Income Tax Raid : काही दिवसांपूर्वी आयकर विभागाने वायर उत्पादक कंपनी पॉलिकॅब इंडियावर छापेमारी केली होती. आयकर विभागाने एकाच वेळी कंपनीशी संबंधित अनेक ठिकाणी छापेमारी करत काही दस्ताऐवज ताब्यात घेतले होते. त्यानंतर आता आयकर विभागाने या छापेमारीत काय सापडले याची माहिती जारी केली आहे. आयकर विभागाने ही कारवाई कर चुकवेगिरीच्या प्रकरणात केली होती. 


आयकर विभागाने एका निवेदनाद्वारे माहिती जारी केली आहे. आयकर विभागाने सांगितले की, 22 डिसेंबर 2023 रोजी मुंबई, पुणे, औरंगाबाद, नाशिक, दमण, हलोल आणि दिल्ली येथील फ्लॅगशिप ग्रुपच्या एकूण 50 ठिकाणांवर छापे टाकण्यात आले आहेत. या छाप्यात कर विभागाला 1000 कोटींच्या विक्रीची रोख आढळून आली. कंपनीने त्याचा कोणताही हिशोब नोंदवला नसल्याचे कंपनीने म्हटले. 


आयकर विभागाने सांगितले की, एका वितरकाने कच्च्या मालाच्या खरेदीसाठी फ्लॅगशिप कंपनीच्या वतीने 400 कोटी रुपये रोख भरल्याचे पुरावे मिळाले आहेत, जे विभागाने जप्त केले आहेत. आयकर विभागाच्या कारवाईत मोठ्या प्रमाणात दस्ताऐवज आणि डिजिटल डेटाच्या रूपात पुरावे सापडले आहेत. हे पुरावे जप्त करण्यात आले आहेत. काही अधिकृत वितरकांच्या संगनमताने समूहाकडून करचोरी होत असल्याचे या पुराव्यावरून स्पष्ट झाले असल्याची माहिती आयकर खात्याने दिली. कंपनी बेहिशेबी रोख विक्री, रोख पेमेंटद्वारे केलेली बेहिशेबी खरेदी, गैर-खरी वाहतूक आणि करपात्र उत्पन्न लपवण्यासाठी उप-करारावर खर्च करत होती.


आयकर विभागाने सांगितले की त्यांनी उप-कंत्राट खर्च, खरेदी आणि वाहतूक यावर 100 कोटी रुपयांचे अनावश्यक खर्च शोधले आहेत, ज्याचे पुरावे फ्लॅगशिप कंपनीच्या ठिकाणी सापडले आहेत. आयकर विभागाने सांगितले की, छाप्यादरम्यान एका वितरकाने मालाची खुल्या बाजारात रोखीने विक्री होत असताना कोणत्याही पुरवठा न करता बिले दिल्याचे आढळून आले. अशा प्रकारे, अधिकृत वितरकाने काही पक्षांना खरेदी खाती 500 कोटी रुपयांपर्यंत वाढवण्याची सोय केली आहे. हे वितरक फ्लॅगशिप कंपनीसाठी खास उत्पादने विकायचे. आयकर विभागाला छाप्यात सुमारे 4 कोटी रुपयांची बेहिशेबी रोकड सापडली असून 25 लॉकर्स गोठवण्यात आले आहेत. अद्याप तपास सुरू असल्याचे विभागाने सांगितले.


आयकर विभागाने कंपनीचे नाव घेतले नसून ही कंपनी पॉलीकॅब इंडिया असल्याचे समजते. पॉलीकॅब इंडियावर इन्कम टॅक्सच्या छाप्यानंतर शेअरमध्ये मोठी घसरण झाली. गेल्या एका आठवड्यात स्टॉक 9 टक्के आणि एका महिन्यात 10 टक्क्यांनी घसरला आहे. पॉलीकॅब हा 2023 मध्ये स्टॉक एक्सचेंजच्या मल्टीबॅगर स्टॉकपैकी एक आहे.


पॉलिकॅब कंपनीने काय म्हटले? 


पॉलिकॅब इंडिया कंपनीने एका दिवसआधी शेअर बाजाराकडे स्पष्टीकरण दिले आहे. कंपनीकडून कर चुकवेगिरी झाल्याचे वृत्त हे निराधार असून  अफवा असल्याचे कंपनीने म्हटले आहे. कंपनीकडून आपल्या व्यवहारात पारदर्शकता अवलंबली जात असल्याचे सांगण्यात आले आहे. आयकर विभागाकडून आम्हाला कोणतीही माहिती मिळाली नसल्याचेही कंपनीने म्हट