Government Schemes Investment Plan : अलिकडच्या काळात गुंतवणुकीचं (Investment) महत्व मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. भविष्यातील अडचणींचा सामना करण्यासाठी आत्तापासूनच गुंतवणूक करणं फायद्याचं ठरतं. दरम्यान, गुंतवणुकीच्या दृष्टीनं सध्या विविध योजना  सुरु झाल्या आहेत. या योजनांवर चांगला परतावा मिळत आहे. तुम्ही जर काही सरकारी योजनांमध्ये (Government Schemes) तुमच्या पैशांची गुंतवणूक केली त तुम्हाला दुप्पट परतावा मिळतो. जाणून घेऊयात या योजनांबद्दल सविस्तर माहिती.


तुम्हाला जर पैशांची गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही विविध सरकारी योजनांमध्ये गुंतवणूक करु शकता. यामध्ये तुमची ठेव सुरक्षीत राहते आणि दुसरं म्हणजे या ठेवीवर तुम्हाला चांगला परतावा देखील मिळतो. त्यामुळं गुंतवणुकीसाठी सरकारी योजना फायद्याची ठरते. या गुंतवणुकीतून तुम्हाला दुप्पट फायदा मिळतो. दरम्यान, तुम्ही कोणत्या सरकारी योजनांमध्ये पैशांची गुंतवणूक करावी याबाबतची सविस्तर माहिता पाहुयात. 


किसान विकास पत्र (Kisan Vikas Patra)


किसान विकास पत्र (Kisan Vikas Patra) ही गुंतवणुकदारांसाठी एक महत्वाची योजना आहे. या योजनेत तुम्ही पैशांची गुंतवणूक करुन चांगला परतावा मिळवू शकता. सध्या वार्षिक 7.5 टक्के दराने या योजनेवर व्याज दिले जात आहे. दरम्यान, या योजनेमध्ये तुम्ही 1000 रुपयापासून गुंतवणूक करु शकता. ही एकरकमी गुंतवणूक करावी लागते. तुम्ही गुंतवलेल्या रकमेवर तुम्हाला चक्रवाढीच्या दरानं व्याज मिळेल. तुम्ही गुंतवलेले पैसे 115 महिन्यांत दुप्पट होतील. 115 महिने म्हणजे 9 वर्षे 7 महिने. जर तुम्ही 5 लाख रुपये गुंतवले तर तुम्हाला 10 लाख रुपये मिळतील. त्यामुळं तुमच्यासाठी ही योजना फायद्याची आहे.


सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (Public Provident Fund)


सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी म्हणजे पीपीएफ हा देखील गुंतवणुकीचा एक चांगला मार्ग आहे. यावर तुम्हाला 7.1 टक्के व्याजदर मिळतो. दरम्यान, गुंतवणुकीबरोबरच ही योजना कर बचतीसाठी देखील फायदेशीर ठरते. या योजनेत तुमचे पैसे दुप्पट होण्यासाठी तुम्हाला 10 वर्षापेक्षा कमी काळ लागू शकतो. त्यामुळं तुम्ही गुंतवणुकीसाठी या योजनेचा विचार करु शकता. कमी गुंतवणुकीत या योजनेत तुम्हाला अधिक नफा कमवता येतो. 


सुकन्या समृद्धी योजना (SSY)


सुकन्या समृद्धी योजना योजना देखील गुंतवणुकीसाठी उत्तम योजना आहे. या योजनेत तुम्ही मुलींच्या नावे रक्कम ठेवू शकता. यातून तुम्हाला चांगला परतावा मिळतो. या योजनेत तुम्ही जमा केलेल्या रकमेवर 8.2 टक्के व्याज मिळते. सरकारची ही अल्प बचत योजना आहे. 10 वर्षाच्या खालील मुलींना या योजनेत बचत करता येते. या योजनेत तुम्ही कमीत कमी वार्षिक 250 आणि जास्तीत जास्त 1.5 लाख रुपये गुंतवणू शकता. या सर्व गुंतवणुकीवर तुम्हाला  8.2 टक्के व्याजदर मिळतो. 


महत्वाच्या बातम्या:


ये रे ये रे पैसा... एका लाखाचे 3 कोटी; एका शेअरची कमाल, गुंतवणूकदारांची धम्माल!