नवी दिल्ली : केंद्र सरकारनं विदेशातून भारतात सोनं परत आणणाऱ्या नागरिकांसाठी बॅगेज नियम दुरुस्त आणि सोपे केले आहेत. भारत सरकारनं बॅगेज नियम 2026 नोटिफाय केले आहेत. फायनान्शिअल एक्स्प्रेसनं याबाबत वृत्त दिलं आहे. नव्या कस्टम बॅगेज नियमांमध्ये किमतीची मर्यादा शिथील करत दागिन्याच्या वजनाची मर्यादा घातली आहे. 

Continues below advertisement

Gold Rules : केंद्रानं नियम बदलला

नव्या नियमानुसार केंद्र सरकारनं विदेशातून परत भारतात येत असताना दागिने आणायचे असतील तर त्यासाठीचा जुनी पैशांची मर्यादा हटवली आहे. त्याऐवजी वजनाची मर्यादा टाकली आहे. नियमानुसार पात्र असलेले भारतीय वंशाचे पर्यटक आणि नागरिक देशात परत येत असताना, जे एक वर्षाहून अधिककाळ विदेशात राहिले आहेत. त्यांना आयात शुल्काशिवाय दागिने आणता येऊ शकतात, यासाठी वजनाची मर्यादा आहे. 

महिला प्रवासी भारतात येणार असेल तर ती 40 ग्रॅम सोन्याचे दागिने भारतात आणू शकते. म्हणजे  4 तोळे सोनं आयात शुल्काशिवाय आणू शकते. महिलांशिवाय इतर प्रवासी म्हणजेच पुरुष 20 ग्रॅम दागिने आणू शकतात. 15 वर्षाखालील मुलं देखील 40 ग्रॅम म्हणजे 4 तोळे सोनं आयात शुल्क न देता आणू शकतात. 

Continues below advertisement

केंद्रानं नव्या नियमांमध्ये बदल करताना जुनी रकमेची मर्यादा काढून टाकली आहे. त्याठिकाणी वजनाची मर्यादा घालण्यात आली आहे. पहिल्यांदा महिलांना 1 लाख रुपयांचं सोनं भारतात आणता येत होतं. नव्या नियमानुसार 4 तोळं सोनं आयात शुल्काशिवाय म्हणजेच 6 लाख रुपयांचं सोनं (सध्याच्या दरानुसार) भारतात महिला आणू शकतात. 

जुन्या नियमानुसार भारतीय पासपोर्ट  धारक पुरुष 20 ग्रॅम म्हणजे 2 तोळं सोनं आयात शुल्काशिवाय घेऊन येऊ शकत होता. मात्र, त्याला  किमतीची मर्यादा 50000 रुपयांची होती. तर, महिला आणि मुलांना 4 तोळं सोनं आणता येत होतं. मात्र, त्यांच्यासाठी किंमत मर्यादा 100000 रुपये होती. 

नव्या बदलांनुसार भारतीय पासपोर्ट धारक व्यक्ती एखादी महिला 4 तोळे सोने आयात शुल्काशिवाय आणता येईल. तर, 20 ग्रॅम तोळे सोने पुरुष आणू शकतात. यावरील किमतीची मर्यादा हटवून वजनाची मर्यादा घालण्यात आली आहे. 

24 कॅरेट सोन्याचा एका तोळ्याचा दर सध्या 1,50,000 वर आहे. 40 ग्रॅम सोने विदेशातून भारतात आणता येणार म्हणजे 6 लाख रुपयांपर्यंतचं सोनं भारतात एखादी महिला आणि 15 वर्षांखालील मुलगा आणू शकतो.

विदेशातून सोनं आणायचं असल्यास किती कर द्यावा लागतो? 

भारतात विदेशातून सोनं आणायचं असल्यास 6 टक्के आयात शुल्क, कस्टम ड्युटी 9 टक्के शिवाय अतिरिक्त सेस आणि जीएसटी द्यावा लागतो. भारतात परत येताना सोने आणि दागिने घेऊन येणार असाल तर तुमच्याकडे खऱ्या पावत्या असणं आवश्यक आहे.