Home Loan मुंबई: देशातील खासगी क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असलेल्या एचडीएफसी बँकेनं कर्ज स्वस्त केलं आहे. आरबीआयच्या पतधोरण विषयक समितीच्या बैठका सुरु असतानाच हा निर्णय घेण्यात आला आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण विषयक समितीची बैठक सुरु असून उद्या पतधोरण जाहीर केलं जाणार आहे त्यापूर्वीच एचडीएफसी बँकेनं त्यांच्या ग्राहकांना एक भेट दिली आहे. MCLR कमी झाल्यानं कर्जदारांना कर्ज स्वस्तात मिळणार आहे.
एचडीएफसी बँकेनं काही ठराविक कर्जांवरील मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड्स बेस्ड लेंडिंग रेट्समध्ये कपात केली आहे. बँकेनं एकूण कपात 5 टक्के केली आहे. याचा फायदा एलसीएलआर शी जोडलेल्या ग्हारकांचा फायदा होणार आहे. बँकेच्या वेबसाईट वरील माहितीनुसार एचडीएफसी बँकेचे कर्ज वितरणाचं काम सतर्कतेनं करावं लागेल.
एमसीएलआरमध्ये कपात केल्यानंतर एचडीएफसी बँकेनं कर्जाच्या कालावधीच्या आधारे व्याज दर 8.15 टक्के ते 8.55 टक्क्यांदरम्यान होता.
एमसीएलआर कालावधी आर आणि व्याज दर
1 दिवस : 8.10 टक्के1 महिना :8.10 टक्के3 महिने :8.20 टक्के6 महिने, 1 वर्ष :8.351 वर्ष : 8.35 टक्के2 वर्ष :8.45 टक्के3 वर्ष : 8.55 टक्के
एमसीलआर दर म्हणजे काय?
एमसीएलआऱ म्हणजे मार्जिनल कॉस्ट ऑफ फंडस बेस्ड लेंडिग रेट असा होते. या दरानुसार बँका किंवा वित्तीय संस्था कर्ज वाटप करु शकतात. म्हणजेच एमसीएलआर हा किमान व्याज दर असतो. बँका एमसीएलआर पेक्षा कमी व्याजानं कर्ज देऊ शकत नाहीत. एमसीएलआद्वारे किती टक्क्यानं ग्राहकांना कर्ज द्यायचं हे बदलत्या व्याज दराच्या पार्श्वभूमीवर बँकांकडून ठरवलं जाते. आरबीआयनं 2016 मध्ये एमसआएलआर पद्धती आणली. ही प्रणाली 2016 पासून लागू करण्यात आलेली आहे.
एचडीएफसी बँकेचे एमसीएलआरचे दर 7 एप्रिलपासून लागू करण्यात आले आहेत.
दरम्यान, एचडीएफसी बँकेकडून तीन महिन्यांच्या कालावधीसाठीच एमसीएलआरमध्ये बदल करण्यात करण्यात आले आहेत. ३ महिन्यांपेक्षा अधिक कालावधीसाठी कर्ज असेल तर व्याज दर अधिक द्यावं लागेल. एमसीएलआरमधून गृहकर्ज, वैयक्तिक कर्ज आणि व्यवसाय कर्ज दिलं जातं. या निर्णयाचा जास्त फायदा गृह कर्ज आणि पर्सनल लोन घेणाऱ्यांना होणार नाही.
