Business News : प्रत्येकालाच आपल्या कमाईतील काही रक्कम बचत (Investment) करायची असते.  गुंतवणूक करताना नागरिक दोन गोष्टींचा विचार करतात. एक म्हणजे ठेवलेलील ठे सुरक्षीत राहावी आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळावा. दरम्यान, अनेक चांगल्या योजना आहेत, ज्या तुमच्या ठेवीच्या सुरक्षसोबतच चांगला परतावा देतात. यामधीलच एक म्हणजे सरकारी भविष्य निर्वाह निधी (PPF) म्हणजेच पीपीएफ. ही योजना खूप लोकप्रिय आहे. खास गोष्ट म्हणजे तुम्ही जर रोज फक्त 416 रुपये वाचवले आणि या सरकारी योजनेत गुंतवणूक केली तर तुम्ही काही वर्षात करोडपती (millionaire) होऊ शकता. 


सरकारी भविष्य निर्वाह निधी म्हणजेच पीपीएफ योजना खूप लोकप्रिय आहे. खास गोष्ट म्हणजे तुम्ही जर रोज फक्त 416 रुपये वाचवले आणि या सरकारी योजनेत गुंतवणूक केली तर तुम्ही काही वर्षात करोडपती होऊ शकता. त्याचा हिशोब समजून घेऊया...


ठेवीवर किती मिळतो व्याजदर?


पीपीएफ योजना ही सरकारची एक योजना आहे. यामध्ये पैसे सुरक्षित ठेवण्याची हमी सरकारकडूनच दिली जाते. जर आपण व्याजदराबद्दल बोललो तर त्यात गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना सध्या 7.1 टक्के दराने व्याज मिळत आहे. तुम्हाला तुमच्या भविष्यासाठी खूप मोठा निधी जमवायचा असेल, म्हणजेच निवृत्तीनंतर तुम्हाला पैशांची कमतरता भासणार नाही, तर या योजनेत गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. तुम्ही 500 रुपयांपासून गुंतवणुकीला सुरुवात करू शकता. जर आम्ही पब्लिक प्रॉव्हिडंट फंड स्कीममध्ये गुंतवणूक सुरू करणार असाल तर तुम्ही वार्षिक किमान 500 रुपये आणि कमाल 1.5 लाख रुपये गुंतवू शकता. या योजनेचा परिपक्वता कालावधी 15 वर्षांचा आहे. परंतू तो आणखी पाच वर्षांसाठी वाढवला जाऊ शकतो. या योजनेतील तुमची गुंतवणूक मॅच्युरिटीच्या पलीकडे वाढवण्याचा हाच फॉर्म्युला तुम्हाला करोडपती बनवू शकतो.


कसं व्हाल करोडपती? 


आपण दररोज फक्त 416 रुपयांची बचत करून करोडपती होण्याचे स्वप्न कसे पूर्ण करू शकता? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर ते गणित अगदी सोपं आहे. तुम्ही दररोज   416 रुपये एवढी रक्कम वाचवली तर दर महिन्याला 12,500 रुपये जमा होतील. तुमच्याकडे वार्षिक 1.5 लाख रुपये असतील. जर तुम्ही ही रक्कम PPF स्कीममध्ये गुंतवली आणि मॅच्युरिटीनंतर 10 वर्षांसाठी वाढवली, म्हणजे, जमा केलेली रक्कम मॅच्युरिटीपर्यंत काढण्याऐवजी, तुम्ही ती पाच वर्षांसाठी वाढवली, तर तुमची गुंतवणूक 25 वर्षांत परत येईल 1 कोटी होईल. जर तुम्हाला 7.1 टक्के व्याजाच्या आधारावर गणना केली तर 25 वर्षांनंतर मॅच्युरिटीच्या वेळी तुमच्याकडे 1,03,08,015 रुपये असतील.


महत्वाच्या बातम्या:


Ladki Bahin Yojana : महिलांच्या बँक खात्यात 4500 रुपये जमा होणार? मुख्यमंत्री शिंदेंची नवी माहिती