एक्स्प्लोर

राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्यांना आयकर विभागाचा झटका, कर चुकवणाऱ्यांची होणार अडचण

राजकीय पक्षांना (Political parties) देणगी (donate) देणाऱ्यांना आयकर विभागानं (Income tax) झटका दिला आहे. बोगस राजकीय पक्षांना देणग्या दिल्याचा संशय असलेल्या अनेक करदात्यांना नोटिसा बजावल्या आहेत.

Income Tax Notice: राजकीय पक्षांना (Political parties) देणगी (donate) देणाऱ्यांना आयकर विभागानं (Income tax) झटका दिला आहे. आयकर वाचवण्यासाठी बोगस राजकीय पक्षांना देणग्या दिल्याचा संशय असलेल्या अनेक करदात्यांना आयकर विभागाने नोटिसा बजावल्या आहेत. त्यामुळं राजकीय पक्षांच्या नावाने कर चुकविणाऱ्यांची अडचण होणार आहे. आयकर विभागाला करदात्यांनी देणगीच्या तरतुदीचा कर चुकवण्यासाठी किंवा निधीचा गैरवापर करण्यासाठी गैरवापर केल्याचा संशय आहे. त्यामुळं या नोटीसा बजावल्या आहेत. 

आत्तापर्यंत पाठवल्या 5 हजार नोटिसा 

आयकर विभागानं राजकीय पक्षांना देणगी देमाऱ्यांच्या बाबतीत मोठा निर्णय घेतला आहे. अनेक करदात्यांना आयकर विभागानं नोटिसा बजावल्या आहेत. ज्यांनी राजकीय पक्षांना देणगी दिली आहे, ज्यांची नोंदणी आहे, परंतू, निवडणूक आयोगाची मान्यता नाही. 2020-21 आणि आर्थिक वर्ष 2021-22 साठी प्राप्तिकर विभागाने या नोटिसा पाठवल्या आहेत. निनावी पक्षांना दिलेल्या या देणग्या करचोरी आणि निधीच्या गैरवापरासाठी आहेत का? हे विभागाला जाणून घ्यायचे आहे. आयकर विभागाला संशय आल्यानं या नोटीसा पाठवल्या आहेत. अहवालानुसार, आर्थिक वर्ष 2020-21 आणि आर्थिक वर्ष 2021-22 साठी प्राप्तिकर विभागाने आतापर्यंत सुमारे 5 हजार नोटिसा पाठवल्या आहेत. विभाग आणखी संशयित करदात्यांना नोटिसा पाठवणार आहे. येत्या काही दिवसांत निनावी राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या इतर अनेक करदात्यांनाही आयकर नोटिसा मिळू शकतात.

20 राजकीय पक्षांशी संबंधित प्रकरणे

आयकर रडारवर किमान 20 राजकीय पक्षांना देणगी देणारे करदाते आहेत. या राजकीय पक्षांची नोंदणी झाली आहे, मात्र, त्यांना अद्याप निवडणूक आयोगाकडून मान्यता मिळालेली नाही. संबंधित प्रकरणांमध्ये, आयकर विभाग संशयास्पद बनला आहे. कारण, ज्या पद्धतीनं देणगी देण्यात आली आहे, ती करदात्यांच्या उत्पन्नाशी जुळत नाही. काही प्रकरणांमध्ये, पक्षांनी करदात्यांना रोख स्वरुपात पैसे देखील परत केले आहेत.

राजकीय पक्षांना देण्यात येणाऱ्या देणग्यांवरील करात सूट

प्राप्तिकर कायदा राजकीय पक्षांना देण्यात येणाऱ्या देणग्यांवरील करातून सूट देतो. जर करदात्यानं राजकीय पक्ष किंवा निवडणूक ट्रस्टला देणगी दिली, तर त्या देणगीच्या बदल्यात 100 टक्के कपातीचा दावा केला जाऊ शकतो. याला सामान्य भाषेत निवडणूक देणगी असेही म्हणतात. मात्र, यामध्ये एक अट आहे की, कोणत्याही करदात्याने दिलेली एकूण निवडणूक देणगी त्याच्या एकूण उत्पन्नापेक्षा कमी असली पाहिजे. निवडणुकीतील देणग्यांचा करचोरी आणि मनी लाँड्रिंगसाठी गैरवापर झाल्याची प्रकरणे यापूर्वीही उघडकीस आली आहेत. अलीकडे, आयकर विभागाला अशी अनेक प्रकरणे आढळून आली आहेत. ज्यात उत्पन्नापेक्षा जास्त देणग्या दिल्या गेल्या आहेत किंवा एकूण उत्पन्नाच्या 80 टक्क्यांपर्यंत देणगी म्हणून दाखविण्यात आले आहे.

महत्वाच्या बातम्या:

कसं कराल आयकर बचतीचं नियोजन? 'या' 5 पर्यायांचा वापर करा, आयकर वाचवा

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

राष्ट्रीय महामार्गांवरुन प्रवास करणं महागालं! 1 एप्रिलपासून वार्षिक टोल पासच्या किंमतीत वाढ, जाणून घ्या सविस्तर माहिती
राष्ट्रीय महामार्गांवरुन प्रवास करणं महागालं! 1 एप्रिलपासून वार्षिक टोल पासच्या किंमतीत वाढ, जाणून घ्या सविस्तर माहिती
US Iran War : अमेरिका- इराण युद्ध सुरु झाल्यापासून शेअर बाजारात 33 लाख कोटी बुडाले, गुंतवणूकदारांचं 6 वर्षातील सर्वात मोठं नुकसान
अमेरिका- इराण युद्ध सुरु झाल्यापासून शेअर बाजारात 33 लाख कोटी बुडाले, गुंतवणूकदारांचं मोठं नुकसान
बँकेत नोकरी करण्याची मोठी संधी! अर्ज करण्यासाठी उरले फक्त काही तास, महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यात मिळणार नोकरी
बँकेत नोकरी करण्याची मोठी संधी! अर्ज करण्यासाठी उरले फक्त काही तास, महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यात मिळणार नोकरी
IndiGo Fare Hike: अमेरिका- इराण युद्धामुळं इंडिगोकडून इंधन अधिभार, 425 ते 2300 रुपयांनी तिकिट दर वाढले, मध्यरात्रीपासून दर लागू 
अमेरिका- इराण युद्धामुळं इंडिगोकडून इंधन अधिभार, 425 ते 2300 रुपयांनी तिकिट दर वाढले

व्हिडीओ

Religion Convergence : बेकायदा धर्मांतराला चाप, विधानसभेत धर्मस्वातंत्र्य सादर Special Report
Akola School : अकोल्यातल्या शाळेत थर्मिक फ्लुईड हिटर सिस्टीम Special Report
Tree Cutting For Car Race : रेसचं फॅड, झाडांवर कुऱ्हाड, स्थानिकांचा विरोध Special Report
Pune Drugs : पुण्यात ड्रग्जची टपरी, कासेवाडी परिसरात अवैध धंदे Special Report
Russia Oil : इराणवर हल्ले, रशियाचं बल्ले बल्ले, चढ्या दरानं तेल घ्यावं लागणार? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Beed Crime: जयराम चाटे तुरुंगातून बाहेर पडण्यापूर्वी गँगचा राडा , बीडमध्ये तरुणावर लोखंडी रॉड, कत्तीने हल्ला
जयराम चाटे तुरुंगातून बाहेर पडण्यापूर्वी गँगचा राडा , बीडमध्ये तरुणावर लोखंडी रॉड, कत्तीने हल्ला
Maharashtra Breaking LIVE Updates: देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या फक्त एका क्लिकवर...
Maharashtra Breaking LIVE Updates: देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या फक्त एका क्लिकवर...
Paper Leak Case : दहावीच्या पेपरफुटी प्रकरणाला नवं वळण, पेपर फुटलाच नाही, नर्सिंगचा विद्यार्थी 600 रुपये उकळायचा, पोलीस तपासात सत्य समोर
दहावीच्या पेपरफुटी प्रकरणाला नवं वळण, पेपर फुटलाच नाही, पोलीस तपासात वेगळाच अँगल समोर
US Iran War : अमेरिका- इराण युद्ध सुरु झाल्यापासून शेअर बाजारात 33 लाख कोटी बुडाले, गुंतवणूकदारांचं 6 वर्षातील सर्वात मोठं नुकसान
अमेरिका- इराण युद्ध सुरु झाल्यापासून शेअर बाजारात 33 लाख कोटी बुडाले, गुंतवणूकदारांचं मोठं नुकसान
Hormuz Strait  Crisis: भारतासाठी होर्मुझ सामुद्रधुनी खुली होण्याचे संकेत, भारत जुना मित्र असल्याचा इराणचा दावा
भारतासाठी होर्मुझ सामुद्रधुनी खुली होण्याचे संकेत, भारत जुना मित्र असल्याचा इराणचा दावा
Ratnagiri Crime : अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार; कृत्य करून व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या दोघांना अटक
अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार; कृत्य करून व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या दोघांना अटक
Home Loan: स्वत:चं घर खरेदी करण्याचं स्वप्न पाहताय, गृहकर्जाचा सर्वात कमी व्याज दर कोणत्या बँकेचा? जाणून घ्या यादी
Home Loan: स्वत:चं घर खरेदीचं स्वप्न पाहताय, गृहकर्जाचा सर्वात कमी व्याज दर कोणत्या बँकेचा?  
इकडं कुवेतनंतर इराकमध्ये हवेत इंधन भरणारं अमेरिकन हवाई दलाचं विमान कोसळलं; चार क्रू मेंबर्सचा मृत्यू, 2 बेपत्ता; तिकडं ट्रम्पकडून इराण सुप्रीम लीडरांविरोधात भलताच दावा
इकडं कुवेतनंतर इराकमध्ये हवेत इंधन भरणारं अमेरिकन हवाई दलाचं विमान कोसळलं; चार क्रू मेंबर्सचा मृत्यू, 2 बेपत्ता; तिकडं ट्रम्पकडून इराण सुप्रीम लीडरांविरोधात भलताच दावा
Embed widget