IndiGo Airline: देशातील सर्वात मोठी एअरलाइन इंडिगो (Indigo) एअरलाइन 2023 चा अहवाल सादर केला आहे. यातून अनेक प्रकारची माहिती समोर आली आहे. अहवालानुसार, गेल्या वर्षी एका प्रवाशाने इंडिगोसोबत एकूण 3647 किमीचा हवाई प्रवास करण्याचा विक्रम केला होता. हा प्रवासी इंडिगोद्वारे दिल्ली, मुंबई, जम्मू, श्रीनगर, चंदीगड आणि विशाखापट्टणम येथे गेला. तर 2023 मध्ये इंडिगोने प्रवास करणाऱ्यांची संख्या ही 10 कोटींहून अधिक आहे. 


श्री राम, सीता, लक्ष्मण आणि हनुमान यांची वेशभुषा असलेले कपडे


इंडिगोच्या राऊंड अप 2023 अहवालानुसार, गेल्या वर्षी कंपनीने अनेक विक्रम प्रस्थापित केले. एक दिवस अगोदर, अहमदाबाद ते अयोध्येला जाणाऱ्या पहिल्या फ्लाइटसाठी इंडिगोच्या कर्मचाऱ्यांनी राम, सीता, लक्ष्मण आणि हनुमानाची वेशभूषा केली होती. इंडिगोने सांगितले की, 2023 मध्ये आम्ही अनेक चांगले क्षण पाहिले. गेल्या वर्षी 10 कोटींहून अधिक प्रवाशांनी विमान प्रवास केला. हे भारताच्या लोकसंख्येच्या सुमारे 7 टक्के आहे.


दिल्ली-मुंबई दरम्यान सर्वाधिक प्रवाशांनी उड्डाण केले


25 नोव्हेंबर हा इंडिगो एअरलाइनचा सर्वात व्यस्त दिवस होता. दिल्ली ते मुंबई हा सर्वात वर्दळीचा मार्ग होता. याशिवाय, एअरलाइनने दिल्लीहून सर्वाधिक 73577 देशांतर्गत उड्डाण केले. याशिवाय, एअरलाइनसाठी दुबई हे सर्वात व्यस्त शहर होते, जिथून इंडिगो एअरलाइन्सने 5469 उड्डाणे चालवली. रिपोर्टनुसार, गेल्या वर्षी सोशल मीडियावर सुमारे 2.23 लाख लोकांनी इंडिगोबद्दल लिहिले.


गेल्या वर्षी त्याच्या नेटवर्कमध्ये 17 नवीन विमानतळ जोडले गेले


इंडिगोने गेल्या वर्षी आपल्या नेटवर्कमध्ये 17 नवीन विमानतळ जोडले आहेत. या ठिकाणी 12 लाखांहून अधिक लोकांनी उद्घाटन फ्लाइटमध्ये प्रवास केला. प्रत्येक उत्पन्न गटातील लोक गेल्या वर्षी इंडिगोच्या माध्यमातून वेगवेगळ्या ठिकाणी पोहोचले. कंपनीच्या विमानातून 10 लाखांहून अधिक नवजात बालकांनी प्रवास केला. हा आकडा जर्मनीत गेल्या वर्षी जन्मलेल्या एकूण मुलांपेक्षा जास्त आहे.


ज्येष्ठ नागरिक सर्वाधिक बंगळुरूला गेले


कंपनीच्या फ्लाइटमधून सुमारे 17 लाख ज्येष्ठ नागरिकांनी प्रवास केल्याचे अहवालात स्पष्ट झाले आहे. ज्येष्ठ नागरिकांनी बंगळुरूला सर्वाधिक विमानाने प्रवास केला. यासह 13 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी इंडिगोने प्रवास केला. ही संख्या मिझोरामच्या एकूण लोकसंख्येएवढी आहे. विद्यार्थ्यांमध्ये सर्वात लोकप्रिय ठिकाण म्हणजे दिल्ली. याशिवाय विमान कंपनीने 13 लाख प्रवाशांना व्हीलचेअर उपलब्ध करून दिली.


एक कोटी प्रवाशांनी खिडकीच्या जागा केल्या बुक 


गेल्या वर्षी अंदाजे एक कोटी प्रवाशांनी खिडकीच्या जागा बुक केल्या होत्या. तसेच, बहुतांश प्रवाशांनी पुढच्या सीटचा पर्याय निवडला. गेल्या वर्षी इंडिगो एअरलाइन 17 वर्षांची झाली. त्या दिवशी कंपनीच्या विमानांनी 2.84 लाखांहून अधिक प्रवाशांनी प्रवास केला.


महत्त्वाच्या बातम्या:


Indigo : इंडिगोचा प्रवाशांना झटका! या आसनांसाठी मोजावे लागणार 2000 रुपयांचे अतिरिक्त शुल्क