मुंबई : राष्ट्रीय अन्न सुरक्षा उपक्रमाअंतर्गत देशभरात स्वस्त धान्य दुकानांच्या माध्यमातून गरीब नागरिकांना अन्न पुरवले जाते. त्यासाठी लाभार्थी कुटुंबांना शिधापत्रिका (Ration Card) देण्यात येतात. याच शिधापत्रिकांच्या मदतीने स्वस्त धान्य दुकानावर लाभार्थ्यांना अन्न मिळते. दरम्यान, शिधापत्रिकाधारकांनी लवकरात लवकर ई-केवायसी करणे गरजेचे आहे. तसे न केल्यास येत्या 1 ऑक्टोबरपासून तुम्हाला धान्य मिळणार नाही. त्यामुळे तुमच्या कुटंबातील कोणत्या सदस्याची ई-केवायसी झालेली आहे आणि कोणत्या सदस्याची ई-केवायसी झालेली नाही, तपासणे गरजेचे आहे. याच पार्श्वभूमीवर हे कसे तपासावे ते जाणून घेऊ या...


ज्या शिधापत्रिकाधरकांनी ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण केलेली नाही त्यांना यांचे रेशन कार्ड येत्या 1 ऑक्टोबरपासून  बंद होणार आहे. म्हणजेच 31 सप्टेंबरपर्यंत शिधापत्रिकाधारकांना त्यांची ई-केवायसी करणे बंधनकारक आहे. घरात किती सदस्य आहेत, एखाद्या सदस्याचा मृत्यू झालेला आहे का? या प्रश्नांची उत्तरे मिळण्यासाठी तसेच प्रत्येकाला त्यांच्या हक्काचा शिधा मिळावा यासाठी ई-केवायसी केली जात आहे.


सर्वांत अगोदर तुम्हाला ई-केवायसी करण्याची गरज आहे की नाही हे तपासावे लागेल. त्यासाठी तुम्हाला मेरा राशन हे अॅप डाऊनलोड करावे लागेल. त्यानंतर तुम्ही तुमचे ई-केवायसीचे स्टेटस तपासू शकता. 


ई-केवायसी झालेली आहे की नाही, हे कसं तपासणार?  (How tot check Ration Card e-KYC status)


>>>>> सर्वांत अगोदर प्ले स्टोअरमध्ये जाऊन मेरा राशन हे अॅप डाऊनलोड करा


>>>>> त्यानंतर अॅप चालू करून तुमचा शिधापत्रिका क्रमांक किंवा आधार कार्ड क्रमांक टाकण्यासाठी ऑप्शन दिसेल.


>>>>> आधार किंवा शिधापत्रिका यापैकी कोणताही एक क्रमांक टाकून सबमीट या बटणावर क्लिक करा. 


>>>>> त्यानंतर आधार सिडिंग या ऑप्शनवर यावे


>>>>> त्यानंतर तुमच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावापुढे आधार सिडिंग Yes किंवा No असा ऑप्शन दिसेल. 


>>>>> ज्या सदस्याच्या नावापुढे येस हा ऑप्शन असेल त्या सदस्याला ई-केवायसी करण्याची गरज नाही. आणि ज्या सदस्याच्या नावापढे नो असा ऑप्शन असेल त्या सदस्याला ई-केवायसी करावी लागेल. 


>>>>> ई-केवायसी करण्यासाठी तुम्ही राज्याच्या खाद्य पुरवठा विभागाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल.    


हेही वाचा :


Karjat Triple Murder : रेशन कार्ड आणि घरपट्टी वादातून सख्ख्या भावाची, गरोदर वहिणीची हत्या; नेरळच्या तिहेरी हत्याकांडाची उकल


घरबसल्या मोफत नवे रेशन कार्ड कसे काढावे? जाणून घ्या A टू Z प्रक्रिया !


संपूर्ण देशात वन नेशन वन रेशन कार्ड योजना लागू, 80 कोटी वापरकर्ते योजनेच्या कक्षेत