Government job : सरकारी नोकरी (Government job) मिळवणाऱ्या तरुणांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. फक्त 10 वी पास असणाऱ्या उमेदवारांना देखील सरकार नोकरी मिळवता येणार आहे. न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडने (NPCIL) विविध पदांसाठी भरती जाहीर केली आहे. गेल्या अनेक दिवसापासून नोंदणी सुरु आहे. आज अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
दरम्यान जे उमेदवार पात्र आणि इच्छुक असूनही आहेत त्यांनी नोकरीसाठी आजच्या आजच अर्ज करावा. अर्ज करण्यासाठी त्यांना न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल. npcil.nic.in. या साईवर तुम्ही सविस्तर माहिती पाहू शकता. या भरती मोहिमेद्वारे एकूण 279 स्टायपेंड प्रशिक्षणार्थी पदांची भरती केली जाणार आहे. कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डाचे 10वी आणि 12वी उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकतात. यासोबतच आयटीआय उत्तीर्ण होणेही आवश्यक आहे.
'या' पदांसाठी वयोमर्यादा किती? पगार किती?
न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडमध्ये सरकारी नोकरी मिळवण्यासाठी वयोमर्यादा 18 ते 24 वर्षे आहे. अर्ज करण्यासाठी, सामान्य श्रेणीतील उमेदवारांना 100 रुपये शुल्क भरावे लागेल. आरक्षित वर्गाला फी भरावी लागत नाही. निवडीसाठी, उमेदवारांना परीक्षेच्या अनेक टप्प्यांत हजर राहावे लागेल. यामध्ये प्रथम संगणकावर आधारित चाचणी घेतली जाईल आणि त्यात उत्तीर्ण होणाऱ्यांची मुलाखत घेतली जाईल. निवड झाल्यास वेतन 20 हजार रुपये ते 22 हजार रुपये प्रति महिना आहे.