GST Collection in September 2023: सप्टेंबरमध्ये 1.63 लाख कोटी जीएसटी कलेक्शन (GST Collection) करण्यात आलं आहे. गेल्यावर्षीपेक्षा यंदा 10.2 टक्के जास्त जीएसटी (GST) कलेक्शन करण्यात आलं आहे. तर, यंदा महाराष्ट्रातून सर्वाधिक 25 हजार 137 कोटी रुपयांचं कलेक्शन करण्यात आलं आहे. दरम्यान, सप्टेंबर 2023 मध्ये जीएसटी संकलनाच्या बाबतीत महाराष्ट्र टॉप-5 राज्यांमध्ये अव्वल आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत महाराष्ट्रात जीएसटी संकलन 17 टक्क्यांनी वाढून 25,137 कोटी रुपये झाले आहे
सरकारनं सप्टेंबर 2023 साठी GST कलेक्शन डेटा जारी करण्यात आला आहे. सप्टेंबर महिन्यात एकूण 1,62,712 कोटी रुपये सरकारी तिजोरीत जमा झाले आहेत. सरकारचे सप्टेंबरमधील जीएसटी संकलन गेल्या वर्षीच्या याच महिन्यातील जीएसटी संकलनापेक्षा 10 टक्के अधिक आहे. या महिन्यातील देशांतर्गत व्यवहारातून (सेवांच्या आयातीसह) महसूल हा गेल्या वर्षीच्या याच महिन्यात या स्रोतांमधून मिळालेल्या महसुलापेक्षा 14 टक्के जास्त आहे. 2023-24 या आर्थिक वर्षात एकूण GST संकलनाने ₹1.60 लाख कोटींचा टप्पा ओलांडण्याची ही चौथी वेळ आहे.
किती झालं GST कलेक्शन?
अर्थ मंत्रालयानं यासंदर्भात माहिती दिली की, सप्टेंबर 2023 मध्ये एकूण GST महसूल Gross GST Revenue) 1,62,712 कोटी रुपये आहे, ज्यामध्ये CGST 29,818 कोटी आहे आणि SGST 37,657 कोटी आहे, तर IGST 83,623 कोटी रुपये आहे (माल आयातीसह वस्तूंच्या आयातीवर 41,145 कोटी जमा) आणि उपकर 11,613 कोटी (माल आयातीवर गोळा केलेल्या 881 कोटींसह) आहे.
सरकारनं IGST ते CGST ला 33,736 कोटी रुपये आणि SGST ला 27,578 कोटी रुपये सेटल केले आहेत. नियमित सेटलमेंटनंतर सप्टेंबर 2023 मध्ये केंद्र आणि राज्यांचा एकूण महसूल CGST साठी 63,555 कोटी रुपये आणि SGST साठी 65,235 कोटी रुपये आहे.
सप्टेंबर महिन्यात सरकारला केंद्रीय जीएसटीमधून 29818 कोटी रुपये, राज्य जीएसटीमधून 37657 कोटी रुपये आणि एकात्मिक जीएसटीमधून 83623 कोटी रुपये मिळाले आहेत. इंटिग्रेटेड जीएसटीच्या आकडेवारीत वस्तूंच्या आयातीतून मिळालेल्या 41,145 कोटी रुपयांचाही समावेश आहे. सरकारला सेसमधून 11,613 कोटी रुपये मिळाले आहेत. ज्यामध्ये आयातीतून 881 कोटी रुपये मिळाले आहेत. या कालावधीत, सरकारनं एकात्मिक जीएसटीमधून केंद्रीय जीएसटी आणि राज्य जीएसटीमध्ये अनुक्रमे 33,736 कोटी रुपये आणि 27,578 कोटी रुपये सेटल केले. अशा प्रकारे, सप्टेंबर 2023 मध्ये, केंद्रीय GST मधून सरकारचे एकूण उत्पन्न 63,555 कोटी रुपये आणि राज्य GST मधून 65,235 कोटी रुपये होते.
महत्त्वाच्या इतर बातम्या :