Top 5 rich family Bollywood : तुम्हाला देशातील सर्वात श्रीमंत व्यक्तींची नावे ( Rich family Bollywood) माहीत असतीलच. उद्योगपती मुकेश अंबानी आणि गौतम अदानी ही आपल्या देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे. पण तुम्हाला बॉलिवूडमधील टॉप श्रीमंत घराण्यांबद्दल माहिती आहे का? आज आम्ही तुम्हाला याबातची माहिती सांगणार आहोत. 


बॉलीवूडच्या पहिल्या घराण्यापासून म्हणजे 'कपूर कुटुंबा'पासून ते त्यांच्या नातेवाईकांपर्यंत म्हणजेच 'हाऊस ऑफ पतौडी'पर्यंत चित्रपट जगतात अनेक श्रीमंत कुटुंबे आहेत. यामध्ये शाहरुख खान आणि अमिताभ बच्चन यांच्या नावाचाही समावेश आहे. पण हे बॉलीवूडचे सर्वात श्रीमंत कुटुंब आहे का? पाहुयात बॉलीवूडमधील टॉप-5 श्रीमंत कुटुंबे.


कपूर कुटुंबातील 'अ‍ॅनिमल' फेम रणबीर कपूर सध्या त्याच्या कुटुंबातील सर्वात यशस्वी व्यक्ती आहे. याआधी संपूर्ण बॉलिवूड त्याच्या दोन बहिणी करिश्मा कपूर आणि करीना कपूर यांच्याभोवती फिरत होते. कपूर घराण्याचं बॉलिवूडवर दीर्घकाळ राज्य होतं. अशा परिस्थितीत त्याची संपत्ती अफाट आहे. तसेच सैफ अली खान हा 'हाऊस ऑफ पतौडी'चा धाकटा नवाब देखील आहे. त्याचे कुटुंब देखील बॉलिवूडमधील सर्वात श्रीमंत कुटुंबांपैकी एक आहे.


रणबीर कपूर की सैफ अली खान? दोघांमध्ये श्रीमंत कोण


रणबीर कपूर सध्या 'अ‍ॅनिमल' या चित्रपटाच्या यशाचा आनंद घेत आहे. त्याची वैयक्तिक संपत्ती सुमारे 600 कोटी रुपये आहे. तर त्याचा मेहुणा म्हणजेच सैफ अली खानची एकूण संपत्ती 1,200 कोटी रुपये आहे. कपूर कुटुंबात आणखी बरेच लोक सामील आहेत ज्यात राज कपूर ते शशी कपूर यांच्या कुटुंबाचा समावेश आहे. शशी कपूर यांच्या मुलांकडे मुंबईतील प्रसिद्ध 'पृथ्वी थिएटर' आणि 'पृथ्वी हाऊस' आहेत. तर काही वर्षांपूर्वीपर्यंत 'आरके स्टुडिओ' रणबीर कपूरचे वडील ऋषी कपूर यांच्या मालकीचा होता. तसेच सैफ अली खान हा गुरुग्रामजवळील 'पतौडी स्टेट'चा वंशज आहे. म्हणूनच त्याच्याकडे वारसाहक्काने प्रचंड संपत्ती आहे. त्यांची आई शर्मिला टागोर आणि बहीण सोहा अली खान यांचाही कौटुंबिक मालमत्तेत हिस्सा आहे.


बॉलीवूडची टॉप-5 श्रीमंत कुटुंबं कोणती?


बॉलीवूडमधील सर्वात श्रीमंत कुटुंब म्हणजे 'चोप्रा कुटुंब'. होय, यशराज बॅनरचा मालक आदित्य चोप्रा 7500 कोटींचा आहे. जर आपण संपूर्ण चोप्रा कुटुंबाची एकूण संपत्ती पाहिली तर यशराज फिल्म्स स्टुडिओच्या मूल्यासह ते 15,000 कोटी रुपयांचे मालक आहेत.


शाहरुख खानचे नाव बॉलीवूडच्या टॉप श्रीमंत कुटुंबांमध्ये समाविष्ट आहे. त्यांची संपत्ती जवळपास 6500 कोटी रुपये आहे.


बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेते अमिताभ बच्चन यांची एकूण संपत्ती 3500 कोटी रुपये आहे.


संपत्तीच्या बाबतीत अक्षय कुमारही मागे नाही. त्यांची एकूण संपत्ती 3000 कोटींहून अधिक आहे.


सलमान खानची संपत्ती सुमारे 2000 कोटी रुपये आहे. तो वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरुन पैसे कमावतो.


धर्मा प्रॉडक्शनचा मालक करण जोहर देखील बॉलिवूडमधील श्रीमंत कुटुंबांपैकी एक आहे. त्यांची एकूण संपत्तीही 1800 कोटी रुपये आहे.


महत्त्वाच्या बातम्या:


Salaar Box Office Collection : प्रभासच्या 'सालार'चा जगभरात डंका! दोन दिवसांत पार केला 100 कोटींचा टप्पा