IMF Loan News : 22 एप्रिलला जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला (Pahalgam Terrorists attack) झाला होता. यामध्ये 26 पर्यटकांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत दहशतवाद्यांचे तळ उद्धवस्त केले होते. तसेच पाकिस्तान विरोधात कठोर कारवाईला देखील सुरुवात केली आहे. या काळात IMF ने पाकिस्तानला (Pakistan) मोठ्या प्रमाणात कर्ज दिले होते. याची जोरदार चर्चा झाली होती. दरम्यान, IMF कडून सर्वाधिक कर्ज (Loan) कोणता देश घेतो? याबाबतची माहिती तुम्हाला आहे का? जाणून घेऊयात सविस्तर माहिती.
ऑपरेशन सिंदूर नंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये निर्माण झालेला तणाव. त्यानंतर, सर्वात जास्त बातम्यांमध्ये राहिलेल्या गोष्टींपैकी एक म्हणजे आयएमएफने पाकिस्तानला 1 अब्ज डॉलर्सचे दिलेले कर्ज. पाकिस्तान मुख्यत्वे आयएमएफच्या भीक मागण्यावर अवलंबून आहे. परंतु जगात असे काही देश आहेत जे पाकिस्तानपेक्षा आयएमएफकडून जास्त कर्ज घेतात. भारताने आयएमएफकडून किती कर्ज घेतले आहे ते सांगूया.
60 टक्के कर्ज 90 पैकी फक्त 5 देशांना दिले जाते
आयएमएफ जगातील देशांना त्यांची आर्थिक स्थिती सुरळीत राखण्यासाठी आर्थिक मदत करते. आयएमएफच्या मते, जगातील 91 देशांना दिलेल्या कर्जांपैकी 60 टक्के कर्ज फक्त 5 देशांना दिले जाते, ज्यामध्ये अर्जेंटिनाचा प्रथम क्रमांकावर आहे. अर्जेंटिना हा देश आयएमएफ कडून मोठ्या प्रमाणावर कर्ज घेतो. अर्जेंटिनाचा आयएमएफकडून कर्ज घेण्यात जगात पहिला क्रमांक लागतो.
'या' देशांवर सर्वाधिक कर्ज
आयएमएफकडून कर्ज घेण्याच्या बाबतीत अर्जेंटिना अव्वल स्थानावर आहे. त्यानंतर युक्रेनचा क्रमांक लागतो, आयएमएफला त्यांची एकूण देणी ही 10.7 अब्ज एसडीआर आहेत. त्याच वेळी, इजिप्तवर 8.2 अब्ज, पाकिस्तानवर 6.9 अब्ज आणि इक्वेडोरवर 6.4 अब्ज कर्ज आहे. पाकिस्तानचा कर्ज घेण्याच्या बाबतीत चौथा क्रमांक लागतो.
कर्ज घेण्यात भारत 31 व्या स्थानावर
भारतानेही आयएमएफकडून कर्ज घेतले आहे. आयएमएफकडून कर्ज घेण्याच्या यादीत भारत खूपच खालच्या स्थानावर आहे. एकीकडे, पाकिस्तान चौथ्या क्रमांकावर आहे तर दुसरीकडे, भारत 31 व्या क्रमांकावर आहे. अहवालांनुसार, भारताचे थकित कर्ज एसडीआर 1.98 अब्ज आहे.
एसडीआर म्हणजे काय?
एसडीआर ही आयएमएफची विशेष राखीव मालमत्ता आहे, ज्याचे मूल्य पाच प्रमुख चलनांच्या आधारे निश्चित केले जाते. अमेरिकन डॉलर, युरो, चिनी रॅन्मिन्बी, जपानी येन, ब्रिटिश पाउंड.
महत्वाच्या बातम्या: