Highest Salary News : भारताचा (India) उत्पन्नाचा नकाशा झपाट्याने बदलत आहे. कोणत्या राज्यांमध्ये सर्वाधिक उत्पन्न मिळते आणि कुठे उत्पन्न कमी राहते यावरील आरपीजी ग्रुपचे अध्यक्ष हर्ष गोएंका यांनी केलेल्या पोस्टमुळे सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू झाली आहे. राज्यनिहाय सरासरी मासिक पगाराची आकडेवारी शेअर करताना त्यांनी म्हटले आहे की, जेव्हा प्रत्येक भारतीयाचे, विशेषतः खालच्या वर्गातील लोकांचे उत्पन्न वाढेल तेव्हाच भारत समृद्ध होईल. भारतातील कोणती राज्ये सर्वाधिक पगार देतात याबाबतची माहिती आपण पाहणार आहोत. 

Continues below advertisement

सर्वात जास्त कोण कमावते?

फोर्ब्स अ‍ॅडव्हायझर इंडियाच्या हर्ष गोएंका यांनी शेअर केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, 2025 पर्यंत भारताचे सरासरी मासिक उत्पन्न 28000 रुपयापर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. राज्यांमध्ये, राजधानी दिल्ली (Delhi) 35000 रुपयांसह सरासरी मासिक पगाराच्या यादीत अव्वल आहे. कर्नाटक दुसऱ्या क्रमांकावर आहे, ज्याचे सरासरी मासिक पगार 33000 रुपये आहे. बंगळुरुचे आयटी क्षेत्र, स्टार्टअप हब आणि विपुल प्रमाणात टेक कंपन्यांनी उत्कृष्ट रोजगार संधी आणि उच्च पगार निर्माण केले आहेत. त्यानंतर महाराष्ट्राचा क्रमांक लागतो तो 32000 आणि त्यानंतर तेलंगणाचा क्रमांक लागतो. तिथे 31000 रुपये प्रति महिना उत्पन्न मिळते.  मुंबई आणि पुण्यातील व्यावसायिक आणि हैदराबादमधील आयटी तेजीमुळे या राज्यांमध्ये सरासरी उत्पन्न वाढत आहे.

बिहारची भयानक परिस्थिती

बिहारमध्ये भारतात सर्वात कमी सरासरी मासिक उत्पन्न आहे, जे फक्त 13500 रुपये प्रति महिना आहे. त्यानंतर अंदमान आणि निकोबार बेटे 13000 रुपये या केंद्रशासित प्रदेशाचा क्रमांक लागतो. नागालँड 14000 आणि मिझोरममध्येही सरासरी मासिक उत्पन्न कमी आहे. मर्यादित रोजगार, लघु उद्योग आणि या क्षेत्रातील कमी गुंतवणूक यामुळे इतर राज्यांच्या तुलनेत सरासरी उत्पन्न लक्षणीयरीत्या कमी होते.

Continues below advertisement

दक्षिण भारत आघाडीवर

दक्षिण भारत पारंपारिकपणे रोजगार आणि उत्पन्न दोन्हीमध्ये आघाडीवर मानला जातो. कर्नाटक व्यतिरिक्त, तामिळनाडूचा सरासरी मासिक पगार 29000 आंध्र प्रदेशचा 26000 आणि केरळचा 24500 आहे. या आकडेवारीवरून असे दिसून येते की संधी आणि पगाराच्या बाबतीत दक्षिण भारत अजूनही एक मजबूत शक्ती आहे. देशातील काही राज्याचे उत्पन्न चांगले आहे. त्यामुळं तेथील प्रत्येक व्यक्तिला चांगला रोजगार मिळतो. यामध्ये आघाडीवर दिल्ली हे राज्य आहे. दरम्यान. बिहारमध्ये वाईट परिस्थिती असल्याची माहिती समोर आली आहे. बिहारमध्ये भारतात सर्वात कमी सरासरी मासिक उत्पन्न आहे. जे फक्त 13500 रुपये प्रति महिना आहे.