PAN Card Reprint: आजकाल PAN कार्ड हा एक अतिशय महत्वाचा दस्तऐवज बनला आहे. इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यापासून गुंतवणूक करणे, मालमत्ता खरेदी करणे, बँक खाते उघडणे इत्यादी सर्व कामांसाठी ते आवश्यक आहे. अशा परिस्थितीत पॅनकार्ड असणे अत्यंत गरजेचे आहे. पॅन कार्ड दीर्घकाळ वापरल्यामुळं ते अनेक वेळा फाटते. अशा प्रकारे तुम्ही दुसरे पॅन कार्ड सहज मिळवू शकता. यासाठी तुम्हाला काही सोप्या स्टेप्स फॉलो कराव्या लागतील. यानंतर कार्ड घरी पोहोचवले जाईल. यासाठी तुम्हाला फी देखील भरावी लागेल.
किती फी भरावी लागेल?
अनेक वेळा स्थानिक दुकाने दुसरे पॅन कार्ड प्रिंट करुन घेण्यासाठी 100 ते 200 रुपयांची मागणी करतात. परंतु NSDL च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन तुम्ही फक्त 50 रुपये देऊन पॅन कार्ड पुन्हा प्रिंट करु शकता. तुम्हालाही नवीन पॅनकार्ड घ्यायचे असेल तर ते कसे मिळवायचे ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
डुप्लिकेट पॅन कार्ड कसे मिळवायचे
1. यासाठी तुम्ही Google वर जाऊन Reprint Pan Card सर्च करावे.
2. यानंतर तुम्हाला NSDL च्या अधिकृत वेबसाइटवर पॅन कार्ड रीप्रिंट करण्याचा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा.
3. यानंतर तुम्ही येथे जा आणि पॅन कार्ड क्रमांक, आधार क्रमांक, जन्मतारीख आणि कॅप्चा कोड यासारखे पॅन कार्ड तपशील प्रविष्ट करा.
4. यानंतर तुम्हाला नियम आणि अटी स्वीकारून सबमिट कराव्या लागतील.
5. यानंतर तुमच्या समोर एक पेज उघडेल ज्यावर तुमच्या पॅनशी संबंधित सर्व माहिती रेकॉर्ड केली जाईल.
6. यानंतर तुम्ही Request OTP वर क्लिक करा.
7. त्यानंतर तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर OTP येईल, तो येथे टाका.
8. यानंतर त्याचे प्रमाणीकरण करावे लागेल.
9. यानंतर तुम्हाला पॅन कार्ड मिळवण्यासाठी 50 रुपये शुल्क भरावे लागेल.
10. फी भरण्यासाठी तुम्ही नेट बँकिंग किंवा UPI वापरू शकता.
11. पेमेंट केल्यानंतर, तुमचे डुप्लिकेट पॅन कार्ड 7 दिवसांच्या आत वितरित केले जाईल.
महत्त्वाच्या बातम्या: