India Maldives Trade News: देशात उत्पादीत झालेली उत्पादने भारत (India) विविध देशांना निर्यात करत असतो. या माध्यमातून भारताचा इतर देशांशी मोठा व्यापार चालतो. अशातच भारताने मालदीवला (Maldives) मदतीचा हात पुढे केला आहे. भारत मालदिवला आता तांदूळ, गहू, साखर आणि कांद्याची निर्यात करणार आहे. मालदीव सरकारनं जीवनावश्यक वस्तू ( export essential commodities) पाठवण्याची विनंती भारताला केली होती, त्यानुसार भारताने मालदीवला मदत करण्याचा निर्णय घेतलाय.
भारत गहू, तांदूळ, कांदा, साखर या वस्तूंची मालदीवला निर्यात करणार
भारत-मालदीव यांच्यात एक महत्वाचा करार झाला आहे. या करारानुसार भारत मालदीवला जीवनावश्यक वस्तूंची निर्यात करणार आहे. यामध्ये गहू, तांदूळ, कांदा, साखर या वस्तूंचा समावेश आहे. दरम्यान, भारतानं या सर्व वस्तूंच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. अशा स्थितीत भारतानं मालदीवला या वस्तू निर्यात करण्याचा निर्णय घेतलाय. यामाध्यमातून भारत-मालदीव यांच्यातील व्यापार वाढणार आहे. तसेच या व्यापारातून मोठी उलाढाल होणार आहे.
भारत हा साखर, तांदूळ आणि कांद्याचा सर्वात मोठा निर्यातदार देश
दरम्यान, मालदीवने भारताला जीवनावश्यक वस्तूंची निर्यात करण्याची विनंती केली होती. त्यानुसार भारतानं मालदीवला जीवनावश्यक वस्तू निर्यात करण्याचा निर्णाय घेतलाय. मात्र, भारत मर्यादीतच निर्यात करणार असल्याची माहिती मिळतेय. दरम्यान, भारत हा साखर, तांदूळ आणि कांद्याचा सर्वात मोठा निर्यातदार देश आहे. दरवर्षी मोठ्या प्रमाणात देशातून या वस्तूंची परदेशात निर्यात केली जाते. अनेक शेजारील देश भारतावर अवलंबून आहेत. दरम्यान, सध्या भारतानं अनेक जीवनावश्यक वस्तूंच्या निर्यातीवर बंदी घातलीय. तर काही वस्तूंच्या निर्यातीवर मर्यादा लावण्यात आल्या आहेत. देशांतर्गत बाजारात कोणत्याही वस्तूंच्या दरात वाढ होऊ नये याचा प्रयत्न सरकार करत आहे.
कोणत्या वस्तूची किती निर्यात होणार?
मिळालेल्या माहितीनुसार आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये भारताकडून मालदीवला मोठ्या प्रमाणात निर्यात केली जाणार आहे. भारताकडून मालदीवला 35749 टन कांदा, 64494 टन साखर, 1 लाख 24 हजार 218 टन तांदूळ आणि 1 लाख 9 हजार 162 टन गहू मालदीवला निर्यात केला जाणार आहे. दरम्यान, मालदीव देखील भारताला वाळू आणि दगड निर्यात करणार आहे. मालदिव भारताला 10 लाख टन वाळू आणि दगडांचा पुरवठा करणार आहे.
संबंध चांगले नसतानाही भारताची मदत
दरम्यान, भारत आणि मालदीव यांचे संबंध एवढे चांगले नाहीत. काही प्रमाणात संबंध बिघडलेले आहेत. अशा काळात भारत मालदीवला सहकार्य करणार आहे. मालदीवमध्ये नवीन सरकार स्थापन झालं आहे. हे नवीन सरकार चीनकडे झुकल्याचे मानले जात आहे. मालदीवचे नवीन राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइझू यांनी नुकतीच चीनला भेट दिलीय. पण दरवेळी मालदिवचे नवीन राष्ट्राध्यक्ष भारताला भेट देत असतात. पण यावेळी चीनला भेट दिली आहे.
महत्वाच्या बातम्या: