Gold Silver Price: गेल्या महिन्याभरात सोने आणि चांदी खरेदी करू इच्छिणाऱ्या ग्राहकांसाठी तसेच गुंतवणूकदारांसाठी बाजारात मोठी उलथापालथ पाहायला मिळाली आहे. 5 ऑगस्ट ते 7 सप्टेंबर या एका महिन्याच्या कालावधीत सोने आणि चांदी (Gold Silver Price) या दोन्हींच्या किमतीत लक्षणीय वाढ झाल्याचं दिसून आलं आहे. 'इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन'ने (IBJA) जाहीर केलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार, या काळात सोन्याच्या (Gold Silver Price) दरात प्रति 10 ग्रॅम 5 टक्क्यांहून अधिक, तर चांदीच्या दरात प्रति किलो तब्बल 10 हजार रुपयांहून अधिक वाढ नोंदवण्यात आली आहे.(Gold Silver Price)

Continues below advertisement

Gold Silver Price: सोन्याच्या दरात 5.03 टक्क्यांची भरघोस वाढ

समोर आलेल्या आकडेवारीनुसार, 5 ऑगस्ट रोजी 99.9 टक्के शुद्धतेच्या सोन्याचा दर 1,45,626 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका होता. 7 सप्टेंबर रोजी यामध्ये वाढ होऊन हा भाव 1,53,340 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचला आहे. म्हणजेच अवघ्या महिनाभरात सोने प्रति 10 ग्रॅममागे 7,714 रुपयांनी महागले आहे. टक्केवारीच्या हिशोबाने सोन्याच्या किमतीत 5.03 टक्क्यांची वाढ झाली आहे.

Gold Silver Price: चांदीच्या किमतीतही जोरदार वाढ

सोन्यापाठोपाठ चांदीच्या दरातही मोठी उसळी पाहायला मिळाली. 5 ऑगस्ट रोजी चांदीचा भाव 2,24,562 रुपये प्रति किलोग्राम इतका होता. 7 सप्टेंबर रोजी चांदीचे दर वाढून 2,35,456 रुपये प्रति किलोग्राम झाले आहेत. म्हणजेच एका महिन्यात चांदीच्या दरात प्रति किलो 10,894 रुपयांची (सुमारे 4.85 टक्के) मोठी वाढ झाली आहे.

Continues below advertisement

Gold Silver Price: का वाढताहेत सोने-चांदीचे दर?

सोन्या-चांदीच्या किमती वाढण्यामागे अनेक अंतर्गत व आंतरराष्ट्रीय कारणे जबाबदार आहेत, यामध्ये प्रामुख्याने आहे तो, जागतिक स्तरावर आर्थिक अनिश्चितता निर्माण झाल्यावर गुंतवणूकदार शेअर बाजाराऐवजी सोन्याला सुरक्षित गुंतवणूक मानून त्यात पैसे गुंतवतात, ज्यामुळे मागणी वाढून दर वधारतात. त्यानंतर अमेरिकेचे व्याजदर, डॉलरचे चढ-उतार आणि जगभरातील महागाईचा थेट परिणाम या धातूंवर होतो. विशेषतः चांदीचा वापर इलेक्ट्रॉनिक वस्तू, सोलर पॅनेल आणि विविध उद्योगांमध्ये मोठ्या प्रमाणावर होत असल्याने तिच्या औद्योगिक मागणीचाही दरावर प्रभाव पडतो.

Gold Silver Price: पुढील काळात बाजारात कशी असेल परिस्थिती

गेल्या महिन्यात दरवाढ झाली असली तरी आगामी काळात आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि केंद्रीय बँकांचे व्याजदराबाबतचे निर्णय यामुळे किमतीत चढ-उतार कायम राहू शकतात. दर पुन्हा खाली येण्याची शक्यताही नाकारता येत नाही. त्यामुळे जर तुम्ही सोने किंवा चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर केवळ 1 दिवसाचा भाव न बघता मागील काही दिवसांच्या दरांचा ट्रेंड पाहूनच निर्णय घेणे फायदेशीर ठरेल.