नवी दिल्ली : केंद्र सरकारनं वाहनांच्या पीयूसी प्रमाणपत्रासंदर्भातील नियम बदलले आहेत. आता नव्या बीएस-6 खासगी वाहनांना वारंवार पीयूसी करावी लागणार नाही. जर तुमचे खासगी वाहन 6 वर्षापर्यंत जुनं असेल तर एकदा पीयूसी केल्यास ती 3 वर्षांपर्यंत चालेल.वाहनाचं वय वाढल्यानंतर पीयूसी नुतनीकरणाची कालमर्यादा कमी होत जाईळ. वाहनमालकांना नवे बदल माहिती असणं आवश्यक आहे.  

Continues below advertisement

खासगी वाहनासंदर्भात बदल नेमके काय?

नव्या नियमांनुसार BS-VI  मानकांच्या खासगी वाहनांच्या वयाच्या आधारावर पीयूसीची वैधता निश्चित केली जाणार आहे. जर तुमच्या वाहनाचं वय 6 पर्यंत जुनं असेल तर त्यावेळी काढलेले पीयूसी प्रमाणपत्र 3 वर्षापर्यंत वैध राहील. यानंतर 6 ते 10 वर्षापर्यंत वाहन जुनं असल्यास दरवर्षी पीयूसी प्रमाणपत्राचं नुतनीकरण करावं लागेल. वाहन 10 वर्षापेक्षा अधिक जुनं असल्यास दर 6 महिन्यानं पीयूसी प्रमाणपत्र काढून घ्यावं लागेल. 

जर तुमचे BS-VI खासगी वाहने 5 वर्ष जुनं असल्यास दर 6 महिन्यानं किंवा प्रत्येक वर्षी पीयूसी प्रमाणपत्र काढावं लागणार नाही. एकदा काढलेलं प्रमाणपत्र 3 वर्ष मान्य असेल. 

Continues below advertisement

कमर्शिअल वाहनांच्या पीयूसीसाठी काय बदलणार?

सरकारने BS-VI कर्मशिअल म्हणजेच ट्रान्सपोर्ट वाहनासाठी वेगवेगळी कालमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. हे बदल कर्मशिअल वाहनांच्या वाहनचालकांना माहिती असणं आवश्यक आहे. जर तुमचं वाहन 6 वर्षापर्यंत जुनं असेल तर पीयूसी प्रमाणपत्र 2 वर्षापर्यंत वैध राहील. वाहन 6 ते 10 वर्ष जुनं असल्यास पीयूसीचं दरवर्षी नुतनीकरण करावं लागेल. 10 वर्षांपेक्षा वाहन जुनं असल्यास पीयूसी 6 महिन्यात करावं लागेल.  

नवा नियम कधी लागू होणार?

सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे हा नियम कधी लागू होणार आहे. 13 नोव्हेंबर 2026 रोजी मंत्रालयानं या नियमांची अधिसूचना जारी केली होती. 19 नोव्हेंबर 2026 ला हे सरकारी राजपत्रात प्रकाशित झाल्यानंतर लागू झाले आहेत.

नियम समजून घ्या

बीएस-VI च्या खासगी वाहनांसाठी 6 ते 10  वर्ष वाहनांसाठी दरवर्षी पीयूसी करावी लागेल. 10 वर्षांपेक्षा अधिक वाहनांसाठी दर 6 महिन्यांनी पीयूसी करावी लागेल. 

कमर्शिअल बीएस-6 वाहनांसाठी 6  वर्षापर्यंत 2 वर्षांनी पीयूसी करावी लागेल. त्यानंतर 6 ते 10 या कालावधीत दरवर्षी पीयूसी करावी लागेल. 10 वर्षानंतर प्रत्येक 6 महिन्यांनंतर पीयूसी करावी लागेल. 

जुन्या बीएस-1, 2, 3 वाहनांना  3 महिने आणि बीएस-4 वाहनांसाठी 6 महिन्यांनी पीयूसी करावी लागेल.