Growth GDP:  येत्या 31 मार्च 2023 रोजी संपणाऱ्या आर्थिक वर्षात भारताची अर्थव्यवस्था 7% दराने वाढण्याची अपेक्षा आहे. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने ही माहिती दिली. 2022-23 साठी राष्ट्रीय उत्पन्नाचा हा पहिला अंदाज अतिशय महत्त्वाचा आहे. कारण या डेटाचा उपयोग केंद्र सरकारचा पुढील आर्थिक वर्ष 2023-24 साठीचा अर्थसंकल्प तयार करण्यासाठी केला जातो.


उत्पादन क्षेत्राच्या खराब कामगिरीमुळे घसरण होईल


राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने (NSO) जारी केलेल्या निवदेनानुसार भारतीय अर्थव्यवस्था 2021-22 मध्ये 8.7% च्या तुलनेत 2022-23 मध्ये 7% दराने वाढण्याची अपेक्षा आहे. ही घसरण प्रामुख्याने उत्पादन क्षेत्राच्या खराब कामगिरीमुळे होईल. 2022-23 मध्ये स्थिर (2011-12) किंमतींवर वास्तविक GDP आणि GDP 157.60 ट्रिलियन रुपये अंदाजित आहे. तर 31 मे 2022 रोजी जाहीर झालेल्या 2021-22 या वर्षासाठी जीडीपीचा तात्पुरता अंदाज 147.36 ट्रिलियन रुपये होता.


उत्पादन क्षेत्रातील उत्पादन 1.6% ने घटण्याचा अंदाज


राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या म्हणण्यानुसार, 'FY-22 मध्ये 9.9% च्या वाढीच्या तुलनेत, उत्पादन क्षेत्राचे उत्पादन 1.6% पर्यंत घसरण्याचा अंदाज आहे. 2022-23 मध्ये नाममात्र जीडीपीमधील वाढ 2021-22 मधील 19.5% च्या तुलनेत 15.4% असण्याचा अंदाज आहे. व्यापार, हॉटेल्स, वाहतूक, दळणवळण आणि प्रसारणाशी संबंधित सेवा यांसारखे उद्योग हे FY23 मध्ये FY22 च्या तुलनेत अंदाजे 13.7% वाढीसह सर्वात वेगाने वाढणारे क्षेत्र असण्याची अपेक्षा आहे.


रिझर्व्ह बँकेने वास्तविक जीडीपी वाढीचा अंदाज 6.8% वर्तवला होता


गेल्या महिन्यात चालू आर्थिक वर्षासाठी भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने चालू आर्थिक वर्षासाठी देशाचा सकल देशांतर्गत उत्पादन (जीडीपी) वाढीचा अंदाज 7% वरून 6.8% पर्यंत कमी केला होता. यामागचे कारण हे होते. आरबीआयने 2022-23 साठी 6.8% वास्तविक जीडीपी वाढीचा अंदाज वर्तवला होता, तिसऱ्या तिमाहीत 4.4% आणि चौथ्या तिमाहीत 4.2%. डिसेंबर २०२२ मध्ये तिसऱ्यांदा २०२२-२३ च्या वाढीचा अंदाज ओलांडला होता. या वर्षाच्या सुरुवातीला अर्थशास्त्रज्ञांनी भारताच्या या आर्थिक वर्षातील विकास दराचा अंदाज ताज्या सरकारी अंदाजानुसार कमी केला. तेव्हा त्यांनी निर्यातीतील घट आणि महागाई वाढण्याच्या जोखमीमुळे क्रयशक्ती कमी झाल्याचा दाखला दिला होता. भारताची दुसरी सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था राहण्याची अपेक्षा आहे


दरम्यान, जीडीपी कमी होण्याचा अंदाज जरी वर्तविला असला तरी, ऑर्गनायझेशन फॉर इकॉनॉमिक को-ऑपरेशन अँड डेव्हलपमेंट (OECD) नुसार भारत केवळ सौदी अरेबियाला मागे टाकून, G-20 देशांमध्ये दुसरी सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था राहण्याची अपेक्षा आहे.