RBI Data, India Forex Reserves : चलन बाजारात डॉलरच्या (Dollar) तुलनेत रुपया (Rupee) मजबूत झाला आहे. शुक्रवारी रुपया 6 पैशांनी मजबूत झाला आणि 82.92 च्या पातळीवर बंद झाला. गेल्या आठवड्याच्या घसरणीनंतर या आठवड्यात परकीय चलनसाठ्यात (Foreign Currency Reserves) वाढ झाली आहे. गेल्या आठवड्याच्या घसरणीनंतर या आठवड्यात परकीय चलनसाठ्यात (Foreign Currency) वाढ झाली आहे. बँकिंग क्षेत्र नियामक भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (RBI) माहितीनुसार, 26 जानेवारी 2024 ला संपलेल्या आठवड्यात, परकीय चलन साठ्यात 591 दशलक्ष डॉलरने वाढ झाली आहे. यामुळे परकीय चलन साठा 616.733 अब्जांवर पोहोचला आहे.


परकीय चलनाच्या साठ्यात वाढ


भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) शुक्रवार, 2 फेब्रुवारी 2024 ला परकीय चलनाच्या साठ्याची ताजी आकडेवारी जाहीर केली आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (RBI) नवीन आकडेवारीनुसार, 26 जानेवारी रोजी संपलेल्या आठवड्यात परकीय चलनाचा साठा (Foreign Currency) सुमारे 591 दशलक्ष डॉलर्सने वाढला आहे. देशाचा परकीय चलन साठी 616.733 अब्ज डॉलरवर पोहोचला आहे. यापूर्वी 19 जानेवारीला संपलेल्या आठवड्यात परकीय चलनाचा साठा 2.79 अब्ज डॉलरने घसरून 616.14 अब्ज डॉलरवर आला होता. 


परकीय चलन साठा 616.73 अब्ज डॉलरवर


या आठवड्यात मात्र, परकीय चलन साठ्यासह परकीय चलन मालमत्तेतही वाढ झाली आहे. परकीय चलन मालमत्ता 289 दशलक्ष डॉलर्सने वाढून 546.14 अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. दरम्यान, आरबीआयच्या सोन्याच्या साठ्यातही वाढ झाली आहे. सोन्याचा साठा 269 दशलक्ष डॉलरने वाढून 47.48 अब्ज डॉलर झाला आहे. SDR (Special Drawing Rights Currency) 27 दशलक्ष डॉलरची उडी घेऊन 18.24 अब्ज डॉलर झाला आहे. तर आंतरराष्ट्रीय नाणेनिधी मध्ये (IMF) जमा असलेला चलन साठा 6 दशलक्ष डॉलर्सने वाढून 4.86 अब्ज डॉलरवर पोहोचला आहे.


परकीय चलनाच्या साठ्याचा 645 अब्ज डॉलर्सचा उच्चांक


चलन बाजारात नियामक RBI च्या हस्तक्षेपानंतर, परकीय चलन मालमत्तेत बदल दिसून येत आहेत. RBI च्या निर्णयामुळे, परकीय चलन मालमत्तेत वाढ किंवा घट होते, ज्यामुळे भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (RBI) परकीय चलनाच्या साठ्यावर परिणाम होतो. ऑक्टोबर 2021 मध्ये परकीय चलनाच्या साठ्याने 645 अब्ज डॉलर्सचा उच्चांक गाठला होता.


चलन बाजारात डॉलरच्या तुलनेत रुपया मजबूत झाला आहे. रुपया 6 पैशांनी मजबूत झाला आणि एका डॉलरच्या तुलनेत 82.92 च्या पातळीवर बंद झाला. हा गेल्या सत्रात 82.98 च्या पातळीवर होता.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


PayTm Bank Latest Updates : पेटीएम पेमेंट्स बँकेचा परवानाही रद्द होणार? आरबीआयच्या कारवाईबाबत मोठी अपडेट