Houses Rate : दिल्ली-एनसीआरमध्ये (Delhi NCR) घर खरेदी करणे आता सोपे राहिलेले नाही. कारण घरांच्या किंमतीत (Houses Rate) प्रचंड वाढ झाली आहे. सध्या तेथील घरांच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. ग्रेटर नोएडा वेस्टमधील घरांचे दर हे आता सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. गेल्या वर्षभरात घरांच्या किंमतीत 21 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. शिवाय भाडेकरुंच्या भाड्यातही वाढ करण्यात आली आहे. भाड्यात 13 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे.


मोठ्या घरांची मागणीही वाढली


मॅजिक ब्रिक्सच्या अहवालानुसार, 1250 स्क्वेअर फुटांपेक्षा मोठी घरे खरेदी करण्यात लोकांना रस वाढला आहे. एकूण मागणीपैकी 54.5 टक्के मागणी याच श्रेणीतून होत आहे. बहुतेक लोकांनी 5000 ते 7500 रुपये प्रति चौरस फूट किंमतीच्या मालमत्तेची मागणी केली आहे. ही मागणी केवळ घरगुतीच नाही तर एनआरआय ग्राहकांकडूनही आली आहे. दिल्ली, गाझियाबाद, नोएडा आणि मुंबईतील लोक ग्रेटर नोएडा वेस्टमध्ये मालमत्ता खरेदी करण्यास सर्वात उत्सुक आहेत. त्यामुळं घरांचे दर 21.6 टक्क्यांनी वाढले आहेत. वार्षिक आधारावर 13.15 टक्के वाढ झाली आहे.


लोक मोठ्या घरांकडे अधिक आकर्षित 


ग्रेटर नोएडा वेस्टमध्ये मोठ्या प्रमाणात घरे उपलब्ध असल्याची माहिती या अहवालात देण्यात आली आहे. आता लोक लहान घरांऐवजी मोठ्या घरांकडे अधिक आकर्षित झाले आहेत. या घरांची मागणी आणि विक्री दोन्ही वाढले आहे. ग्रेटर नोएडातील इतर भागांच्या तुलनेत पश्चिमेकडील लोकांना घरे मिळण्याचे प्रमाणही 8.62 टक्क्यांनी वाढले आहे. त्यामुळेच येथे घर खरेदीकडेही लोकांचा कल वाढला आहे.


अनिवासी भारतीय नोएडात घर घेण्याच्या तयारीत 


अमेरिका, कॅनडा, युनायटेड किंगडम आणि यूएईमध्ये स्थायिक झालेल्या अनिवासी भारतीयांनाही ग्रेटर नोएडा वेस्टला त्यांना घर घ्यायचे आहे.  परदेशातून येणाऱ्या मागणीत त्यांचा वाटा सुमारे 85 टक्के आहे. एनसीआरमध्ये ग्रेटर नोएडा वेस्टची स्थिती वाढली आहे. येथे घरांच्या किमती मर्यादेत ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात असल्याने या भागाकडे लोकांचा कल वाढला आहे.