Indigo Airline मुंबई : विमान कंपनी इंडिगोला आयर विभागानं दणका दिला आहे. आयकर विभागानं इंडिगोची मालक कंपनी असलेल्या 944.20 कोटी रुपयांच्या दंडाची नोटीस दिली आहे. कंपनीनं या आदेशाला चुकीचं ठरवत कोर्टात आव्हान देण्याची भूमिका घेतली आहे. आयकर विभागानं ही नोटीस इंटरग्लोब एविएशन कंपनीला दिली आहे.  

नेमकं प्रकरण काय?

इंडिगोनं एका नियामक फायलिंगमध्ये म्हटलं की आयकर विभागानं असेसमेंट वर्ष 2021-22 साठी 944.20 कोटी रुपयांच्या दंडाचे आदेश मंजूर केले आहेत. कंपनीनं यामध्ये पुढं म्हटलं की हे आदेश चुकीच्या समजुतीवर आधारित आहेत.  कंपनीनं त्यांच्या 143(3) च्या आदेशा विरोधात अपील केलं होतं. ते अपील आयकर उपायुक्त (अपील)  CIT(A) यांच्याकडून फेटाळण्यात आलं. याप्रकरणी खरं तर प्रकरण प्रलंबित असून यावर निर्णय येणं बाकी आहे, असं कंपनीनं म्हटलं.  

इंडिगोच्या शेअरमध्ये घसरण

कंपनीनं दाखल केलेल्या कागदपत्रांनुसार, आयकर विभागाद्वारे जारी करण्यात आलेले आदेश कायद्याला धरुन नसून त्यामध्ये त्रुटी आहेत. इंडिगोनं या आदेशाविरुद्ध योग्य कायदेशीर पावलं उचलण्याचा निर्णय गेतला आहे.  या आदेशामुळं कंपनीची आर्थिक स्थिती,नियमित कामकाज आणि इतर कामांवर परिणाम होणार नाही, असं कंपनीचं म्हणणं आहे. मात्र, यामुळं इंडिगोच्या शेअरमध्ये घसरण झाली आहे. 

शुक्रवारी इंडिगोच्या शेअरमध्ये 0.54 टक्क्यांची घसरण झाली. इंडिगोचे शेअर शुक्रवारी बाजाराचं कामकाज बंद झालं तेव्हा 5100 रुपांवर होते. कंपनीच्या स्टॉकमध्ये गेल्या महिन्या भरात 14 टक्क्यांची तेजी आली आहे. गेल्या 6 महिन्यात गुंतवणूकदारांना 6.5 टक्के आणि एका वर्षात 43 टक्के रिटर्न मिळाला आहे. गेल्या पाच वर्षांचा विचार केला तर इंडिगोच्या शेअरनं 400 टक्के रिटर्न दिले आहेत.

इतर बातम्या : 

ChatGPT वरुन फोटो बनवण्याचा ट्रेंड, घिबलीचं जपान कनेक्शन, अ‍ॅनिमेशन स्टुडिओच्या मालकाचं वक्तव्य, मला पूर्ण वैताग...

सरकार 6 महिन्यात तब्बल 8 लाख कोटींचे कर्ज घेणार, कुठे खर्च होणार एवढा पैसा?  जाणून घ्या सविस्तर माहिती