची संपत्ती ही 3 कोटींच्या आसपास होईल. त्यामुळं म्युच्युअल फंडामध्ये केलेली गुंतवणूक तुमच्यासाठी मोठी फायद्याची ठरते. फक्त त्यासाठी तुम्हाला योग्य नियोजन करणं गरजेचं आहे. दरम्यान, अनेकांना म्युच्युअल फंड (Mutual Fund) म्हणजे नेमकं काय? याबाबतच माहिती नसेल. तर म्युच्युअल फंड म्हणजे लोकांनी गुंतवलेले पैसे एकत्रितरीत्या शेअर मार्केटमध्ये (Share Market) गुंतवले जातात. या पैशांवर मिळणारा लाभांश सर्वांना समान वाटून दिला जातो. यामध्ये पैशांची गुतवणूक केल्यास तुम्हाला चांगला परतावा मिळतो.


महत्वाच्या बातम्या:


सावधान! 31 मार्च जवळ, उरले फक्त 10 दिवस, 'ही' 6 कामं पूर्ण करण्याची शेवटची संधी