Continues below advertisement

Gold Locker नवी दिल्ली : भारतामध्ये सोने सांस्कृतिक आणि आर्थिक दृष्ट्या महत्त्वाचं आहे. चोरी आणि अन्य कारणांमुळं सोन्याचे दागिने गहाळ होण्याची शक्यता असते. मात्र, यावरील उपाय म्हणून काही जण दागिने बँकेच्या लॉकरमध्ये ठेवण्याचा सुरक्षित पर्याय वापरतात. लॉकरमध्ये दागिने ठेवणे हा महत्त्वाचा पर्याय आहे. सोने लॉकरमध्ये ठेवल्यास दागिने चोरी होण्याची भूत राहत नाही. जेव्हा आवश्यकता असेल तेव्हा काढू शकता. बँका यासाठी काही शुल्क आकारतात त्याच्या बदल्यात दागिन्यांच्या सुरक्षेची जबाबदारी घेते. मात्र, लॉकरमध्ये दागिने ठेवण्यासाठी काही नियम आहेत.

घरात किती सोनं ठेवता येतं?

आयकर कायद्यानुसार विवाहित महिला 500 ग्रॅम म्हणजेच 50 तोळे सोनं घरी ठेवू शकतात. तर, अविवाहित महिलांसाठी ही मर्यादा 250 ग्रॅम आहे. पुरुष त्यांच्या नावावर 100 ग्रॅम सोनं ठेवू शकता. म्हणजेच घरात सोनं ठेवण्याचे नियम प्रत्येकासाठी वेगवेगळे आहेत. उदा. एका कुटुंबात विवाहित पुरुष आणि महिला 100 ग्रॅम आणि 500 ग्रॅम मिळून 600 ग्रॅम सोनं घरी ठेवू शकतात.

Continues below advertisement

सोने लॉकरमध्ये ठेवण्याबाबत नियम काय?

आरबीआयच्या माहितीनुसार बँकेच्या लॉकरमध्ये सोने ठेवण्याची कमाल मर्यादा नाही. मात्र, लॉकर मध्ये किती सोनं ठेवायचं याबाबत प्रत्येक बँकांचं धोरण वेगळं आहे. याशिवाय तुमच्याकडे याचे देखील पुरावे असावेत की सोने योग्य पद्धतीनं खरेदी केलेलं असावं. म्हणजेच बँक लॉकरमध्ये सोनं किती ठेवायचं याबाबत आरबीआयचे कोणतेही नियम नाहीत. बँक लॉकरमध्ये सोनं लॉकरमध्ये ठेवणं हे ग्राहकांवर अवलंबून असतं.

लॉकर संदर्भातील नियम

दिवाळीनंतर बँकिंग संदर्भातील नियम बदलले आहेत. त्यानुसार लॉकर ज्या व्यक्तीच्या नावे उघडलं जातं त्याला प्राधान्य यादी द्यावी लागेल. म्हणजेच , बँकेकडून लॉकर सेवा घेताना सुरुवातीला लिहून द्यावे लागेल की त्याच्या मृत्यूनंतर लॉकर उघडण्याचा अधिकार कोणाला असेल. याचा हेतू सुरक्षा अधिक भक्क करणं आणि भविष्यातील कायदेशीर वाद रोखणं आहे. यापूर्वी लॉकर धारकाचा मृत्यू झाल्यानंतर कुटुंबातील सदस्यांमध्ये वाद निर्माण व्हायचे. मात्र, आता प्राधान्य यादी असल्यानं त्या यादीनुसार पहिल्या क्रमांकावर ज्याचं नाव असेल त्याला लॉकर उघडण्याचा अधिकार असेल. तो जर उपस्थित नसेल तर त्याच्या ऐवजी दुसऱ्या क्रमांकाचा व्यक्ती लॉकर उघडू शकतात.