Google Layoffs: गुगल (Google) कंपनीने मोठा निर्णय घेतला आहे. गुगलने कंपनीत पुन्हा एकदा नोकरकपात (Layoffs) केली आहे. अनेक कर्मचाऱ्यांना गुगलने नारळ दिली आहे. 2024 या वर्षातील गुगलची ही दुसरी नोकरकपात आहे. यापूर्वी जानेवारी 2024 मध्ये गुगलने नोकरकपात केली होती. दरम्यान, सध्या केलेल्या नोकरकपातीचा परिणाम भारतावर देखील होण्याची शक्यचा वर्तवली जातेय.
जगभरात जागतिक मंदीचं वार
सध्या जगभरात जागतिक मंदीचं वार वाहत आहे. त्यामुळं अनेक कंपन्यांना मोठा फटका बसत आहेत. त्यामुळं नफ्या तोट्याचं गणित जुळवण्यासाठी अनेक कंपन्या नोकरकपातीचा निर्णय घेत आहेत. या वर्षात अनेक कंपन्यांनी नोकरकपात केली आहे. अशातच आता गुगलने देखील नोकरकपातीचा निर्णय घेतला आहे.
नोकरकपातीचा परिणाम रिअल इस्टेट टीम आणि वित्त विभागाच्या टीमवर
गुगलचा खर्च कमी करण्यासाठी नोकरकपातीचा निर्णय घेतला आहे. या नोकरकपातीचा परिणाम रिअल इस्टेट टीम आणि वित्त विभागाच्या टीमवर झाला आहे. दरम्यान, कंपनीनं दिलेल्या माहितीनुसार, या नोकरकपातीचा निर्णय मर्यादीत स्वरुपाचा आहे. त्यामुळं याचा परिणाम संपर्ण कंपनीवर होणार नसल्याची माहिती गुगल प्रशासनानं दिली आहे. दरम्यान, ज्या कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी केलं आहे, त्या कर्मचाऱ्यांना इतर पदांसाठी अर्ज करण्याची संधी देखील मिळणार आहे.
गुगलच्या खर्चाचे व्यवस्थापन करण्यासाठी नोकरकपातीचा निर्णय
गुगलच्या खर्चाचे व्यवस्थापन करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती गुगल प्रशासनानं दिली आहे. दरम्यान, गुगलने केलेली ही वर्षातील दुसरी नोकरकपात आहे. याआधी जानेवारी 2024 मध्ये कंपनीने नोकरकपात केली होती. आता पुन्हा नोकरकपातीचा निर्णय घेतलाय. जानेवारीमध्ये केलेल्या नोकरकपातीचा फटका अभियांत्रिकी, हार्डवेअर आणि सहाय्यक संघातील कर्मचाऱ्यांना बसला आहे. दरम्यान, यापूर्वीच गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी नोकरकपातीचे संकेत देखील दिले होते.
महत्वाच्या बातम्या: