Stock Market News : सध्या देशात लोकसभा निवडणुकांची (Loksabha Election) रणधुमाळी सुरु आहे. आत्तापर्यंत चार टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडली आहे. उद्या पाचव्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया होणार आहे. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, 4 जूनपर्यंत लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होईपर्यंत, NSE निफ्टी निर्देशांक 21,700 आणि 22,800 च्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) हे जर पुन्हा पंतप्रधान झाले तर काही क्षेत्रात तेजी येण्याची शक्यता अहवालात वर्तवण्यात आलीय. 


या क्षेत्रांमध्ये तेजी येण्याची शक्यता


अहवालात दिलेल्या माहितीनुसार, जर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुन्हा सत्तेवर आले तर रेल्वे, पायाभूत सुविधा, संरक्षण, इलेक्ट्रिक सिटी आणि सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या (पीएसयू) सारख्या क्षेत्रात वाढ होईल. तसेच, या क्षेत्रातील कंपन्यांमध्ये पैसे गुंतवणाऱ्या गुंतवणूकदारांना मजबूत परतावा मिळण्याची शक्यता अहवालात वर्तवण्यात आली आहे. 


शेअर मार्केटमध्ये तेजी


सध्या शेअर मार्केटमध्ये देखील तेजी असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. अनेक कंपन्यांच्या नफ्यात वाढ झालीय.  Astra Microwave Products आणि Hindustan Aeronautics सारख्या संरक्षण कंपन्यांनी 17 मे 2023 पासून आतापर्यंत 124 टक्के आणि 194 टक्क्यांची वाढ नोंदवली गेलीय. NIBE Limited, Bharat Dynamics, Data Pattern आणि Paras Defence and Space Technologies ने देखील 298 टक्के, 92 टक्के  81 टक्के आणि 35 टक्क्यांचा परतावा दिला आहे.


 PSU कंपन्यांनी नोंदवली 100 टक्क्यांपेक्षा जास्त वाढ


दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार वर्षभरात PSU कंपन्यांनी 100 टक्क्यांपेक्षा जास्त वाढ नोंदवलीय. तर 387 टक्क्यांच्या वाढीसह, कोचीन शिपयार्डच्या समभागांनी 16 मे पर्यंत सर्वाधिक परतावा दिलाय. तर IRFC, IFCI, गृहनिर्माण आणि नागरी विकास महामंडळ (HUDCO), REC ने 300 टक्क्यांहून अधिक वाढ दर्शवली आहे. त्यामुळं सध्या गुंतवणूकदार हे  संरक्षण, उर्जा आणि बँकिंग क्षेत्रातील समभाग निवडू शकतात.


लोकसभा निकालानंतर शेअर बाजारात मोठी तेजी किंवा घसरण होणार 


लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या कोणत्याही प्रतिकूल किंवा अनपेक्षित निकालामुळे शेअर बाजारात मोठी तेजी किंवा घसरण होऊ शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. बाजारातील प्रतिक्रियेची तीव्रता कोणीही सांगू शकत नाही. त्यामुळं गुंतवणूकदारांनी म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याचा सल्ला काही तज्ज्ञांनी दिलाय. जर तुम्हाला कंपनीच्या मूलभूत गोष्टी समजल्या तर तुम्ही थेट इक्विटीमध्ये गुंतवणूक करु शकता. मिळालेल्या माहितीनुसार, पुढील 10 वर्षांत इक्विटीमध्ये वाढ होण्याची अधिक क्षमता आहे. सोने हा अप्रत्याशित मालमत्ता वर्ग आहे. गेल्या पाच वर्षांत सोन्यामध्ये 128 टक्के आणि गेल्या वर्षभरात 20 टक्क्यांची वाढ झालीय.


महत्वाच्या बातम्या:


Suhas Palshikar on Majha Katta: भाजप जिंकणार की नाही? 5 राज्यांचा कल गेमचेंजर ठरणार, वाचा राजकीय विश्लेषक सुहास पळशीकरांचं ॲनालिसिस