एक्स्प्लोर

गुगलचा मोठा निर्णय! भारतातील 'या' शहरात करणार 88 हजार 730 कोटींची गुंतवणूक, दरवर्षी 1 लाख 88 हजार नोकऱ्या मिळणार

Google To Invest In India : भारत वेगाने डिजिटल जगाकडे वाटचाल करत आहे. आता या दिशेने आणखी एक ऐतिहासिक पाऊल उचलण्यात आले आहे.

Google To Invest In India : भारत वेगाने डिजिटल जगाकडे वाटचाल करत आहे. आता या दिशेने आणखी एक ऐतिहासिक पाऊल उचलण्यात आले आहे. आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणममध्ये (Visakhapatnam Andhra Pradesh)  अमेरिकेनंतरचे सर्वात मोठे डेटा सेंटर स्थापन करण्याची घोषणा गुगलने केली आहे. हा उपक्रम भारताच्या डिजिटलायझेशनमध्ये एक मोठा "टर्निंग पॉइंट" ठरू शकतो. यामुळं भारतात दरवर्षी लाखो नोकऱ्या निर्माण होणार आहेत. 

गुगलची 10 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक

आंध्र प्रदेश सरकारने जारी केलेल्या अधिकृत प्रसिद्धीपत्रकानुसार, 1 गिगावॅट डेटा सेंटर बांधण्यासाठी गुगल अंदाजे 10 अब्ज अमेरिकन डॉलर्स (अंदाजे 88,730 कोटी) गुंतवणूक करेल. ही गुंतवणूक भारतात डेटा सुरक्षा, क्लाउड सेवा आणि एआय पायाभूत सुविधांना नवीन उंचीवर घेऊन जाईल.

1.14 लाख कोटी रुपयांच्या एकूण 30 गुंतवणूक प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली, मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांची माहिती

मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झालेल्या राज्य गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाच्या (SIPB) बैठकीत 1.14 लाख कोटी रुपयांच्या एकूण 30 गुंतवणूक प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली. या प्रस्तावांमध्ये आयटी, इंधन, पर्यटन, अवकाश, अन्न प्रक्रिया आणि इतर क्षेत्रातील प्रकल्पांचा समावेश आहे. या गुंतवणुकींमुळे राज्यात अंदाजे 67000 नवीन नोकऱ्या निर्माण होण्याची अपेक्षा आहे.

भारतातील आतापर्यंतची सर्वात मोठी परकीय गुंतवणूक

प्रकाशनानुसार, रायडेन इन्फोटेक डेटा सेंटरसाठीचा 87520 कोटी रुपयांचा गुंतवणूक प्रस्ताव देशाच्या इतिहासातील सर्वात मोठा थेट परकीय गुंतवणूक (FDI) मानला जातो. मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू म्हणाले, "गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी गेल्या 15 महिन्यांत केलेले प्रयत्न आता फळ देत आहेत. राज्यात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती आणि आर्थिक विकासाच्या नवीन संधी उघडत आहेत." बैठकीत, सरकारने प्रत्येक मोठ्या प्रकल्पासाठी एक विशेष प्रकल्प अधिकारी नियुक्त करण्याचा निर्णय घेतला, जो प्रकल्प राबविण्याची जबाबदारी घेईल.

गुंतवणूक आणि रोजगार आकडेवारी

एसआयपीबीच्या आतापर्यंतच्या 11 बैठकांमध्ये, 7 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या गुंतवणूक प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली आहे. या प्रकल्पांमुळे अंदाजे 6.2 लाख नोकऱ्या निर्माण होण्याची अपेक्षा आहे. गुगलची ही मोठी गुंतवणूक भारताच्या डिजिटल परिसंस्थेसाठी एक मैलाचा दगड ठरेल. विशाखापट्टणममध्ये बांधले जाणारे हे हायपरस्केल डेटा सेंटर भारताला जागतिक डिजिटल पायाभूत सुविधा केंद्र म्हणून स्थापित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल. 

महत्वाच्या बातम्या:

Google Pay Laon : गुगल पेवरुन कर्ज घेण्याचा विचार करताय? अ‍ॅपवरुन कर्ज घेताना सतर्कता गरजेची, फायदा अन् नुकसान, महत्त्वाच्या बाबी जाणून घ्या...

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Delhi Bomb Blast News: 'ती' कार आमची नाहीच, आमची मुलं कधीच दिल्लीत गेलीच नाही; पुलवामातील अमीर, उमरच्या कुटुंबियांचा खळबळजनक दावा
'ती' कार आमची नाहीच, आमची मुलं कधीच दिल्लीत गेलीच नाही; पुलवामातील अमीर, उमरच्या कुटुंबियांचा खळबळजनक दावा
Delhi Red Fort Blast: लग्नसमारंभावेळी मोठा आवाज, सर्वजण बाहेर पळाले, मांसाचे तुकडे अन् कारच्या तुटलेल्या काचा...; प्रत्यक्षदर्शींनी सांगितली स्फोटाची भयानक कहाणी
लग्नसमारंभावेळी मोठा आवाज, सर्वजण बाहेर पळाले, मांसाचे तुकडे अन् कारच्या तुटलेल्या काचा...; प्रत्यक्षदर्शींनी सांगितली स्फोटाची भयानक कहाणी
Temperature Update: महाराष्ट्रात हुडहुडी! विदर्भ - मराठवाड्यात कडाक्याची थंडी, पुढील 4 दिवस तापमान कसे राहणार?
महाराष्ट्रात हुडहुडी! विदर्भ - मराठवाड्यात कडाक्याची थंडी, पुढील 4 दिवस तापमान कसे राहणार?
Unmesh Patil: गिरीश महाजनांचा दावा अन् ठाकरे गटाच्या नेत्यावर तीनच दिवसात गुन्हा दाखल; बँकेची तब्बल पाच कोटींची फसवणूक केल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?
गिरीश महाजनांचा दावा अन् ठाकरे गटाच्या नेत्यावर तीनच दिवसात गुन्हा दाखल; बँकेची तब्बल पाच कोटींची फसवणूक केल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Delhi Blast Umar Family : आमची मुलं कधी दिल्लीत गेलीच नाहीत, उमरच्या परिवाराचा मोठा दावा
Delhi Blast: दिल्ली स्फोटानंतर HM Amit Shah यांची उच्चस्तरीय बैठक, NIA, IB प्रमुखांसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित.
Red Fort Blast: लाल किल्ल्याजवळ स्फोटात जैशच्या Faridabad-Saharanpur मॉड्यूलचा हात, गुप्तचर विभागाचा संशय.
Delhi Security Review: Amit Shah घेणार अंतर्गत सुरक्षेचा आढावा, दहशतवाद्यांविरोधात नवी रणनीती?
Delhi Blast Probe: दिल्ली स्फोटानंतर गृहमंत्री Amit Shah यांची उच्चस्तरीय बैठक, NIA-IB प्रमुख हजर.

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Delhi Bomb Blast News: 'ती' कार आमची नाहीच, आमची मुलं कधीच दिल्लीत गेलीच नाही; पुलवामातील अमीर, उमरच्या कुटुंबियांचा खळबळजनक दावा
'ती' कार आमची नाहीच, आमची मुलं कधीच दिल्लीत गेलीच नाही; पुलवामातील अमीर, उमरच्या कुटुंबियांचा खळबळजनक दावा
Delhi Red Fort Blast: लग्नसमारंभावेळी मोठा आवाज, सर्वजण बाहेर पळाले, मांसाचे तुकडे अन् कारच्या तुटलेल्या काचा...; प्रत्यक्षदर्शींनी सांगितली स्फोटाची भयानक कहाणी
लग्नसमारंभावेळी मोठा आवाज, सर्वजण बाहेर पळाले, मांसाचे तुकडे अन् कारच्या तुटलेल्या काचा...; प्रत्यक्षदर्शींनी सांगितली स्फोटाची भयानक कहाणी
Temperature Update: महाराष्ट्रात हुडहुडी! विदर्भ - मराठवाड्यात कडाक्याची थंडी, पुढील 4 दिवस तापमान कसे राहणार?
महाराष्ट्रात हुडहुडी! विदर्भ - मराठवाड्यात कडाक्याची थंडी, पुढील 4 दिवस तापमान कसे राहणार?
Unmesh Patil: गिरीश महाजनांचा दावा अन् ठाकरे गटाच्या नेत्यावर तीनच दिवसात गुन्हा दाखल; बँकेची तब्बल पाच कोटींची फसवणूक केल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?
गिरीश महाजनांचा दावा अन् ठाकरे गटाच्या नेत्यावर तीनच दिवसात गुन्हा दाखल; बँकेची तब्बल पाच कोटींची फसवणूक केल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?
Dharmendra Daughter Esha Deol Post: 'माझे वडील जिवंत, त्यांची प्रकृती सुधारतेय... '; धर्मेंद्र यांच्या मृत्यूच्या वृत्ताचं खंडन करणारी ईशा देओलची पोस्ट
'माझे वडील जिवंत, त्यांची प्रकृती सुधारतेय... '; धर्मेंद्र यांच्या मृत्यूच्या वृत्ताचं खंडन करणारी ईशा देओलची पोस्ट
Delhi Bomb Blast PM Modi: दिल्ली बॉम्बस्फोटाने हादरलेली असतानाच पीएम मोदी भूतानला रवाना; चौथ्या राजेंच्या वाढदिवसाला हजेरी लावणार
दिल्ली बॉम्बस्फोटाने हादरलेली असतानाच पीएम मोदी भूतानला रवाना; चौथ्या राजेंच्या वाढदिवसाला हजेरी लावणार
BMC Election Reservation: मुंबई महानगरपालिका निवडणुकीत महिलांसाठी 114 वॉर्ड राखीव; SC, ST साठी कोणते वॉर्ड आरक्षित?
मुंबई महानगरपालिका निवडणुकीत कोणत्या वॉर्डात आरक्षण? यादी जाहीर, तुमच्या वॉर्डात काय झालं?
Delhi Bomb Blast: दिल्ली स्फोटासाठी खतांमध्ये वापरल्या जाणाऱ्या अमोनिअम नायट्रेटचा वापर, गाडी लाल सिग्नल दिसताच थांबली अन् धडाम्....
दिल्ली स्फोटासाठी खतांमध्ये वापरल्या जाणाऱ्या अमोनिअम नायट्रेटचा वापर, गाडी लाल सिग्नल दिसताच थांबली अन् धडाम्....
Embed widget