एक्स्प्लोर

Home Loan : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं रेपो रेट वाढवला, ऑक्टोबरमध्ये सर्वात कमी व्याज दरावर गृहकर्ज कोणती बँक देते?  

Home Loan : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं 7 ऑक्टोबरला रेपो रेटमध्ये 0.25 टक्के वाढ करण्याची घोषणा केली आहे. त्यानंतर बँकांकडून देखील गृहकर्जाच्या व्याज दरात वाढ करण्यात आली आहे. 

नवी दिल्ली : अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्षावर तोडगा न निघाल्यामुळं क्रूड ऑईलचे दर वाढले आहेत. महागाईमध्ये वाढ झाल्यानं आरबीआयनं पतधोरण जाहीर करताना रेपो रेटमध्ये 0.25 टक्के वाढ करत अशल्याचं सांगितलं. यामुळं रेपो रेट 5.25 टक्क्यांरुन 5.50 टक्क्यांवर पोहोचला आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं रेपो रेटमध्ये वाढ करताच काही बँकांकडून गृहकर्जाच्या व्याज दरात वाढ करण्यात आली आहे. ऑक्टोबर महिन्यात बँका किती टक्के व्याज दरानं गृहकर्ज देत आहेत ते एखाद्या बँकेकडून गृहकर्ज घेण्यापूर्वी पाहणं महत्त्वाचं आहे. 

ऑक्टोबरमध्ये बँका किती टक्के व्याजानं गृहकर्ज देतात?

ऑक्टोबर महिन्यात काही बँका 7 टक्के व्याज दरानं गृहकर्ज देत आहेत. मात्र, या व्याज दरावर गृहकर्ज मिळवायचं असल्यास कर्ज देणारी बँक, कर्जदाराची वित्तीय प्रोफाइल, क्रेडिट स्कोअर, कर्जदाराचा कर्ज परतफेडीचा इतिहास, कर्जाची रक्कम आणि इतर गोष्टी अवलंबून असतात. 

सार्वजनिक क्षेत्रातील बँका गृहकर्जाचं वाटप करताना त्याचं तीन स्लॅबमध्ये वर्गीकरण करतात. ज्यामध्ये 30 लाखांपर्यंतचं कर्ज, 30 ते 75 लाखांपर्यंतचं कर्ज आणि 75 लाखांवरील कर्ज याचा समावेश असतो.

बँक ऑफ महाराष्ट्र आणि सेंट्रल बँक ऑफ इंडियाकडून 7 टक्के व्याज दरापासून कर्ज दिलं जात आहे. बँक ऑफ महाराष्ट्रचा किमान व्याज दर 7 टक्के ते कमाल व्याज दर 9.90 टक्के आहे. 

बँक ऑफ बडोदाकडून किमान 7.20 टक्के ते कमाल 9.25 टक्के व्याजदरानं गृहकर्ज दिलं  जातं. 

बँक ऑफ इंडियाचा गृहकर्जाचा व्याज दर 7.10 टक्के ते 10.25 टक्क्यांदरम्यान आहे. 

कॅनरा बँकेचा गृहकर्जाचा किमान व्याज दर 7.25 टक्के ते कमाल व्याज दर 10 टक्के आहे.

सेंट्रल बँक ऑफ इंडियाचा गृहकर्जाचा किमान व्याज दर 7.00 टक्के  तर कमाल व्याजदर 9.15 टक्के आहे.  

इंडियन बँकेचा गृहकर्जाचा किमान व्याज दर 7.15 टक्के  तर कमाल व्याजदर 9.15 टक्के आहे.  

इंडियन ओव्हरसीज बँकेचा गृहकर्जाचा किमान व्याज दर 7.20 टक्क्यांपासून सुरु होतो.

पंजाब अँड सिंध बँकेचा  गृहकर्जाचा किमान व्याज दर 7.35 टक्के  तर कमाल व्याजदर 10.75 टक्के आहे.  

पंजाब नॅशनल बँकेचा गृहकर्जाचा किमान व्याज दर 7.00 टक्के  तर कमाल व्याजदर 9.15 टक्के आहे.  

स्टेट बँक ऑफ इंडिया  गृहकर्जाचा किमान व्याज दर 7.25 टक्के  तर कमाल व्याजदर 9.25 टक्के आहे.  
   
यूको बँकेचा  गृहकर्जाचा किमान व्याज दर 7.15 टक्के  तर कमाल व्याजदर 9.25 टक्के आहे.  

यूनियन बँक ऑफ इंडियाचा  गृहकर्जाचा किमान व्याज दर 7.15 टक्के  तर कमाल व्याजदर 9.60 टक्के आहे.  

गृहकर्ज घेताना कोणत्या गोष्टी पाहणं आवश्यक 

घर खरेदी करण्यासाठी गृहकर्ज घेताना कोणत्या बँकेतून कमी व्याज दरावर कर्ज मिळू शकतं याची माहिती घेणं आवश्यक आहे. गृहकर्जाच्या व्याजदरासोबत प्रोसेसिंग फी, कर्ज कालावधी, व्याज दर,  कर्ज देणाऱ्या बँकेचं धोरण, दंड, यासंदर्भातील माहिती घेणं आवश्यक आहे. 

गृहकर्जाचा कालावधी 20 ते 30 वर्षांचा असल्यानं  व्याज दरातील छोटा फरक देखील परिणाम करु शकतो. त्यामुळं गृहकर्ज घेताना सर्व गोष्टींचा विचार करणं महत्वाचं आहे.

युवराज जाधव एबीपी माझाच्या डिजीटल टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत आहेत. डिजीटल पत्रकारिता क्षेत्रात त्यांच्याकडे ८ वर्षांचा अनुभव आहे. एबीपी माझासोबत ते मार्च 2024 पासून कार्यरत आहेत. आपल्या कारकीर्दीत त्यांनी महाराष्ट्रातील अग्रगण्य वृत्तसंस्थांसोबत काम केले आहे. यामध्ये महाराष्ट्र टाइम्स, टीव्ही ९ मराठी, ईटीव्ही भारत या नामांकित संस्थांचा समावेश आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संज्ञापन आणि पत्रकारिता विभागातून (रानडे इन्स्टिट्यूट) मधून त्यांनी पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केले आहे. त्यानंतर त्यांनी डिजीटल पत्रकारिता क्षेत्रात कामाला सुरुवात केली. युवराज जाधव सातारा जिल्ह्यातील असून स्थानिक स्वराज संस्थाचं राजकारण ते राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील घडामोडींबाबत लेखन करतात. याशिवाय,आंतराराष्ट्रीय घडामोडी, शिक्षण, क्रीडा क्षेत्रातील घडामोडींसह ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांवर काम करतात.

 
Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सोन्या चांदीची खरेदी करण्याची मोठी संधी! गेल्या 10 दिवसात दरात मोठी घसरण, सध्याचे दर काय?  
सोन्या चांदीची खरेदी करण्याची मोठी संधी! गेल्या 10 दिवसात दरात मोठी घसरण, सध्याचे दर काय?  
Mumbai CNG Price Hike : मुंबईकरांना महागाईचा आणखी एक झटका! CNG च्या दरात पुन्हा दीड रुपयांची वाढ; आता किलोमागे किती रुपये मोजावे लागणार?
मुंबईकरांना महागाईचा आणखी एक झटका! CNG च्या दरात पुन्हा दीड रुपयांची वाढ; आता किलोमागे किती रुपये मोजावे लागणार?
मुलांच्या भविष्यासाठी सुरक्षित पर्याय, दरमहा फक्त 5000 रुपये जमा करा, 16 लाख रुपये मिळवा, नेमकी काय आहे योजना? 
मुलांच्या भविष्यासाठी सुरक्षित पर्याय, दरमहा फक्त 5000 रुपये जमा करा, 16 लाख रुपये मिळवा, नेमकी काय आहे योजना? 
Modern Office Setup Cost : 100 कर्मचाऱ्यांसाठी आधुनिक ऑफिस उभारायला किती खर्च येतो? फर्निचर, इंटीरियर ते स्मार्ट तंत्रज्ञानापर्यंत जाणून घ्या संपूर्ण बजेट
100 कर्मचाऱ्यांसाठी आधुनिक ऑफिस उभारायला किती खर्च येतो? फर्निचर, इंटीरियर ते स्मार्ट तंत्रज्ञानापर्यंत जाणून घ्या संपूर्ण बजेट
Advertisement

व्हिडीओ

Mahendra Dalvi On Sunil Tatkare : सुनील तटकरेंवर टीका करताना आमदार महेंद्र दळवींची जीभ घसरली
Nashik Bird Election : गिधाड विरूद्ध कावळा... पक्ष्यांच्या निवडणुकीत वातावरण का तापलं? Special Report
Hotel Vaishali and Rupali Pune : हॉटेल वैशाली-रुपाली बंद,हळवे पुणेकर भरभरून बोलले
Rahul Gandhi Phone Tapping Case : वादविवादाचं आवतण 'फोन टॅपिंग'चा बाण | Special Report ABP Majha
Microsoft Outage Today : मायक्रोसॉफ्ट गंडलं, कामकाज कोलमडलं | Special Report ABP Majha
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CJP : कॉकरोच जनता पार्टीकडन संघटना बांधणीला जोर, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहारसह 10 राज्यात टीम निवडली, अभिजीत दिपकेंचा प्लान नेमका काय?
सीजेपीनं रणनीती बदलली,महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहारसह 10 राज्यात संघटना बांधणी सुरु  
Pakistan Economy : घरात खायला दाणे नाहीत, पण स्वप्ने मात्र गगनभरारीची; 2050 पर्यंत पाकिस्तान जगातील सहावी मोठी अर्थव्यवस्था बनणार, पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्या दाव्याने खळबळ
घरात खायला दाणे नाहीत, पण स्वप्ने मात्र गगनभरारीची; 2050 पर्यंत पाकिस्तान जगातील सहावी मोठी अर्थव्यवस्था बनणार, पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्या दाव्याने खळबळ
Pune Police : मालकाने विश्वासाने सोपवलेली 28 लाखांची बॅग घेऊन कुरिअर बॉय पसार, पुणे पोलिसांचा फिल्मी स्टाईल तपास, तब्बल 10 हजार किमी पाठलाग करत मुसक्या आवळल्या
मालकाने विश्वासाने सोपवलेली 28 लाखांची बॅग घेऊन कुरिअर बॉय पसार, पुणे पोलिसांचा फिल्मी स्टाईल तपास, तब्बल 10 हजार किमी पाठलाग करत मुसक्या आवळल्या
‘चित्रपताका–2026’च्या दुसऱ्या पर्वाचा दिमाखदार शुभारंभ!, 33 सिनेमे आणि 15 हून अधिक संवादसत्रांची पर्वणी
‘चित्रपताका–2026’च्या दुसऱ्या पर्वाचा दिमाखदार शुभारंभ!, आशिष शेलार यांच्या हस्ते उद्घाटन
Punjab Assembly Election : पंजाबमध्ये 'आप'साठी आनंदी आनंद? आज निवडणूक घेतल्यास भगवंत मान पुन्हा मुसंडी मारणार? सत्तावापसीसाठी काँग्रेसही शर्यतीत, ताजा सर्व्हे समोर
पंजाबमध्ये 'आप'साठी आनंदी आनंद? आज निवडणूक घेतल्यास भगवंत मान पुन्हा मुसंडी मारणार? सत्तावापसीसाठी काँग्रेसही शर्यतीत, ताजा सर्व्हे समोर
Maharashtra Farmers Farmer ID : शेतकऱ्यांनो तातडीने 'हे' काम पूर्ण करा, अन्यथा शासकीय योजनांचे पैसे अडकणार; मदत व पुनर्वसन विभागाचे महत्त्वाचे आवाहन
शेतकऱ्यांनो तातडीने 'हे' काम पूर्ण करा, अन्यथा शासकीय योजनांचे पैसे अडकणार; मदत व पुनर्वसन विभागाचे महत्त्वाचे आवाहन
शेगावहून दर्शन घेऊन परतताना हायवेवर भीषण अपघात; दुचाकीवरील तीन तरुण ठार, परिसरात हळहळ
शेगावहून दर्शन घेऊन परतताना हायवेवर भीषण अपघात; दुचाकीवरील तीन तरुण ठार, परिसरात हळहळ
लातूर जिल्हा बँक निवडणुकीत 99.40 टक्के मतदान; उद्या मतमोजणी, देशमुख-निलंगेकरांची प्रतिष्ठा पणाला
लातूर जिल्हा बँक निवडणुकीत 99.40 टक्के मतदान; उद्या मतमोजणी, देशमुख-निलंगेकरांची प्रतिष्ठा पणाला
Embed widget