Agreement Rules : बरेच लोक आपले शहर सोडून इतर शहरात बाहेर कामाला जातात. अशा परिस्थितीत प्रत्येकाला लगेच घर (House) घेणं शक्य होत नाही. त्यामुळं अनेक जण भाड्याने घर घेऊन राहतात. त्यामुळं मोठ्या शहरांमध्ये भाडेकरुंची संख्या दिवसें दिवस मोठ्या प्रमाणात वाढत आहे. घर भाड्याने देण्यासाठी, भाडेकरु आणि घरमालक यांच्यात करार (House Agreement) केला जातो. ज्यामध्ये घर आणि त्याच्याशी संबंधित अटी व शर्तींचा समावेश आहे. पण, तरीही अनेक वेळा घरमालकाला भीती वाटते की भाडेकरु आपल्या घराचा ताबा घेऊ शकतो.
तुम्ही अनेक ठिकाणी असे ऐकले असेल की, जिथे भाडेकरुने घरमालकाचे घर घेतले आहे. घरमालकांनी घर भाड्याने देण्यापूर्वी काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात. अन्यथा, त्यांच्या एका चुकीमुळे, भाडेकरु घराचा ताबा घेऊ शकतो. घर भाड्याने देण्यासाठी, भाडेकरू आणि घरमालक यांच्यात करार केला जातो. ज्यामध्ये घर आणि त्याच्याशी संबंधित अटी व शर्तींचा समावेश आहे. परंतु, काही वेळा घरमालकाच्या चुकीमुळे भाडेकरू घराचा ताबा घेऊ शकतो. जाणून घेऊयात घरमालकाने नेमकं काय करावं.
घरमालकांनो ही चूक करु नका
अनेकदा घरमालक भाडे करार करताना काही गोष्टींकडे लक्ष देत नाहीत. घरमालकाने आधी भाडेकरुंचे पोलिस व्हेरिफिकेशन करने गरजेचे आहे. त्यानंतर त्याचे नियम भाडे करारात लिहावेत. साधारणपणे 11 महिन्यांसाठी भाडे करार करणे चांगले असते. जर कोणी भाड्याच्या जागेवर जास्त काळ राहात असेल तर काही नियमांनुसार ती मालमत्ता तुमची होऊ शकते. याला प्रतिकूल स्थिती म्हणतात. मग न्यायालयही या प्रकरणात काही करु शकत नाही. सुप्रीम कोर्टाने असेही म्हटले आहे की, जर एखादा भाडेकरू 12 वर्षे एखाद्या ठिकाणी राहत असेल तर तो त्यावर मालकी हक्क सांगू शकतो.
या मालमत्तांना नियम लागू होणार नाही
घराच्या ताब्याचा नियम ब्रिटिश काळापासून चालत आलेला आहे. परंतू, काही परिस्थितींमध्ये हा नियम वैध नाही. तसा हा नियम सरकारी जमिनींवर लागू नाही. म्हणजे जर कोणी सरकारी फ्लॅटमध्ये राहत असेल तर तो या घराचा ताबा घेऊ शकत नाही.
प्रथम अटी शर्थीसंदर्भात करार करुन घ्यावा
जर तुम्ही घरमालक असाल आणि तुमची मालमत्ता गमवायची नसेल, तर सर्वप्रथम तुम्हाला ती कोणालाही भाड्याने देताना करारनामा करून घ्यावा. जर तुम्ही केवळ 11 महिन्यांसाठी करार केला असेल आणि तुम्हाला जर तो वाढवायचा असेल तर तो 11 महिन्यांनंतर पुन्हा वाढवता येईल. यामुळं मालमत्तेत खंड पडेल. तुमची इच्छा असल्यास, तुम्ही एक वर्षानंतर तुमचा भाडेकरु बदलू शकता. तुम्ही तुमच्या मालमत्तेला किंवा घराला वेळोवेळी भेट देत राहणं गरजेचं आहे.
महत्त्वाच्या बातम्या: