एक्स्प्लोर

भारतीय अर्थव्यवस्थेसाठी दिलासादायक बातमी, जपानच्या 'या' कंपनीने वर्तवला GDP वाढीचा अंदाज

भारतीय अर्थव्यवस्थेसाठी (Indian Economy) एक आनंदाची बातमी आहे. जपानच्या एका कंपनीनं अर्थव्यवस्थेबाबत अंदाज व्यक्त केला आहे.

Indian Economy : भारतीय अर्थव्यवस्थेसाठी (Indian Economy) एक आनंदाची बातमी आहे. जपानी (japan) ब्रोकरेज कंपनी नोमुराने (Nomura) चालू आर्थिक वर्ष 2023-24 (FY24) साठी भारताचा विकासदराचा अंदाज 5.9 टक्क्यांवरून 6.7 टक्क्यांपर्यंत वाढवला आहे. दुसऱ्या तिमाहीतील जीडीपीची अधिकृत आकडेवारी आल्यानंतर ही वाढ करण्यात आली आहे.

ब्रोकरेज कंपन्यांच्या अर्थतज्ज्ञांनी सांगितले की, आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये विकास दर 5.6 टक्क्यांपर्यंत कमी होण्याची अपेक्षा आहे. त्यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, निवडणुकीपूर्वी सार्वजनिक भांडवली भांडवल मंदावणे, ग्रामीण मागणीत घट आणि खासगी भांडवल बाजारातील घट, जागतिक मंदी यामुळे 2024-25 मध्ये विकासदरात घसरण होऊ शकते. जुलै ते सप्टेंबर दरम्यान, चालू आर्थिक वर्ष 2023-24 (FY24) च्या दुसर्‍या तिमाहीत, देशाची अर्थव्यवस्था 7.6 टक्के दराने वाढली आहे. एप्रिल ते जून या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत जीडीपी 7.8 टक्के होता. आर्थिक वर्ष 2022-23 च्या दुसऱ्या तिमाहीत GDP 6.3 टक्के होता. बहुतेक विश्लेषकांना अपेक्षा होती की, दुसऱ्या तिमाहीत जीडीपी वाढीचा दर सुमारे 6.8 टक्के असणार आहे. 

S&P ने GDP वाढीचा अंदाज वाढवला

रेटिंग एजन्सी S&P ग्लोबल रेटिंग्सने आर्थिक वर्ष 2024 साठी भारताचा सकल देशांतर्गत उत्पादन (GDP) वाढीचा अंदाज 6 टक्क्यांवरून 6.4 टक्क्यांपर्यंत वाढवला आहे. मजबूत देशांतर्गत घटकांमुळे रेटिंग एजन्सीने वाढीचा अंदाज वाढवला आहे. सध्या भारतीय अर्थव्यवस्थेत वाढ होत आहे. 

भारतीय अर्थव्यवस्थेत झपाट्यानं वाढ

सध्या भारतीय अर्थव्यवस्था (Indian Economy) झपाट्याने वाढत असल्याचं चित्र दिसत आहे. स्वातंत्र्याच्या 100 व्या वर्षात म्हणजे 2047 साली आपला भारत विकसनशील नव्हे तर विकसित देश म्हणू पुढे येईल. त्यावेळी भारताची अर्थव्यवस्था 30 ट्रिलियन डॉलर असणार आहे. अलीकडेच आपण 4 ट्रिलियन डॉलरच्या अर्थव्यवस्थेचा टप्पा पार केला आहे. विकसित देशाचा दर्जा मिळविण्यासाठी लवकरच 'व्हिजन डॉक्युमेंटरी' सादर केली जाणार आहे. त्यात भारत कोणत्या मार्गांवर हे लक्ष्य साध्य करेल याचा उल्लेख आहे. 

भारताचा विकास योग्य दिशेने सुरू

NITI आयोगाचे सीईओ बीव्हीआर सुब्रमण्यम यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारताचा विकास योग्य दिशेने सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी जानेवारी 2024 मध्ये Vision India@2047 डॉक्युमेंट आणणार आहेत. स्वातंत्र्याच्या 100 व्या वर्षात भारत कोणत्या मार्गांवर, सुधारणा आणि धोरणांच्या आधारे विकसित देश बनणार आहे, याचा त्यात उल्लेख असेल असे सुब्रमण्यम म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या:

Indian Economy: लवकरच 'व्हिजन डॉक्युमेंटरी' सादर होणार, भारतीय अर्थव्यवस्थेची स्थिती मांडली जाणार

महत्त्वाच्या बातम्या

LPG Refill Booking : ग्रामीण भागातील एलपीजी ग्राहकांना दिलासा, गॅस सिलेंडर बुकिंगच्या 45 दिवसांच्या नियमात बदल, नवी अपडेट जाणून घ्या
ग्रामीण भागातील एलपीजी ग्राहकांना दिलासा, गॅस सिलेंडर बुकिंगच्या 45 दिवसांच्या नियमात बदल, नवी अपडेट जाणून घ्या
Gold Silver Price: सोने-चांदीचे दर अवघ्या एका महिन्यात भिडले गगनाला; तब्बल 'इतक्या' हजारांची झाली वाढ; जाणून घ्या कारणं अन् पुढील काळात बाजारात कशी असेल परिस्थिती
सोने-चांदीचे दर अवघ्या एका महिन्यात भिडले गगनाला; तब्बल 'इतक्या' हजारांची झाली वाढ; जाणून घ्या कारणं अन् पुढील काळात बाजारात कशी असेल परिस्थिती
SBI Recruitment: स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये भरतीची तयारी सुरु, वर्षभरात 12 हजार नव्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती होणार, बँकेत सध्या किती कर्मचारी?
स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये भरतीची तयारी सुरु, वर्षभरात 12 हजार नव्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती होणार
Bank of Baroda : गुड न्यूज, बँक ऑफ बडोदामध्ये 1100 जागांवर भरती, 67 हजारांपासून पगार सुरु 
गुड न्यूज, बँक ऑफ बडोदामध्ये 1100 जागांवर भरती, 67 हजारांपासून पगार सुरु 

व्हिडीओ

Maharashtra Drought : पावसाअभावी दशा, आता कृत्रिम पावसाची आशा?
Pune MPSC Students Protest : एमपीएससीवर रोष विद्यार्थ्यांचा आक्रोश! | Special Report ABP Majha
Manoj Jarange Andolan : लढाई आरक्षणाची चर्चा जरांगेंच्या भाषेची | Special Report ABP Majha
Pune DJ Morcha : पुण्यात डीजेविरोधात मोर्चा, विद्यानंद बापटांच्या दांडीची चर्चा | Special Report ABP Majha
Manoj Jarange Uposhan : जरांगेंची आरपारची लढाई, मिशन आरक्षण Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
UP Hira Thakur : हिरा ठाकूर यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश, निवडणुकीआधीच भाजपला मोठा धक्का
हिरा ठाकूर यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश, निवडणुकीआधीच भाजपला मोठा धक्का
Jalgaon Dahihandi Row : 51 हजारांचे बक्षीस दाखवून दिले फक्त 5 हजार रुपये! जळगावात गोविंदांचे भररस्त्यात आंदोलन
51 हजारांचे बक्षीस दाखवून दिले फक्त 5 हजार रुपये! जळगावात गोविंदांचे भररस्त्यात आंदोलन
Non Veg In Durga Puja : आमच्या लोकांनी काय खायचं हे बाहेरुन आलेल्या धर्मगुरूने शिकवू नये, भाजप प्रदेशाध्यक्षांचा बागेश्वर बाबांना टोला
आमच्या लोकांनी काय खायचं हे बाहेरुन आलेल्या धर्मगुरूने शिकवू नये, भाजप प्रदेशाध्यक्षांचा बागेश्वर बाबांना टोला
MPSC Paper Leak : एक जरी पुरावा दिला तरी क्षणभरही पदावर राहणार नाही; विद्यार्थ्यांच्या आक्रोश मोर्चानंतर MPSC अध्यक्ष भीमनवार यांची भूमिका
एक जरी पुरावा दिला तरी क्षणभरही पदावर राहणार नाही; विद्यार्थ्यांच्या आक्रोश मोर्चानंतर MPSC अध्यक्ष भीमनवार यांची भूमिका
कुणबीच्या 58 लाख नोंदी ग्रामपंचायतीमध्ये प्रसिद्ध होणार, 36 जिल्ह्यात शिबीर; मनोज जरांगेंच्या आंदोनलाबाबत मंत्री विखे पाटलांनी दिली माहिती
कुणबीच्या 58 लाख नोंदी ग्रामपंचायतीमध्ये प्रसिद्ध होणार, 36 जिल्ह्यात शिबीर; मनोज जरांगेंच्या आंदोनलाबाबत मंत्री विखे पाटलांनी दिली माहिती
जागतिक फिजिओथेरपी दिन; ‘वर्क फ्रॉम होम’ अंगलट येतय का? पाठदुखीच्या समस्या वाढल्याचं समोर
जागतिक फिजिओथेरपी दिन; ‘वर्क फ्रॉम होम’ अंगलट येतय का? पाठदुखीच्या समस्या वाढल्याचं समोर
Pakistan Cricket Crisis : 'भारताविरुद्धचा 'तो' विजयच आमचा काळ ठरला!' पाकिस्तान क्रिकेटच्या उद्ध्वस्तावर मोहम्मद युसूफला अश्रू अनावर
'भारताविरुद्धचा 'तो' विजयच आमचा काळ ठरला!' पाकिस्तान क्रिकेटच्या उद्ध्वस्तावर मोहम्मद युसूफला अश्रू अनावर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 सप्टेंबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 सप्टेंबर 2026 | सोमवार
Embed widget