Know Your TDS : TAX DEDUCTED AT SOURCE (TDS) बाबत अनेकांना प्रश्न, शंका असतात. नोकरी करणाऱ्या अनेक कर्मचाऱ्यांचा टीडीएस कंपनीकडून कापला जातो. तर, कोणत्याही कंपनीत रुजू नसलेल्या फ्रिलांसिंगपणे काम करणाऱ्यांना टीडीएस किती द्यावा, याचीदेखील माहिती नसते. 


टीडीएसमध्ये अनेक कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना सॅलरी स्लिप देतात. त्यामध्ये टीडीएसबाबत वर्षाच्या शेवटी माहिती दिली जाते. टीडीएस सिस्टीमध्ये बहुतांशी आस्थापने फेब्रुवारी  अथवा मार्च महिन्यात आपल्या कर्मचाऱ्यांचा टीडीएस कापतात. त्यामुळेच या महिन्यांमध्ये अनेकदा पगार कमी आल्याची अथवा पगार कापला गेल्याच्या तक्रारी अधिक असतात. आता, तुम्हाला कंपनीकडून किती टीडीएस कापला गेला याची माहिती घेता येऊ शकेल. 


आयकर विभागाच्या संकेतस्थळावर माहिती उपलब्ध


आयकर विभागाच्या संकेतस्थळावरून तुम्ही पॅन क्रमांक आणि अन्य माहिती नमूद करून स्वत: चा फॉर्म 26एएस मिळवू शकता. यामध्ये तुमचा किती टॅक्स किती कापला गेला आणि किती टॅक्स जमा झाला याची माहिती उपलब्ध होऊ शकेल. 


>> अशाप्रकारे ऑनलाइन पद्धतीने तपासू शकता टीडीएस


> सर्वप्रथम www.incometaxindiaefiling.gov.in/home या संकेतस्थळावर लॉगिन करा. 


> संकेतस्थळाच्या उजव्या बाजूला  Register Yourself या पर्यायावर क्लिक करा


> PAN मधील माहितीच्या आधारे सर्व माहिती नमूद करा आणि पासवर्ड जनरेट करा


> तुमचा युजर आयडी हा तुमचा पॅन क्रमांक असणार आणि ओटीपीच्या माध्यमातून पासवर्ड जनरेट केल्यानंतर अकाउंट लॉगिन करा. 


> लॉगिन केल्यानंतर View Tax Credit Statement (26 AS)  वर जा. 


> View Tax Credit Statement (26 AS)  पर्यायावर क्लिक केल्यानंतर एक पॉपअप येईल आणि दुसऱ्या साइटवर तुम्ही  redirect व्हाल. 


> या नव्या पेजवर TDS Reconciliation Analysis and Correction Enabling System विवरण दिसेल. त्यावर TRACES असं लिहिलं असेल. 


> या ठिकाणी TDS शी संबंधित माहिती तुम्हाला उपलब्ध होईल.