Greenpanel Industries Shares : शेअर बाजारात (Share Market) गुंतवणूक (Investment) करणाऱ्यांसाठी चांगली बातमी आहे. मल्टीबॅगर शेअर (Multibagger Share) स्वस्तात खरेदी करण्याची संधी आहे. या शेअर्सने गेल्या तीन वर्षात भरघोस परतावा दिला आहे. त्यामुळे अनेक गुंतवणुकदारांची ही पहिली पसंती आहे. ग्रीनपॅनल इंडस्ट्रीजने (Greenpanel Industries) तीन वर्षांत जबरदस्त परतावा दिला आहे. मागील तीन वर्षांच्या कालावधीत कंपनीच्या शेअर्समध्ये 800 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. या दरम्यान त्याची किंमत 35 ते 321 रुपयांवर पोहोचली आहे. पण, सध्या सलग तीन दिवसांपासून त्यात घट झाली आहे. यामुळे गुंतवणूकदारांकडे हा शेअर स्वस्तात विकत घेण्याची संधी आहे.


3 वर्षात किंमत 35 वरून 321 रुपयांवर


मागील तीन वर्षात ग्रीनपॅनल इंडस्ट्रीज (Greenpanel Industries) च्या शेअर्समुळे गुंतवणुकदारांची चांदी झाली आहे. या काळात कंपनीच्या शेअर्सने गुंतवणूकदारांना 845 टक्क्यांचा परतावा मिळवून दिला आहे. या काळात बीएसई सेन्सेक्समध्ये (BSE Sensex) 78.47 टक्क्यांची तेजी पाहायला मिळाली तीन वर्षांपूर्वी या कंपनीच्या शेअर्सची किंमत 35 रुपये होती, ती 3 वर्षानंतर 320 पार गेली. 22 जून 2020 रोजी ग्रीनपॅनल इंडस्ट्रीजच्या शेअर्सची किंमत 35.2 रुपये होती, ही 23 जून 2023 रोजी 321.50 रुपयांवर बंद झाली. 


आता स्वस्तात खरेदी करा 'हे' शेअर्स 


दरम्यान, या शेअर्सच्या किमतीत सध्या घट होत आहे, त्यामुळे गुंतवणूकदारांना हे शेअर्स स्वस्तात खरेदी करून त्यापासून भरघोस परतावा मिळवण्याची संधी आहे. या कंपनीच्या शेअर्सचा 52 आठवड्यांमध्ये उच्चांकी दर 522.45 रुपये आहे तर नीचांकी किंमत 255 आहे. या वर्षी शेअरची किंमत 26 टक्क्यांनी कमी झाली आहे. शेअर बाजार विश्लेषकांच्या मते, 449 रुपयेच्या लक्ष्य किंमतीसह या स्टॉकची खरेदी फायदेशीर ठरेल.


भारतासह आशियातील मोठी वुडपॅनेल कंपनी


ग्रीनपॅनल इंडस्ट्रीज (Greenpanel Industries) आधी ग्रीन पॅनलमॅक्स (Green Panelmax) या नावाने ओळखली जायची. ही कंपनी भारतासह आशिया खंडातील सर्वात मोठी वुड पॅनेल (Wood Pannel) उत्पादक कंपनी आहे. ग्रीनपॅनल इंडस्ट्रीज भारतातील सर्वात मोठी MDF म्हणजेच मीडियम डेनसिटी फायरबोर्ड (Medium Density Fibreboard) उत्पादक आहे.


कंपनीच्या स्टॉकची मार्केट कॅप


या वुडपॅनेल कंपनीच्या स्टॉकची मार्केट कॅप सुमारे 3922.85 कोटी रुपये आहे. कंपनीचा स्टॉक 50 दिवस आणि 100 दिवसांच्या मूव्हिंग अॅव्हरेजच्या वर ट्रेडिंग करत आहे. तर 5 दिवस, 20 दिवस आणि 200 दिवसांच्या मूव्हिंग अॅव्हरेजच्या खाली ट्रेडिंग करत आहे. येस सिक्युरिटीजने या शेअर्सवर खरेदीचे रेटिंग 449 रुपयांच्या लक्ष्य किंमतीसह कायम ठेवलं आहे. त्याचप्रमाणे सिस्टेमॅटिक्स इन्स्टिट्यूशनल इक्विटीज (Systematix Institutional Equities) ने ग्रीनपॅनल इंडस्ट्रीज स्टॉकवर Rs 439 चं टार्गेट दिलं आहे.